महाराष्ट्र

दीनानाथ मंगेशकर रूग्णालय मुख्यमंत्री कार्यालयाला जुमानत नसतील तर इतरांच काय घेऊन बसलात? पुण्याच्या गर्भवतीच्या मृत्यू प्रकरणी जितेंद्र आव्हाड यांचे X पोस्ट शेअर करत आरोप

Dipali Nevarekar

महाराष्ट्र राज्य महिला आयोग अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी या प्रकरणाची महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने दखल घेतली आहे.आयोगाने आयुक्त,पुणे महानगरपालिका यांना सदर प्रकरणी तथ्य तपासत चौकशी करुन कार्यवाही करण्याचे आणि आयोगास वस्तुस्थितीदर्शक अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. असं जाहीर केले आहे.

Mumbai Metro-3 Aqua Line Expansion: मुंबई मेट्रो 3 चा वरळी पर्यंतचा टप्पा लवकरच होणार सुरू; आरे ते सिद्धिविनायक अवघ्या 34 मिनिटांत, 60 रूपयांत गाठणं होणार शक्य

Dipali Nevarekar

काही दिवसांपूर्वीच एक ट्रायल पार पडली असून त्यामध्ये आचार्य अत्रे चौक ते कफ परेड असा 10.99 किमी चा टप्पा कापण्यात आला आहे.

Mumbai Mantralaya Access: मुंबईमधील मंत्रालयात प्रवेशासाठी Digi Pravesh ॲपवर नोंदणी अनिवार्य; स्लॉट बुक करून रांगेशिवाय घेता येईल प्रवेश

टीम लेटेस्टली

मंत्रालयात क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी, अभ्यागत यांना 1 एप्रिल पासून ‘डिजीप्रवेश’ (Digi Pravesh) या ऑनलाईन ॲपवर नोंदणी करणे अनिवार्य करण्यात आले आहे. याद्वारे नोंदणीसाठी रांगेत उभे राहण्याची गरज नाही.

Shivajinagar-Hinjawadi Metro Update: पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रोचे काम 90 टक्के पूर्ण

Prashant Joshi

ही मेट्रो लाइन हिंजवडी, वाकड, बाणेर, बालेवाडी आणि शिवाजीनगर या भागांना जोडेल, जिथे दररोज 3 लाखांहून अधिक आयटी कर्मचारी आणि रहिवासी प्रवास करतात. सध्या या मार्गावर वाहतूक कोंडी ही मोठी समस्या आहे. ही लाइन सिव्हिल कोर्ट येथे महामेट्रोच्या इतर मार्गांशी जोडली जाईल, ज्यामुळे पुण्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक मजबूत होईल.

Advertisement

Tuljapur Accident: पावसामुळे चालकास अंदाज न आल्याने नादुरुस्त उभ्या ट्रकवर भरधाव आयशर टेम्पोची धडक; भीषण अपघातात दोन ठार

Dipali Nevarekar

आयशरच्या पाठीमागून येणाऱ्या बीएमडब्ल्यू कारणे अचानक झालेल्या घटनेमुळे वेळेवर ब्रेक न लागल्याने आयशरला पाठीमागून धडक दिली. कार मधील दोघे किरकोळ जखमी झाले आहेत.

MHADA Housing Lottery: म्हाडा हाऊसिंग लॉटरी कधी? पहा म्हाडा सीईओ संजीव जयस्वाल यांनी दिलेली अपडेट काय?

Dipali Nevarekar

म्हाडाकडून ऑगस्ट, सप्टेंबर 2025 मध्ये 3 ते 4 हजार घरांसाठी लॉटरी निघणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

Navi Mumbai Water Supply: नवी मुंबईकरांना दिलासा! Morbe Dam धरणात 5 महिने पुरेल इतका पाणीसाठा, परंतु पाणी जपून वापरण्याचे महापालिकेचे आवाहन

Prashant Joshi

धरणात पुरेसा पाणीसाठा असला तरी, पाणी जबाबदारीने वापरण्याची गरज महापालिकेने अधोरेखित केली. महापालिका आयुक्तांनी रहिवाशांना गृहनिर्माण संस्था परिसर किंवा वाहने धुण्यासाठी या पाण्याच्या नळीचा वापर करू नये, असे आवाहन केले आहे. महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी पिण्याचे पाणी वाया घालवू नये आणि नळ अनावश्यकपणे उघडे ठेवू नयेत याची खात्री करण्याचे आवाहनही केले आहे. म

MHT CET Admit Card 2025 Out for PCB Group: पीसीबी ग्रुप चं हॉल तिकीट mahacet.org वर जारी; कसं कराल डाऊनलोड

Dipali Nevarekar

अ‍ॅडमीट कार्ड्स डाऊनलोड करताना विद्यार्थ्यांना त्यांचे अ‍ॅप्लिकेशन नंबर आणि पासवर्ड टाकणं आवश्यक आहे.

Advertisement

Pune Rains: पुण्यामध्ये अवकाळी पाऊस, गारपीट; अनेक भागात बत्ती गुल (Watch Video)

Dipali Nevarekar

पुण्याला आज सलग दुसर्‍या दिवशी जोरदार पावसाने झोडपून काढलं आहे.

How To Book Nature Trail In Malabar Hill: मलबार हिल येथील निसर्ग उन्नत मार्गाला भेट देण्यासाठी ऑनलाईन बूकिंग कसं कराल?

Dipali Nevarekar

'निसर्ग उन्नत मार्गाला' भेट देण्यासाठी सकाळी 5 ते रात्री 9 पर्यंत वेळ आहे.

Namo Shetkari Yojana Installment: राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा! नमो शेतकरी योजनेचा हप्ता बँक खात्यात येण्यास सुरुवात, जाणून घ्या मोबईलवरुन कसे चेक कराल

टीम लेटेस्टली

ही रक्कम चार महिन्यांच्या अंतराने 2 हजारच्या तीन हप्त्यांमध्ये आधार-जोडलेल्या बँक खात्यात थेट हस्तांतरित (DBT) केली जाते. या योजनेचा उद्देश छोट्या आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना आर्थिक स्थिरता देणे आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार हा महाराष्ट्रातील शेतकरी असणे अनिवार्य आहे.

Mumbai Metro Andheri-Ghatkopar Additional Trips: अंधेरी-घाटकोपर मार्गावर मुंबई मेट्रोकडून अतिरिक्त फेऱ्या; चाचणी सुरु

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

अंधेरी-घाटकोपर मेट्रो (Andheri-Ghatkopar Metro) दरम्यान प्रवाशांची संख्या वाढल्याने स्थानकांवर मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर या मार्गावर अतिरिक्त फेऱ्या सुरु करण्याबाबत चाचण्या सुरु करण्यात येणार आहेत.

Advertisement

Bhivpuri Car Shed: भिवपुरी येथे नवीन रेल्वे कार शेडचे काम अखेर सुरू; मुंबई लोकल सेवेच्या तांत्रिक अडचणी दूर होऊन गुणवत्तेला मिळणार चालना

Prashant Joshi

मुंबईकरांसाठी लोकल ट्रेन ही जीवनवाहिनी आहे. दररोज लाखो प्रवासी या ट्रेनवर अवलंबून असतात, आणि त्यांची संख्या सतत वाढत आहे. पण ट्रेनच्या देखभालीसाठी जागा नसल्याने अनेकदा तांत्रिक अडचणी येत होत्या. भिवपुरी कार शेडमुळे या समस्येवर तोडगा निघेल, आणि ट्रेनच्या सेवेची गुणवत्ता सुधारेल. हे कार शेड मध्य रेल्वेचे चौथे केंद्र असेल.

Mumbai to Dubai Train: दुबई-मुंबई अंडरवॉटर रेल्वे प्रस्ताव; प्रवासाचा वेळ दोन तासांपर्यंत कमी होण्याची शक्यता

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

दुबई-मुंबई अंडरवॉटर रेल्वे लिंक प्रकल्पाचा प्रस्ताव विचाराधीन असल्याची चर्चा आहे. ज्यामुळे प्रवासाचा वेळ दोन तासांपर्यंत कमी होऊ शकतो, ज्यामुळे व्यापार आणि वाहतूक वाढेल. प्रकल्प मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे आणि त्यासाठी अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक आवश्यक आहे.

Jaisingh Maharaj More Dies: संत तुकाराम महाराजांचे दहावे वंशज जयसिंग महाराज मोरे यांचे निधन

Dipali Nevarekar

पुण्यात खाजगी रूग्णालयामध्ये उपचार सुरू असताना जयसिंग महाराज मोरे यांची प्राणज्योत मालवली आहे.

Chhatrapati Shivaji Maharaj Punyatithi 2025: लंडन वरून आणलेली ऐतिहासिक शिवकालीन वाघनखे सध्या महाराष्ट्रात कुठे बघायला मिळतील?

Dipali Nevarekar

मागील वर्षीच महाराष्ट्र सरकारने लंडनच्या व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियममधून ही वाघनखे तीन वर्षांसाठी भारतात आणली आहेत. सध्या ही नागपूरात आहेत.

Advertisement

Ghibli Art Of Lord Ganesha: 'गणेश प्रतिमांचे घिबली आर्ट हा देवतांचा अवमान'; Mumbai Cha Raja Mandal ची सोशल मीडियावरून बाप्पाचे एआय जनरेटेड फोटो काढून टाकण्याची विनंती

टीम लेटेस्टली

या ट्रेंडने डिजिटल जगात क्रांती आणली असली, तरी त्यावर टीकाही होत आहे. काही कलाकारांचे म्हणणे आहे की, घिबलीची शैली ही दशकांच्या मेहनतीचे फळ आहे, आणि एआयने ती काही सेकंदांत कॉपी करणे हे कलेचा अवमान आहे. यामुळे आपण आपल्या पारंपरिक कलेचा विसर पडतोय का, असाही प्रश्न उपस्थित होतो.

Pune Shocker: पुण्यात अजित पवार गटाचा नेता Shantanu Kukde ला बलात्काराच्या आरोपाखाली अटक; NGO च्या आवारात सापडल्या दारूच्या बाटल्या (Video)

Prashant Joshi

समर्थ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गित्ते म्हणाले, दोन्ही पीडितांच्या तक्रारींनंतर याबाबत 25 मार्च रोजी एफआयआर नोंदवला आहे. त्यानुसार, कुकडेला बीएनएस आणि लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण कायद्याच्या विविध कलमांखाली अटक करण्यात आली.

Akola Shocker: अकोला मध्ये महिला शिक्षिका प्रशिक्षणासाठी बाहेर गेल्याचा गैरफायदा घेत शाळेतील कर्मचार्‍याने केला 10 मुलींचा विनयभंग

Dipali Nevarekar

शाळेमध्ये विनयभंग झालेल्या मुली या इयत्ता चौथी आणि सातवी मधील असल्याचं समोर आलं आहे.

FASTag Fine Update: राज्यातील सर्व टोल प्लाझावर फास्टॅग अनिवार्य; पहिल्याच दिवशी 18,800 वाहनांकडून 9 लाख दंड वसूल

Prashant Joshi

केवळ फास्टॅगद्वारे टोल भरणे अनिवार्य करण्यापूर्वी एक सार्वजनिक सूचना जारी करण्यात आली होती, ज्यामध्ये असा इशारा देण्यात आला होता की, जे प्रवासी फास्टॅग वापरत नाहीत आणि यूपीआय, कार्ड किंवा रोख रकमेसारख्या इतर मार्गांनी पैसे देण्याचा प्रयत्न करतात त्यांना टोल रकमेच्या दुप्पट शुल्क आकारले जाईल.

Advertisement
Advertisement