Pahalgam Terror Attack: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय खेळाडूंचा राग अनावर; चोख प्रत्युत्तर देण्याचा दिला इशारा

22 एप्रिल रोजी दुपारी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे 26 जणांना आपला जीव गमवावा लागला. दहशतवाद्यांनी पर्यटकांना लक्ष्य केले आणि अंदाधुंद गोळीबार केला. टीम इंडियाच्या खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला आहे. मृतांच्या कुटुंबानाप्रती दुखद भावना व्यक्त केल्यात.

PC-X

Pahalgam Terror Attack: जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला आहे. या हल्ल्यात सुमारे 26 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक लोक गंभीर जखमी झाले आहेत. घटनास्थळी तैनात असलेल्या सुरक्षा दलांनी तात्काळ ताबा घेतला आणि संपूर्ण परिसरात शोध मोहीम सुरू केली. सीआरपीएफची क्विक रिअ‍ॅक्शन टीमही पाठवण्यात आली आहे. या घटनेनंतर भारतीय खेळाडूंनी दहशतवाद्यांच्या या कृत्याचा निषेध केला आणि न्यायाची मागणी केली आहे. गौतम गंभीर, विराट कोहली, युवराज सिंग, शुभमन गील आणि इतर भारतीय क्रिकेटर्सचा यात समावेश आहे. SRH vs MI TATA IPL 2025 Live Streaming: आज सनरायझर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स यांच्यात रोमांचक सामना, जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाइव्ह सामना एन्जॉय करायचा

गौतम गंभीरने व्यक्त केला शोक

गौतम गंभीरने दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या लोकांबद्दल शोक व्यक्त केला आणि सोशल मीडियावर लिहिले की तो मृतांच्या कुटुंबियांसाठी प्रार्थना करत असल्याचे लिहिले आहे. यासाठी पूर्णपणे जबाबदार असलेल्यांना त्याची किंमत मोजावी लागेल. भारत हल्ला करेल. गौतम गंभीर हे भाजपचे माजी खासदार राहिले आहेत. हल्ल्याची माहिती मिळताच गृहमंत्री अमित शहा यांनी आपत्कालीन बैठक बोलावली आणि ते ताबडतोब श्रीनगरला रवाना झाले. त्यांनी सुरक्षा अधिकाऱ्यांकडून घटनेची माहिती घेतली आणि रुग्णालयात जखमींना भेटण्याची योजना आखली. पंतप्रधान मोदींनीही या हल्ल्याचा तीव्र निषेध केला आणि दोषींना सोडले जाणार नाही असे सांगितले. शुभमन गिलने या हल्ल्याचा निषेध केला.

याशिवाय 32 प्रवासी जखमी झाले. जखमींपैकी बहुतेक जण महाराष्ट्र आणि गुजरातमधील होते. हल्ल्यानंतर सरकार आणि लष्कर सतर्क आहे आणि परिसरात मोठ्या प्रमाणात शोध मोहीम राबवली जात आहे. सरकारने स्पष्टपणे सांगितले आहे की ते दहशतवादाविरुद्ध कठोर आहे आणि प्रवाशांच्या सुरक्षेत कोणत्याही परिस्थितीत कोणतीही चूक होऊ दिली जाणार नाही.

शुभमन गील

'काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्याबद्दल ऐकून मन हेलावून गेले. माझ्या भावना मृतांच्या कुटुंबियांसोबत आहेत. त्यांच्यासाठी शांती आणि शक्तीसाठी प्रार्थना करतो', असे शुभमन गीलने त्याच्या पोस्टमध्ये लिहिले.

केएल राहूल

'पहलगाममध्ये निष्पाप पर्यटकांवर झालेल्या निंदनीय दहशतवादी हल्ल्याबद्दल ऐकून खूप दुःख झाले', असे केएल राहूलने त्याच्या पोस्टमध्ये लिहिले.

विरेंद्र सेहवाग

'विरेंद्र सेहवागने त्याच्या पोस्टमध्ये लिहिले की,ज्यांनी आपले प्रियजन गमावले आहेत त्यांच्यासाठी मी दुःखी आहे.' जखमींसाठी प्रार्थना करतो.

यूवराज सिंग

यूवराज सिंगने त्याच्या पोस्टमध्ये लिहिले की, 'पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या हल्ल्याने खूप दुःख झाले आहे. पीडितांसाठी आणि त्यांच्या कुटुंबियांना शक्ती मिळावी यासाठी प्रार्थना करतो 🙏🏻 आपण आशा आणि मानवतेने एकत्र उभे राहूया.'

इरफान पठान

'प्रत्येक वेळी जेव्हा एखादा निष्पाप जीव जातो तेव्हा मानवता हरवते. आज काश्मीरमध्ये काय घडले ते पाहणे आणि ऐकणे हृदयद्रावक आहे. मी काही दिवसांपूर्वीच तिथे होतो - हे दुःख खूप जवळचे वाटते', असे इरफान पठानने त्याच्या पोस्टमध्ये लिहिले.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement