Ambernath Woman Murder Case: अंबरनाथमध्ये आर्थिक वाद आणि लग्नाच्या तगाद्यामुळे संतापलेल्या तरुणाने केली 35 वर्षीय विवाहित महिलेची हत्या; आरोपीला अटक
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत महिलेने आरोपीला उसने पैसे दिले होते. सीमाने ते पैसे परत कर किंवा माझ्याशी लग्न कर, असा तगादा लावला होता. त्यानंतर आरोपीने तिची हत्या केली.
Ambernath Woman Murder Case: सोमवारी दुपारी अंबरनाथ पूर्व (Ambernath East) येथे सीमा कांबळे नावाच्या 35 वर्षीय महिलेची तिचा प्रियकर राहुल भिंगकर (वय, 29) याने हत्या (Muder) केली. महिलेचा मृतदेह अंबरनाथमधील साई बाबा मंदिराच्या पायऱ्यांजवळ आढळून आला. त्यानंतर ही घटना उघडकीस आली. सीमा कांबळे यांचा मृतदेह रक्ताने माखलेला आढळला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत महिलेने आरोपीला उसने पैसे दिले होते. सीमाने ते पैसे परत कर किंवा माझ्याशी लग्न कर, असा तगादा लावला होता. त्यानंतर आरोपीने तिची हत्या केली.
सीमावर चाकूने वार -
प्रत्यक्षदर्शींनी पोलिसांना सांगितले की, सीमा आणि राहुल यांच्यात उड्डाणपुलाजवळ हिंसक वाद झाला. यादरम्यान राहुलने सीमावर अनेक वेळा चाकूने हल्ला केला, ज्यामुळे ती जमिनीवर कोसळली. त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेला. तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी सीमाला जवळच्या रुग्णालयात दाखल केले आणि यासंदर्भात पोलिसांना माहिती दिली. परंतु, रुग्णालयात पोहोचल्यानंतर सीमाला मृत घोषित करण्यात आले. (हेही वाचा -Shirdi Sai Sansthan Workers Stabbed To Death: शिर्डी दुहेरी हत्याकांड! साई संस्थानच्या 2 कर्मचाऱ्यांची चाकूने वार करून हत्या)
आरोपीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल -
शिवाजी नगर पोलिसांनी आरोपी राहुल विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून त्याला अटक करण्यात आली. राहुलने दिलेल्या कबुलीजवाबानुसार, सीमा तिच्या पतीपासून विभक्त झाली होती. ती त्याच्यासोबत रिलेशनशिपमध्ये होती. आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या राहुलने सीमाकडून उसनवारीवर पैसे मागितले. परंतु, राहुल हे पैसे परत करू शकला नाही. त्यानंतर सीमाने राहुलला पैसे परत कर अन्यता माझ्याशी लग्न कर असा तगादा लावला. त्यानंतर यावरून दोघांमध्ये नेहमी वाद होत असे. (हेही वाचा -Beed Sarpanch Murder Case: सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी पाण्यात उभं राहून केले आंदोलन)
दरम्यान, सोमवारी अंबरनाथ रेल्वे स्टेशनला जाणाऱ्या ब्रीजवर या दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर आरोपी राहुलने महिलेवर धारधार शस्त्राने हल्ला केला आणि तिची हत्या केली. अंबरनाथ विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त शैलेश काळे यांना सांगितले की, आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे. प्राथमिक तपासात आर्थिक वादातून ही हत्या झाल्याचे दिसून येत आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)