ठळक बातम्या

Pakistan Ceasefire Violations: पाकिस्तानी सैन्याकडून पूंछ आणि उरीमध्ये पुन्हा गोळीबार (Watch Video)

Bhakti Aghav

उरीमध्ये अनेक निवासी भागांना लक्ष्य करण्यात येत आहे. यामुळे नागरिकांच्या घरांचे आणि वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.

India-Pakistan War: भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर जेपी नड्डा यांची अधिकाऱ्यांसोबत बैठक; वैद्यकीय व्यवस्थेचा घेतला आढावा

Bhakti Aghav

जेपी नड्डा यांना भारतातील सर्व रुग्णालये आणि आरोग्य सुविधांच्या कामकाजाच्या स्थितीबद्दल माहिती देण्यात आली. ज्यामध्ये आवश्यक औषधे आणि वैद्यकीय पुरवठ्याची उपलब्धता, पुरेशी पायाभूत सुविधा आणि अग्निसुरक्षा उपायांची माहिती समाविष्ट आहे.

Pakistan च्या तोंडावर चांगली चपराक, UAE ने PSL चे आयोजन करण्यास दिला नकार

Nitin Kurhe

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला त्यांच्या T20 स्पर्धेचा चालू हंगाम पीएएसएल मध्येच थांबवावा लागला. यानंतर, पाकिस्तानी बोर्डाने उर्वरित सामने यूएईमध्ये आयोजित करण्याची घोषणा केली होती. पण आता हा प्रयत्नही अपयशी ठरताना दिसत आहे

India-Pakistan War: भारतीय नौदलाकडून मासेमारी प्रतिबंधित क्षेत्र जाहीर; दिसताच क्षणी गोळ्या घालण्याचे आदेश

टीम लेटेस्टली

नौदल विभागाने आखून दिलेल्या उपरोक्त परिसरामध्ये कोणतीही नौका आढळून आल्यास दिसताच क्षणी गोळ्या घालणे (शूट टु किल) चे आदेश नौदल विभागास देण्यात आलेले आहेत.

Advertisement

India-Pakistan War Situation: 'पाकिस्तानने 36 ठिकाणांना लक्ष्य करण्याचा केला प्रयत्न’, पत्रकार परिषदेत कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती

टीम लेटेस्टली

7 आणि 8 मे च्या रात्री पाकिस्तानी सैन्याने पश्चिम सीमेच्या संपूर्ण भागात अनेक वेळा भारतीय हवाई हद्दीचे उल्लंघन केले. या उल्लंघनाचा उद्देश भारताच्या लष्करी पायाभूत सुविधांवर हल्ला करणे आणि भारतीय हवाई संरक्षणाच्या क्षमतांची चाचणी घेणे हा होता.

Murali Naik Martyred: पाकिस्तानी ड्रोन हल्ल्यात घाटकोपर येथील लष्करी जवान मुरली नाईक शहीद; कुटुंबावर शोककळा

Bhakti Aghav

जम्मू भागातील उरीजवळ पहाटे 3:00 वाजता हा हल्ला झाला. यावेळी मुरली नाईक तेथे ड्युटीवर होते. यासंदर्भात फ्री प्रेसने वृत्त प्रकाशित केलं आहे. मूळचे आंध्र प्रदेशातील काफिदंडा गावातील रहिवासी असलेले मुरली नाईक 2022 मध्ये भारतीय सैन्यात सामील झाले होते. त्यांच्या शहीद होण्याने घाटकोपर परिसरात शोककळा पसरली आहे.

TATA IPL 2025 Suspended: आयपीएल एका आठवड्यासाठी स्थगित, बीसीसीआयला करोडोंचे नुकसान, येथे जाणून घ्या तपशील

Nitin Kurhe

भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या लष्करी तणावामुळे इंडियन प्रीमियर लीग 2025 एका आठवड्यासाठी पुढे ढकलण्यात आली आहे. आज झालेल्या बीसीसीआयच्या बैठकीत हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे, त्यामुळे चाहत्यांसह कोणत्याही खेळाडूचे कोणत्याही प्रकारचे नुकसान होऊ नये, यासाठी परदेशी खेळाडूंना हळूहळू मायदेशी परतण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Gas Cylinder Explosion in Bikaner: बिकानेरमध्ये गॅस सिलेंडरचा स्फोट; 9 जणांचा मृत्यू, अनेक जखमी

Bhakti Aghav

सिलेंडर स्फोटामुळे 9 जणांचा मृत्यू झाला. या अपघातात इतर चार जण गंभीर जखमी झाले आहेत, ज्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Advertisement

Opration Sindoor दरम्यान भारतीय सैन्यासाठी Virat Kohli ची भावनिक पोस्ट, तर पत्नी Anushka Sharma ने मानले आभार

Nitin Kurhe

पाकिस्तानी सैन्याच्या नापाक कारवायांना भारतीय सैन्य सतत चोख प्रत्युत्तर देत आहे. गुरुवारीही पाकिस्तानने ड्रोन हल्ले केले, जे भारतीय सैन्याने पाडले. विराट कोहलीने पोस्ट करून लिहिले की...

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने स्थगिती दिल्यानंतर Indus Water Treaty च्या वादात हस्तक्षेप करण्यास जागतिक बँकेचा नकार, पाकिस्तानला मोठा धक्का

Dipali Nevarekar

भारत सरकारने शेअर केलेल्या जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांच्या संदेशात म्हटले आहे की, "आपल्याकडे सुविधा देणाऱ्याच्या पलीकडे इतर कोणतीही भूमिका नाही."

India-Pakistan Tensions: भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या सुरक्षेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी बैठक

Bhakti Aghav

भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील त्यांच्या निवासस्थानी एक आवश्यक सुरक्षा आढावा बैठक घेतली. ज्यामध्ये वरिष्ठ पोलिस आणि प्रशासकीय अधिकारी सहभागी होते.

LG Manoj Sinha यांनी उरी मध्ये लष्कराच्या जवानांना विचारलं ‘How Is the Josh?’; पहा त्यांचा प्रतिसाद (Watch Video)

Dipali Nevarekar

पाकिस्तानने डागलेल्या क्षेपणास्त्रांनंतर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आज Jammu and Kashmir, Lieutenant Governor Manoj Sinha उरी मध्ये पोहचले होते.

Advertisement

ऑपरेशन सिंदूरने पाकिस्तान धास्तावले, आता 'PSL' चे उर्वरित सामने यूएईमध्ये होणार

Nitin Kurhe

गुरुवारी रावळपिंडीमध्ये पीएसएलमध्ये कराची किंग्ज आणि पेशावर झल्मी यांच्यात सामना होणार होता. पण स्टेडियम कॉम्प्लेक्समध्ये ड्रोन पडल्यानंतर, एक आपत्कालीन बैठक घेण्यात आली आणि त्यानंतर सामना पुढे करण्याचा निर्णय घेण्यात आला.

Delhi Arun Jaitley Stadium Bomb Threat: दिल्ली क्रिकेट स्टेडियमवर बॉम्ब हल्ला करण्याची धमकी, 'पाकिस्तान'च्या स्लीपर सेलने पाठवला मेल

Nitin Kurhe

"तुमच्या स्टेडियममध्ये बॉम्बस्फोट होईल. आमचा भारतात एक समर्पित पाकिस्तानी स्लीपर सेल सक्रिय आहे. हा स्फोट ऑपरेशन सिंदूरचा बदला असेल," असे मेलमध्ये म्हटले आहे.

Kamal Haasan Thug Life Audio Launch Postponed: भारत-पाकिस्तान तणावामुळे कमल हासन यांनी 'ठग लाईफ'चा ऑडिओ लाँच पुढे ढकलला

Bhakti Aghav

कमल हासन यांनी एक निवेदन जारी केले ज्यामध्ये म्हटले आहे की, 'कला वाट पाहू शकते. भारत प्रथम येतो.' त्यांनी असेही म्हटले की, हा उत्सव साजरा करण्याचा वेळ नाही तर एकता आणि संयमाचा आहे. सैनिकांच्या शौर्य आणि बलिदानाचा सन्मान करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

IPL 2025 Suspended For One Week: आता आयपीएलचा उर्वरित हंगाम कधी होणार सुरु, बीसीसीआयने दिली मोठी अपडेट

Nitin Kurhe

शुक्रवारी सकाळी बीसीसीआयने आयपीएल सध्यासाठी पुढे ढकलल्याची घोषणा केली. यानंतर थोड्याच वेळात, दुपारी हे ज्ञात झाले की बीसीसीआय पुढील आठवड्यात एक आढावा बैठक घेणार आहे. त्या काळात परिस्थितीचा आढावा घेतला जाईल.

Advertisement

Fake News Alert: दादर चौपाटी नागरिकांसाठी बंद राहणार असल्याचे फेक मेसेज WhatsApp Groups वर वायरल; पहा मुंबई पोलिसांचा खुलासा

Dipali Nevarekar

सार्‍या नागरिकांसाठी दादर चौपाटी खुली राहणार असल्याचं मुंबई पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.

Tata Memorial Hospital Receives Bomb Threat: भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील टाटा मेमोरियल हॉस्पिटलला बॉम्बने उडवण्याची धमकी; शोध मोहीम सुरू

Bhakti Aghav

शुक्रवारी पहाटे हा धमकीचा ईमेल मिळाला. ज्यामुळे कायदा अंमलबजावणी संस्थांकडून तात्काळ प्रतिसाद मिळाला. दररोज हजारो कर्करोग रुग्णांवर उपचार करणाऱ्या रुग्णालयाने आपत्कालीन प्रोटोकॉल सुरू केले आहेत, ज्यामध्ये रुग्णांना सुविधेतील सुरक्षित ठिकाणी हलवण्याची खबरदारी घेण्यात आली आहे.

Mumbai Metro Line 3 Phase 2A Inauguration: बीकेसी-वरळी भुयारी मेट्रो मार्गिकेची प्रतिक्षा संपली; 10 मे पासून नागरिकांच्या सेवेत

Dipali Nevarekar

आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑगस्ट महिन्यापर्यंत मेट्रोची संपूर्ण सेवा प्रवाशांसाठी खुली करण्याचा प्रयत्न आहे. ही मेट्रो सेवा पुढे कफ परेड पर्यंत वाढवण्यात आली आहे.

Gang-Rape Case In Titwala: टिटवाळामध्ये 21 वर्षीय महिलेवर 5 जणांकडून सामूहिक बलात्कार; आरोपींविरोधात गुन्हा दाखल

Bhakti Aghav

या गुन्ह्यात आणखी दोन महिलांचाही सहभाग आहे, या महिला आरोपींना मदत करत होत्या. पीडित महिलेला तिच्या दोन महिला मैत्रिणींसह पुरूषांनी ड्रग्ज दिले. टिटवाळा पोलिसांनी सातही जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Advertisement
Advertisement