सरकारी कर्मचाऱ्यांनाही आता ड्रेस कोड लागू करण्यात आला आहे. सरकारी कार्यालयात कोणते आणि कसे कपडे घालावेत याबाबतचे निर्देश राज्य सरकारने जाहीर केले आहेत. राज्य सरकारच्या या निर्णयावर विरोधी पक्षातील अनेक नेत्यांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. याच मुद्द्यावरून केंद्रीय न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी महाराष्ट्र सरकारला (Maharashtra Government) एक प्रश्न विचारला आहे. राज्यसरकारने मंत्रालयात येणाऱ्या कर्मचारी अधिकाऱ्यांसाठी ड्रेसकोडचा नियम केला आहे. रंगबिरंगी नक्षीकामवाल्या कापड्यांच्या पोशाखास मनाई केली आहे. ही मनाई मंत्र्यांनाही लागू झाल्यास मला कसे मंत्रालयात येता येईल? अशा आशयाचे ट्विट त्यांनी केली आहे.
राजकीय नेतेमंडळी म्हणजे पांढरे शुभ्र कपडे आणि डोळ्याला गॉगल अशी सुरूवातीच्या काळातील धारणा होती. परंतु, रामदास आठवले यांची स्टाईलच वेगळी आहे. रामदास आठवले यांना मात्र कायम रंगीबेरंगी कपड्यातच पाहायला मिळाले. ते कायम रंगीत कपडे परिधान करून त्यावर एखादे जॅकेट घालतात. त्यांच्या या स्टाईलची सर्वत्र चर्चा आहे. परंतु, शासकीय कर्मचाऱ्यांना ड्रेस कोड लागू केल्यानंतर रामदास आठवले यांनी ट्विटरच्या माध्यमातून राज्य सरकारला खालील प्रश्न विचारला आहे. हे देखील वाचा- Sharad Pawar Birthday Party: शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीला कार्यकर्त्यांचा तुफान राडा; पोलिसांना करावा लागला लाठीमार
रामदास आठवले यांचे ट्विट-
राज्यसरकार ने मंत्रालयात येणाऱ्या कर्मचारी अधिकाऱ्यांसाठी ड्रेसकोडचा नियम केला आहे. रंगबिरंगी नक्षीकामवाल्या कापड्यांच्या पोशाखास मनाई केली आहे. ही मनाई मंत्र्यांनाही लागू झाल्यास मला कसे मंत्रालयात येता येईल? pic.twitter.com/yS7jM7G8Xw
— Dr.Ramdas Athawale (@RamdasAthawale) December 13, 2020
कार्यालयात कामकाज करणारे बरेचसे आधिकारी, कर्मचारी कार्यालयीन वेळेत उपस्थित असताना शासकीय कर्मचाऱ्यांना अनुरूप ठरेल, अशा वेशभूषेचा वापर करीत नाहीत. त्यामुळे शासकीय कर्मचाऱ्यांची जनमानसातील प्रतिमा मलीन होते अशा निष्कर्षाला पोहोचत शासकीय कर्मचाऱ्यांसाठी ड्रेसकोड लागू करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.