महाराष्ट्र

Bryan Johnson on Poor Air Quality in India: प्रसिद्ध अँटी-एजिंग इन्फ्लुएंसर ब्रायन जॉन्सनने मध्येच सोडला Nikhil Kamath चा पॉडकास्ट; म्हणाला- 'इथली हवेची गुणवत्ता अतिशय खराब'

Prashant Joshi

वायू प्रदूषणाचे सार्वजनिक आरोग्यावर होणाऱ्या परिणामांचे प्रचंड पुरावे असूनही, भारतात हवेच्या गुणवत्तेच्या समस्यांना राष्ट्रीय आपत्ती म्हणून का मानले जात नाही असा प्रश्न जॉन्सनने उपस्थित केला. त्याने सांगितले की, सर्व कर्करोग बरे करण्यापेक्षा वायू प्रदूषणाचे निराकरण केल्यास भारतीय लोकसंख्येचे आरोग्य अधिक प्रभावीपणे सुधारेल.

Shiv Jayanti 2025: शिवजयंतीला शिवनेरी किल्ल्यावर जात असाल तर लक्ष द्या! प्रशासनाने जाहीर केले वाहतूक बदल, पहा मार्ग व पार्किंग व्यवस्था

Prashant Joshi

Suraj Chavan At Matoshree: सूरज चव्हाण 'मातोश्री'वर दाखल, आदित्य ठाकरे यांच्याशी गळाभेट; खिचडी घोटाळा प्रकरणात जामीन

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

Khichdi Scam: खिचडी वितरण घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने शिवसेना (UBT) नेते सूरज चव्हाण यांना जामीन मंजूर केला. त्यांनंतर त्यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची भेट घेतली.

Ashwini Vaishnaw On Mumbai Local: मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! आता फक्त 2 मिनिटांत मिळणार लोकल ट्रेन

Bhakti Aghav

सध्या दोन लोकल ट्रेनमध्ये 3 मिनिटांचे अंतर आहे. आता लोकल गाड्यांचा वेळ 3 मिनिटांवरून 2 मिनिटांपर्यंत कमी केला जाणार आहे.

Advertisement

Fetus in fetu Surgery Buldhana: बुलढाणा येथे दुर्मिळ 'गर्भातील गर्भ' रुग्ण; महिलेवरील 'फिटस इन फिटो' शस्त्रक्रिया यशस्वी

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

बुलढाणा येथील महिलेच्या वैद्यकीय तपासणीत डॉक्टरांना गर्भाशयात गर्भातील गर्भ अशा दुर्मिळ गुंतागुंत आढळून आली. सदर महिलेवरील शस्त्रक्रिया यशस्वी झाली. या प्रकारास वैद्यकीय भाषेत Fetus in fetu म्हणून ओळखले जाते.

MHADA Konkan Board Housing Lottery 2024 Result: म्हाडा च्या कोकण विभागातील घरांसाठी निकालाची प्रतिक्षा संपली; 5 फेब्रुवारीला housing.mhada.gov.in पहा भाग्यवान विजेत्यांची नावं

Dipali Nevarekar

अर्जदारांनी 20% घरांना पसंती दिली, तर इंटिग्रेटेड म्हाडाच्या गृहनिर्माण योजनेतील 15% घरांनाही मागणी होती. मात्र, या योजनेतील 713 घरांसाठी एकही अर्ज आलेला नाही.

Mumbai Roads: मुंबईकरांना दिलासा! शहरातील सर्व रस्ते पावसाळ्यापूर्वी वाहतुकीसाठी योग्य करण्याचे BMC चे आदेश; 31 मे निश्चित केली अंतिम तारीख

Prashant Joshi

मंगळवारी बीएमसीने 2025-26 या आर्थिक वर्षासाठी 74 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेचा अर्थसंकल्प सादर केला, जो आतापर्यंतचा सर्वात मोठा अर्थसंकल्प आहे. हा अर्थसंकल्प महापालिका आयुक्त आणि प्रशासन भूषण गगराणी यांनी सादर केला. बीएमसीचे आयुक्त म्हणून नियुक्ती झाल्यानंतरचा हा त्यांचा पहिला अर्थसंकल्प आहे.

BMC Budget 2025: लंडन आयच्या धर्तीवर Mumbai Eye ते बेस्ट उपक्रमासाठी 1000 कोटींचे अनुदान;पालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पहा बीएमसीच्या बजेट मध्ये कशाचा समावेश?

Dipali Nevarekar

मुंबई महानगरपालिकेचं बजेट यंदा मागील बजेटच्या तुलनेत सुमारे 14% अधिक आहे. मुंबई महापालिका शिक्षण खात्याचं यंदाच्या वर्षीच बजेट 3955 कोटी रुपये आहे.

Advertisement

Illegal Bangladeshi Migrants in Mumbai: हिंदू जनजागृती समितीने जाहीर केली 'बांगलादेशी हटाओ देश बचाओ' मोहीम; मुंबईत सुमारे दहा लाख स्थलांतरीत असल्याचा दावा

Prashant Joshi

सोमवारी शहरात पत्रकार परिषदेत, हिंदू जनजागृती समितीने सांगितले की, शहर आणि नवी मुंबईसह ज्या भागात बांगलादेशी स्थलांतरीत स्थायिक झाल्याचा संशय आहे, तेथे सार्वजनिक रॅली आयोजित केल्या जातील. त्यांनी नागरिकांना संशयित घुसखोरांची माहिती पोलिसांना देण्यास सांगितले आहे.

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजना लाभावर पाणी, अनेक महिलांचे अर्ज बाद; जाणून घ्या सविस्तर

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

Ladki Bahin Yojana Eligibility: राज्य सरकार लाडकी बहीण योजना लाभार्थ्यांच्या अर्जाची फेरपडताळणी करणार आहे. ज्याध्ये निकषाबाहेर जाणून किंवा नियमबाह्य पद्धतीने लाभ मिळविलेल्या महिलांचे अर्ज बाद केले जाणार आहेत.

Pune Guillain-Barré Syndrome: पुण्यात आता सीलबंद पाण्याचे कॅन आणि बाटल्याही सुरक्षित नाहीत; RO प्लांटमधील पाण्यात आढळले बॅक्टेरिया

Prashant Joshi

नवीन विलीन झालेल्या गावांच्या पाण्यात, शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरच्या पाण्यात दूषितता आढळल्यानंतर आता, कॅन, जार आणि बाटल्यांमध्ये पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या रिव्हर्स ऑस्मोसिस (RO) प्लांटच्या पाण्यात दुषितता आणि जीवाणू आढळून आल्याची माहिती पुणे महापालिकेने दिली आहे.

Mumbai Crime News: अल्पवयीन मुलीवर महिलेकडून लैंगिक अत्याचार; आरोपीस अटक, POCSO Act अन्वये गुन्हा दाखल

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

मुंबई पोलिसांनी एका 24 वर्षीय महिलेला 17 वर्षीय मुलीचे अपहरण करून लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी अटक केली. तीन दिवसांच्या शोध मोहिमेनंतर विरारमधील एका रिसॉर्टमध्ये या दोघांना शोधण्यात पोलिसांना यश आले.

Advertisement

Ambernath Woman Murder Case: अंबरनाथमध्ये आर्थिक वाद आणि लग्नाच्या तगाद्यामुळे संतापलेल्या तरुणाने केली 35 वर्षीय विवाहित महिलेची हत्या; आरोपीला अटक

Bhakti Aghav

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत महिलेने आरोपीला उसने पैसे दिले होते. सीमाने ते पैसे परत कर किंवा माझ्याशी लग्न कर, असा तगादा लावला होता. त्यानंतर आरोपीने तिची हत्या केली.

Pune Fruits, Flowers, and Vegetable Exhibition: पुण्यात PMC तर्फे फळे, फुले आणि भाजीपाल्याचे भव्य प्रदर्शन; जाणून घ्या तारखा, ठिकाण, वेळ, तिकिट

Prashant Joshi

प्रदर्शनात शोभेच्या वनस्पती, फळझाडांची मांडणी, गुलाब व हंगामी फुले आणि कलात्मक फुलांच्या सजावटीसह विविध प्रकारचे वनस्पती उपलब्ध असतील. बाग आणि वृक्ष संवर्धन उपक्रमांना समर्पित विशेष विभाग देखील बनवले जातील.

BMC Khichdi Scam: मुंबई उच्च न्यायाल्याकडून Suraj Chavan यांना जामीन मंजूर; वर्षभराने पडणार जेलबाहेर आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय

Dipali Nevarekar

मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने सूरज चव्हाणची चौकशी केली होती. त्यानंतर ईडी कडून सूरज चव्हाणला अटक करण्यात आली.या प्रकरणी अमोल कीर्तीकर यांचीही चौकशी झाली होती.

BMC Budget 2025-26: बीएमसी चा यंदाचा अर्थसंकल्प 74366 कोटी रुपये; विकासकामांसाठी मोठी तरतूद

Dipali Nevarekar

यंदाचा मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प 74366 कोटी रुपयांचा आहे. यामध्ये 43162 रुपये भांडवली खर्च म्हणून ठेवण्यात आले आहेत, जे विकासकामांवर खर्च येणारे पैसे आहेत.

Advertisement

Maharashtra Financial Fraud Cases: महाराष्ट्रात 2024 मध्ये तब्बल 2.19 लाख आर्थिक फसवणुकीच्या घटना, 38,872.14 कोटी रुपयांचे नुकसान; मुंबई 51,873 प्रकरणांसह अव्वल

Prashant Joshi

ठाणे येथे फसवणुकीचे 35,388 गुन्हे दाखल झाले, त्यापैकी ठाणे शहरात 20,892, नवी मुंबईत 13,260 आणि ठाणे ग्रामीणमध्ये 1,236 गुन्हे दाखल झाले. ठाणे जिल्ह्यात एकूण 8,583.61 कोटी रुपयांची फसवणूक झाली. मीरा भाईंदर आणि वसई विरार भागात एकूण 1,431.18 कोटी रुपयांचे 11,754 गुन्हे दाखल झाले.

BMC Budget 2025-26 Live Streaming: बीएमसी चा आज अर्थसंकल्प; इथे पहा थेट प्रक्षेपण (Watch Video)

Dipali Nevarekar

गेल्या वर्षीचा BMC चा अर्थसंकल्प ₹६०,००० कोटी होता.यंदाही या बजेट मध्ये वाढ होण्याचा अंदाज आहे.

Mumbai Shocker: मुंबई मध्ये शाळेच्या आवारात मुलीला अज्ञाताकडून इंजेक्शन दिल्याचा प्रकार; पालकांच्या तक्रारीवरून पोलिसांनी सुरू केला तपास

Dipali Nevarekar

तक्रारीमध्ये पीडीत मुलीला इंजेक्शनच्य माध्यमातून काही अज्ञात पदार्थ दिल्याचं समजते पण यामध्ये पीडीतेसोबत कोणत्याही अत्याचाराच्या गोष्टीचा उल्लेख नाही.

Aurangabad: सिल्लोडमध्ये मराठा आरक्षणाची मागणी करत अजून एका कार्यकर्त्याची आत्महत्या; सुसाईड नोटद्वारे खुलासा

Prashant Joshi

समाधानचे चुलत भाऊ गजानन काळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, समाधान खूप अडचणीत होते आणि त्यांच्यावर मोठे कर्ज होते. नैसर्गिक आपत्ती आणि मातीच्या सुपीकतेच्या समस्यांमुळे त्यांना शेतीत मोठे नुकसान झाले. ते मराठा आरक्षण चळवळीशी संबंधित कार्यकर्ते होते.

Advertisement
Advertisement