'Surgical Strike 3.0': पहलगाम दहशतवादी हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू; संतप्त नेटिझन्सनी पाकिस्तानविरुद्ध सर्जिकल स्ट्राइकसह कठोर सूड घेण्याची मागणी
हा हल्ला मंगळवारी दुपारी सुमारे 2:30 वाजता पहलगामपासून सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या बैसारनच्या निसर्गरम्य मैदानात घडला, जिथे पर्यटक ट्रेकिंग आणि विश्रांतीसाठी येतात. सशस्त्र दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला, ज्यामुळे 26 जण ठार झाले आणि अनेक जण जखमी झाले.
काश्मीरमधील पहलगाम येथे काल झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर, नेटिझन्सनी सोशल मीडियावर सर्जिकल स्ट्राईक 3.0 ची अंमलबजावणी करण्याची मागणी केली आहे. दहशतवादी गट आणि त्यांच्या समर्थकांवर जलद आणि निर्णायक सूड घेण्याची मागणी लोक करत आहेत. या हल्ल्याबाबत सोशल मिडियावर अनेकांनी आपला राग व्यक्त करत, त्यांनी भारत सरकारला कृती आणि प्रतिक्रिया धोरणाऐवजी सक्रिय दृष्टिकोन स्वीकारण्याचे आवाहन केले आहे. यापुढे कोणतेही इशारे किंवा धमक्या न देता थेट कारवाईची मागणी होत आहे.
हा हल्ला मंगळवारी दुपारी सुमारे 2:30 वाजता पहलगामपासून सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या बैसारनच्या निसर्गरम्य मैदानात घडला, जिथे पर्यटक ट्रेकिंग आणि विश्रांतीसाठी येतात. सशस्त्र दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला, ज्यामुळे 26 जण ठार झाले आणि अनेक जण जखमी झाले. या दहशतवाद्यांना शोधण्यासाठी सुरक्षा दलांनी मोठ्या प्रमाणात शोध मोहीम सुरू केली आहे. पहलगामच्या जंगलात राष्ट्रीय रायफल्स, सीआरपीएफ आणि जम्मू-काश्मीर पोलिसांचे मोठे ऑपरेशन सुरू आहे. या शोध मोहिमेत लष्कराचे हेलिकॉप्टर, ड्रोन आणि स्निफर डॉग देखील तैनात करण्यात आले आहेत. (हेही वाचा: Pahalgam Terrorist Attack: 'आम्हाला दोष देऊ नका, आमच्या देशाचा याच्याशी संबंध नाही'; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, संरक्षण मंत्री Khawaja Asif यांचे भारताबाबत विवादित वक्तव्य)
नेटिझन्सनी पाकिस्तानविरुद्ध सर्जिकल स्ट्राइकसह कठोर सूड घेण्याची मागणी-
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)