ठळक बातम्या

Pahalgam Terror Attack and IPL: खेळाडू आणि अंपायर काळी पट्टी बांधणार, आतषबाजी नाही, चीअरलीडर्स नाही; दहशतवादी हल्ल्यानंतर आजच्या सामन्यात 'हे' नियम पाळले जाणार

Jyoti Kadam

सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स सामन्यापूर्वी, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) स्पर्धेसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. ज्यामध्ये असे म्हटले आहे की खेळाडू आणि पंच काळ्या पट्ट्या बांधतील, सामन्या आधी किंवा नंतर आतषबाजी होणार नाही.

Pahalgam Terrorist Attack: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील पाच पर्यटकांचा मृत्यू; श्रीनगरमध्ये मदत कक्ष सुरू, कोणतीही अडचण किंवा आपत्कालीन परिस्थितीसाठी संपर्क क्रमांक जारी

Prashant Joshi

हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या पाच जणांपैकी तीन जण राज्यातील ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली भागातील रहिवासी होते, असे ठाण्याच्या जिल्हा माहिती अधिकाऱ्यांनी सांगितले. हेमंत जोशी, संजय लेले आणि अतुल मोने अशी मृतांची नावे आहेत. पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील मृतांपैकी एक, अतुल मोने, भारतीय रेल्वेमध्ये वरिष्ठ विभाग अभियंता होते.

Travis Head: आरसीबीच्या चिन्नास्वामी स्टेडियमनंतर, ट्रॅव्हिस हेड वानखेडे स्टेडियमवरमध्ये घुसला; सचिन तेंडुलकरच्या पुतळ्याला हैदराबादची जर्सी घातली (Watch Video)

Jyoti Kadam

ट्रॅव्हिस हेड त्याच्या सहकाऱ्यासह उबर बाईक-टॅक्सी जाहिरातीत 'वानखेडे स्टेडियम'मध्ये घुसताना दिसत आहे. तेथील रक्षकांना फसवून त्याने तेथे सचिन तेंडुलकरच्या पुतळ्याला हैदराबादची जर्सी घातली.

Pahalgam Terrorist Attack: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात पुण्यातील 67 पर्यटकांचा गट थोडक्यात बचावला; घरी परतण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडे मागितली मदत (Video)

Prashant Joshi

पुण्यातील 67 पर्यटकांचा गट या हल्ल्यात थोडक्यात बचावला असून, त्यांनी महाराष्ट्र सरकारला त्यांना सुरक्षित घरी परतण्याची सुविधा देण्याचे आवाहन केले आहे. याबाबत त्यांनी एक व्हिडीओ बनवला आहे.

Advertisement

Pahalgam Terror Attack: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय खेळाडूंचा राग अनावर; चोख प्रत्युत्तर देण्याचा दिला इशारा

Jyoti Kadam

22 एप्रिल रोजी दुपारी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे 26 जणांना आपला जीव गमवावा लागला. दहशतवाद्यांनी पर्यटकांना लक्ष्य केले आणि अंदाधुंद गोळीबार केला. टीम इंडियाच्या खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला आहे. मृतांच्या कुटुंबानाप्रती दुखद भावना व्यक्त केल्यात.

'Surgical Strike 3.0': पहलगाम दहशतवादी हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू; संतप्त नेटिझन्सनी पाकिस्तानविरुद्ध सर्जिकल स्ट्राइकसह कठोर सूड घेण्याची मागणी

Prashant Joshi

हा हल्ला मंगळवारी दुपारी सुमारे 2:30 वाजता पहलगामपासून सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या बैसारनच्या निसर्गरम्य मैदानात घडला, जिथे पर्यटक ट्रेकिंग आणि विश्रांतीसाठी येतात. सशस्त्र दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला, ज्यामुळे 26 जण ठार झाले आणि अनेक जण जखमी झाले.

KL Rahul Walking Away from Sanjiv Goenka: अजूनही काही बदलं नाही! एलएसजीचे मालक संजीव गोयंका यांच्यापासून पळून जाताना केएल राहुल (Watch Video)

Jyoti Kadam

आयपीएल 2025 च्या सामन्यानंतर लखनौ सुपर जायंट्सचे मालक संजीव गोयंका केएल राहुल हस्तांदोलन करण्यासाठी गेले. परंतु त्याच वेळी केएल राहूल त्यांच्यापासून दूर जाताना दिसला.

Pahalgam Terrorist Attack: 'आम्हाला दोष देऊ नका, आमच्या देशाचा याच्याशी संबंध नाही'; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, संरक्षण मंत्री Khawaja Asif यांचे भारताबाबत विवादित वक्तव्य (Video)

Prashant Joshi

पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ, जे PML-N पक्षाचे वरिष्ठ नेते आणि पंतप्रधान शहबाज शरीफ यांचे जवळचे सहकारी आहेत, यांनी 22 एप्रिल रोजी झालेल्या हल्ल्यात पाकिस्तानचा सहभाग नसल्याचा दावा केला. त्यांनी म्हटले की, आम्ही कोणत्याही प्रकारच्या दहशतवादाला पाठिंबा देत नाही.

Advertisement

PSL 2025: आनंद साजरा करायला गेला अन् फुकटचा मार खाल्ला; पाकिस्तान सुपर लीगमध्ये पहा काय घडल (Watch Video)

Jyoti Kadam

उबैद शाहने विकेट सेलिब्रेशन करताना विकेटकीपर उस्मान खानचा हात चुकला अन् त्याच्याकडून उस्मान खानच्या डोक्याला मार लागला. मुलतान सुल्तान्स विरुद्ध लाहोर कलंदर्स पीएसएल 2025 सामन्यादरम्यानही अशीच एक घटना घडली.

Maharashtra Water Crisis: राज्यातील पाणी टंचाईबाबत सरकार अ‍ॅक्शन मोडवर; 15 जुलैपर्यंत पाणीसाठा पुरेल असे नियोजन करण्याचे DCM Eknath Shinde यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

टीम लेटेस्टली

नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी अनेक किलोमीटर पायपीट करावी लागत असून, नाशिक, यवतमाळ, बीड, जालना, लातूर, परभणी, धाराशिव, नांदेड आणि छत्रपती संभाजीनगर यांसारख्या जिल्ह्यांतील ग्रामीण भागांमध्ये पाण्याची कमतरता तीव्र झाली आहे. 2024 च्या अपुऱ्या मानसूनमुळे आणि दीर्घकाळ चाललेल्या उन्हाळ्यामुळे ही समस्या अधिक गंभीर बनली आहे.

KL Rahul New Milestone: केएल राहुलने आयपीएलमध्ये इतिहास रचला! विराट कोहली, डेव्हिड वॉर्नरसह सर्व फलंदाजांना टाकले मागे

Jyoti Kadam

दिल्ली कॅपिटल्सचा स्टार खेळाडू केएल राहुलने इंडियन प्रीमियर लीग 2025 मध्ये त्याच्या माजी संघ लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध शानदार खेळी करून इतिहासाच्या पानांवर आपले नाव कोरले आहे. या सामन्यात दिल्लीने लखनऊचा 8 गडी राखून पराभव केला.

Pahalgam Terrorist Attack: पंतप्रधान नरेंद्र मोदी सौदी अरेबियाचा दौरा अर्धवट सोडून दिल्लीत परतले; पहलगाम हल्ल्याबाबत विमानतळावरच घेतला NSA आणि EAM कडून आढावा, आज होणार उच्चस्तरीय बैठक

Prashant Joshi

दिल्लीत पोहोचल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहलगाम हल्ल्याबाबत विमानतळावर परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) अजित डोभाल यांच्याशी बैठक घेतली आणि हल्ल्याची, जम्मू आणि काश्मीरमधील परिस्थितीची माहिती घेतली. आज पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी (CCS) ची बैठक होणार आहे.

Advertisement

Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ल्यानंतर एअर इंडियाची संकटकाळात धाव; श्रीनगरहून 2 जादा विमानांचं उड्डाण आणि ‘या’ सेवा मोफत

Jyoti Kadam

SRH vs MI TATA IPL 2025 Live Streaming: आज सनरायझर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स यांच्यात रोमांचक सामना, जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाइव्ह सामना एन्जॉय करायचा

Jyoti Kadam

टाटा आयपीएल 2025 चा 41 वा सामना आज म्हणजेच 23 एप्रिल रोजी सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात खेळला जाणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जाईल. सनरायझर्स हैदराबाद संघाचा हा 8 वा सामना असेल.

Terrorist Attack in Pahalgam: हल्लेखोरांनी पीएम मोदींची निंदा केली, वडिलांना इस्लामिक श्लोक म्हणायला लावले; पुण्याच्या जखमी संतोष जगदाळे यांंची लेक आसावरी जगदाळे ने सांगितला थरारक प्रसंग

Dipali Nevarekar

आसावरीने प्रतिक्रिया देताना हे हल्लेखोर अन्य सामान्य लोकांप्रमाणेच कपडे घालून आले होते. दहशतवाद्यांनी त्यांच्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठिंबा दिल्याचा आरोप केला, त्यानंतर त्यांनी काही विधाने करून काश्मिरी अतिरेकी निष्पाप लोक, महिला आणि मुलांना मारतात हे नाकारले. असे म्हटलं आहे.

Pahalgam Terror Attack: पहेलगाम च्या दहशतवादी हल्ल्यात दिलीप डिसले, अतुल मोने या महाराष्ट्रातील 2 पर्यटकांचा मृत्यू; 4 पुरूषांवर उपचार सुरु

Dipali Nevarekar

मुरलीधर मोहोळ यांनी संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे दोन्ही जखमींवर योग्य ते उपचार सुरु असून त्यांना सर्वतोपरी मदत पोहोचविली जाईल असं सांगितलं आहे.

Advertisement

LSG vs DC TATA IPL 2025 Scorecard: दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सला 8 विकेट्सने दिली मात; अभिषेक पोरेल, केएल राहुल यांचे अर्धशतक, पहा सामन्याचा स्कोअरकार्ड

Nitin Kurhe

दिल्ली कॅपिटल्सने लखनौ सुपर जायंट्सला 8 विकेट्सने पराभूत केले. दिल्ली कॅपिटल्सने सामन्यात दिल्लीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि शानदार कामगिरी करत केवळ 17.5 षटकांत लक्ष्य गाठले.

Pahalgam Terror Attack: 'जा जाऊन मोदींना सांगा' कर्नाटक मधील व्यावसायिकाला ठार मारल्यानंतर त्याच्या पत्नीवर खेकसला हल्लेखोर

Dipali Nevarekar

पल्लवीने दिलेल्या माहितीनुसार, पहेलगाम मध्ये अंदाजे 500 पर्यटक होते. अनेक नव्याने लग्न झालेली जोडपी होती पण हल्लेखोरांनी बहुतांशी पुरूषांनाच ठार केले.

LSG vs DC TATA IPL 2025 Scorecard: लखनौ सुपर जायंट्सने दिल्ली कॅपिटल्सला दिले 160 धावांचे लक्ष्य; मुकेश कुमारने घेतल्या 4 विकेट्स, स्कोअरकार्ड पहा

Nitin Kurhe

प्रथम फलंदाजी करताना लखनौ सुपर जायंट्सने 6 विकेट्स गमावून 159 धावा केल्या. दिल्लीचा कर्णधार अक्षर पटेलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.

Candlelight March in Pahalgam: पहेलगाम मध्ये पर्यटकांवर हल्ल्याच्या निषेधार्थ स्थानिकांचा कॅन्डल मार्च (Watch Video)

Dipali Nevarekar

आज अनेक स्थानिक, दुकानदार रस्त्यावर उतरले त्यांनी कॅन्डल मार्च करत घटनेचा निषेध नोंदवला आहे.

Advertisement
Advertisement