Mumbai Shocker: गिरगाव येथे डिलिव्हरी एजंटकडून महिलेचा लैंगिक छळ; जेवणाची ऑर्डर द्यायला आल्यावर दरवाजा उघडताच काढली पँट, पोलिसांकडून अटक

तपासानंतर अधिकाऱ्यांनी आरोपीला 4 एप्रिल रोजी, गामदेवी येथील केनेडी ब्रिजजवळ अटक केली. त्याचे नाव शाहरुख शेख मोहम्मद शेख असे आहे, जो चेंबूरचा रहिवासी आहे. शेखवर भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम 75 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गिरगाव येथील एका 28 वर्षीय महिलेने तिच्या घरी लैंगिक छळ केल्याच्या केला असून, या प्रकरणी व्ही पी रोड पोलिसांनी एका 29 वर्षीय फूड डिलिव्हरी एजंटला अटक केली आहे. माहितीनुसार, महिलेने एका डिलिव्हरी अॅपद्वारे जेवण मागवले होते. ही फूड ऑर्डर देण्यासाठी हा व्यक्ती आला होता. एका पोलीस अधिकाऱ्याच्या हवाल्याने वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, महिलेने दार उघडताच डिलिव्हरी एजंटने त्याची पँट खाली केली. हे पाहून धक्का बसलेल्या आणि व्यथित झालेल्या महिलेने ताबडतोब घरात असलेल्या तिच्या पतीला याची माहिती दिली. त्यानंतर पती डिलिव्हरी एजंटच्या मागे गेला. पती आणि डिलिव्हरी एजंटमध्ये हाणामारी झाली, परंतु आरोपी पतीला बाजूला ढकलून पळून जाण्यात यशस्वी झाला. ही घटना 21 मार्च रोजी घडली. या घटनेनंतर, जोडप्याने एजंटच्या वर्तनाची तक्रार करण्यासाठी फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्मच्या कस्टमर केअरशी संपर्क साधला. या ठिकाणी त्यांना कठोर कारवाई करण्याचे आश्वासन देण्यात आले, मात्र त्यांनी आरोपीविरुद्ध कोणतीही दृश्यमान पावले उचलली नाहीत. त्यानंतर त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे, पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी शोध सुरू केला.

तपासानंतर अधिकाऱ्यांनी आरोपीला 4 एप्रिल रोजी, गामदेवी येथील केनेडी ब्रिजजवळ अटक केली. त्याचे नाव शाहरुख शेख मोहम्मद शेख असे आहे, जो चेंबूरचा रहिवासी आहे. शेखवर भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम 75 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे, जो लैंगिक छळाशी संबंधित आहे. (हेही वाचा: Girl Sexual Assault: वसईमध्ये 17 वर्षीय मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल)

 

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement