ठळक बातम्या

Pune Metro Update: पुण्यातील खडकी मेट्रो स्टेशन मे अखेरपर्यंत सुरू होणार; रेंज हिल्सला लागणार आणखी दोन वर्षे

Prashant Joshi

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका (पीसीएमसी) ते स्वारगेट मेट्रो स्टेशन मार्ग 24 सप्टेंबर 2024 रोजी पूर्णपणे कार्यान्वित झाला. परंतु खडकी आणि रेंज हिल्स स्टेशन पूर्ण होण्यास विलंब झाल्यामुळे ते बंद आहेत, ज्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे.

भारताने उद्धवस्त केली पाकिस्तानची लाहोर मधील Air Defence System; 7-8 मे च्या रात्री पाकिस्तान कडून Military Targets वर हल्ल्याचा प्रयत्न

Dipali Nevarekar

भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या हवाई संरक्षण प्रणालींना लक्ष्य करण्यासाठी हार्पी ड्रोनचा वापर केल्याचेही सांगण्यात आले आहे.

Who Is India's Next Test Captain: रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर टीम इंडियाचा पुढचा कसोटी कर्णधार कोण असेल? शर्यतीत 'ही' तीन नावे पुढे

Nitin Kurhe

ऑस्ट्रेलिया दौऱ्यापासून याबद्दल अटकळ बांधली जात होती, पण त्याच वेळी असे वृत्त होते की रोहित अद्याप कसोटीतून निवृत्त होण्याच्या मनःस्थितीत नाही आणि इंग्लंड दौऱ्यावर जाईल. पण रोहितने त्याचा निर्णय जाहीर केला. आता प्रश्न असा आहे की रोहितच्या जागी कसोटी संघाचे नेतृत्व कोण करणार.

Real Estate AI: भारतात एआय वाढीसाठी रिअल इस्टेट आणि 45 TWh अतिरिक्त वीजेची गरज- डेलॉइट

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

भारताला 2030 पर्यंत 50 दशलक्ष चौरस फूट रिअल इस्टेट आणि 45 TWh अतिरिक्त वीज ची गरज भासू शकते, जे त्याच्या वाढत्या AI क्षेत्राला समर्थन देतील, Deloitte ने अहवाल दिला. प्रमुख धोरणात्मक सुधारणा आणि पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा आवश्यक आहेत.

Advertisement

Pune Cab Fares: पुण्यात 1 मेपासून Ola, Uber, Rapido कॅब सेवांची नवीन दरानुसार शुल्क आकारण्यास सुरुवात; जाणून घ्या प्रति किलोमीटर भाडे

Prashant Joshi

या नवीन दर प्रणालीबाबत पुण्यातील प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. काहींनी चालकांना दोष दिला आहे, तर काहींनी म्हटले आहे की यामुळे कॅबच्या परवडण्यावर आणि वापरावर परिणाम होईल. नवीन दराबाबतच्या निर्णयामुळे गेल्या काही दिवसांत पुण्यात प्रवासी आणि चालक यांमध्ये भांडणे आणि मतभेद निर्माण झाले आहेत.

Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूरअंतर्गत भारतीय कारवाईत किमान 100 दहशतवादी ठार; Rajnath Singh यांची सर्वपक्षीय बैठकीत माहिती

Prashant Joshi

संरक्षण मंत्रालयाच्या निवेदनानुसार, या कारवाईत 100 हून अधिक दहशतवादी ठार झाले, तर 60 जण जखमी झाले. जैश-ए-मोहम्मदचा संस्थापक मसूद अझहर याचे 10 नातेवाईक आणि चार निकटवर्तीय ठार झाल्याची माहिती आहे, तसेच लष्कर-ए-तैयबाचा हाफिज अब्दुल मलिक हा उच्चस्तरीय दहशतवादी मुरिदके येथे ठार झाला.

Scotch Whisky Prices May Drop: आयात शुल्कात घट; स्कॉच व्हिस्कीच्या किमती कमी होण्याची शक्यता

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

भारत-यूके मुक्त व्यापार करार एका दशकात स्कॉच व्हिस्की आयात शुल्क 150% वरून 40% पर्यंत कमी करण्यासाठी सज्ज आहे. याचा भारतातील किमती, स्थानिक बाजारपेठा आणि ग्राहकांवर कसा परिणाम होईल ते जाणून घ्या.

Mumbai Metro Line 9 Update: प्रतीक्षा संपली! 10 मे पासून मुंबई मेट्रो लाईन 9 मीरा-भाईंदर कॉरिडॉरच्या पहिल्या टप्प्याची चाचणी; लवकरच जनतेसाठी सुरु होणार सेवा

Prashant Joshi

ट्रायल रनदरम्यान रुळ, सिग्नलिंग, विद्युत पुरवठा, आणि स्थानकांवरील सुविधा यांची तपासणी केली जाईल. या चाचण्या यशस्वी झाल्यावर मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्त (CMRS) यांच्याकडून अंतिम मंजुरी घेतली जाईल, ज्यानंतर प्रवासी सेवेला सुरुवात होईल.

Advertisement

Mumbai University Admission 2025-26: मुंबई विद्यापीठाच्या पदवी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया आजपासून सुरू

Dipali Nevarekar

आजपासून सुरू झालेल्या या प्रवेश प्रक्रियेमध्ये पहिली यादी 27 मे दिवशी जाहीर केली जाईल तर नियमित वर्ग 13 जून पासून सुरू होणार आहेत.

Papstwahl Conclave: व्हॅटिकन कॉन्क्लेव्ह सुरू, पांढरा धूर निघण्याची शक्यता; जगाला मिळणार New Pope

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

पोप फ्रान्सिसच्या निधनानंतर नवीन पोप निवडण्यासाठी पोप कॉन्क्लेव्ह सुरू झाला आहे. मतदान प्रक्रिया, पांढऱ्या धुराचा संदेश आणि नवीन पोपचे पहिले दर्शन जग कधी पाहता येईल याबद्दल जाणून घ्या.

महाराष्ट्रात पुन्हा धावणार पारंपारिक 3 x 2 आसन व्यवस्था असणाऱ्या बसेस; MSRTC ने दिली नवीन गाड्या खरेदीस मान्यता, 204 स्थानकांवर सुरु होणार ATM ची सुविधा

टीम लेटेस्टली

एमएसआरटीसीने आपल्या ताफ्यात 3,000 नवीन बसेस समाविष्ट करण्यास मंजुरी दिली आहे, ज्या मार्च 2025 पासून टप्प्याटप्प्याने ताफ्यात सामील होतील. या बसेस पारंपरिक 3 x 2 आसन व्यवस्थेसह असतील, ज्यामुळे प्रत्येक बसमध्ये 45-50 प्रवासी बसू शकतील.

Security Alert in Maharashtra: पाकिस्तानमधील कारवाईनंतर महाराष्ट्रात अलर्ट जारी; राज्यातील पर्यटन आणि आध्यात्मिक स्थळांवर सुरक्षा वाढवण्यात आली

Prashant Joshi

खबरदारी म्हणून, राज्यातील पर्यटन आणि आध्यात्मिक स्थळांवर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. सार्वजनिक सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी या सर्व ठिकाणी अधिक दक्षता ठेवण्याच्या सूचना पोलिसांना देण्यात आल्या आहेत.

Advertisement

Operation Sindoor ची माहिती देण्यासाठी केंद्र सरकारने बोलावली सर्वपक्षीय बैठक; Rajnath Singh, Amit Shah, Rahul Gandhi उपस्थित

Dipali Nevarekar

संरक्षण मंत्री राजनाथ सिंग या बैठकीला संबोधित करणार आहेत. दरम्यान या बैठकीत उपस्थित नसतील.

Mumbai's Gokhale Bridge Set To Open Fully: मुंबईकरांना दिलासा! लवकरच अंधेरीतील गोखले पूल वाहनचालकांसाठी पूर्णपणे खुला होण्याची शक्यता; होणार, जाणून घ्या नवे अपडेट

Prashant Joshi

हा पूल नोव्हेंबर 2022 मध्ये असुरक्षित घोषित झाल्याने बंद करण्यात आला होता. त्यानंतरच्या बांधकामातील अनेक अडथळ्यांनंतर, आता हा पूल पूर्णपणे खुला होत असल्याने अंधेरीतील वाहतूक कोंडी कमी होण्याची आणि प्रवास वेळेत बचत होण्याची अपेक्षा आहे.

Uttarakhand Helicopter Crash: उत्तराखंडच्या उत्तरकाशीमध्ये भागीरथी नदीजवळ हेलिकॉप्टर कोसळले, 5 जणांचा मृत्यू

Dipali Nevarekar

हेलिकॉप्टर क्रॅश होण्यामागील कारण अद्याप समजू शकलेले नाही असे सांगण्यात आले आहे.

Starlink Satellite Internet Services in India: लवकरच भारतामध्ये सुरु होणार Elon Musk यांच्या स्टारलिंकची उपग्रह इंटरनेट सेवा; सरकारकडून मिळाली मंजुरी- Reports

Prashant Joshi

अहवालात असे दिसून आले आहे की, कंपनीला अद्याप ‘अंतिम परवाना’ मिळालेला नाही, जो सर्व परवाना अटी पूर्ण केल्यानंतर जारी केला जाईल. स्टारलिंकच्या प्रवेशामुळे भारताच्या अंतराळ अर्थव्यवस्थेला चालना मिळेल आणि ग्रामीण भागातील डिजिटल अंतर कमी होण्याची शक्यता आहे.

Advertisement

Mumbai Weather Updates: मुंबई मध्ये मागील 24 तासांत तापमानात 7 अंशांनी घट, 32mm कोसळला पाऊस; आरोग्य जपण्याचा सल्ला

Dipali Nevarekar

मुंबई मध्ये आज 8 मे दिवशी वादळी वारा, पाऊस बरसण्याचा अंदाज आहे त्यामुळे वातावरण 24 ते 31 अंशांदरम्यान असू शकते. 9 मे दिवशी देखील ढगाळ वातावरण राहणार आहे.

Navi Mumbai Traffic Update: ठाणे-बेलापूर रोड काँक्रिटीकरणच्या कामासाठी 14 मे पर्यंत वाहतूकीसाठी बंद; पर्यायी मार्ग वापरण्याचे आवाहन

Dipali Nevarekar

मे महिन्याच्या सुरुवातीला कामाचे वेळापत्रक ठरवून, अधिकाऱ्यांचा उद्देश पावसाळा सुरू होण्यापूर्वी काँक्रिटीकरण पूर्ण करणे, रस्त्यांचे नुकसान होण्याचा धोका कमी करणे आणि दीर्घकालीन टिकाऊपणा सुनिश्चित करणे आहे.

Unseasonal Rains: कोकणात अवकाळी पावसाने आंबा, मासे आणि मीठ उद्योगांचे नुकसान, नागरिक गटाची नुकसानभरपाईची मागणी

Prashant Joshi

वॉचडॉग फाउंडेशनने सरकारला आंब्याच्या बागा, सुक्या माशांच्या साठ्यांचे आणि मिठागरांचे किती नुकसान झाले आहे याचे सर्वेक्षण (पंचनामे) करावेत आणि बाधित शेतकरी आणि उत्पादकांना पुरेशी भरपाई द्यावी अशी विनंती केली आहे.

India-Pakistan Conflict: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांचे भारत व पाकिस्तानला ‘प्रत्युत्तराची कारवाई’ थांबवण्याचे आवाहन; देऊ केली मदतीची ऑफर (Video)

Prashant Joshi

ट्रम्प यांनी या परिस्थितीला ‘अत्यंत भयानक’ संबोधत दोन्ही देशांनी तात्काळ शांतता प्रस्थापित करावी आणि चर्चेद्वारे मार्ग काढावा, असे सुचवले. त्यांनी मध्यस्थीची तयारी दर्शवत ‘मी काही मदत करू शकलो, तर मी करेन’, असे सांगितले.

Advertisement
Advertisement