ठळक बातम्या
Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मध्ये 'या' 5 प्रकारच्या अर्जांची पडताळणी होणार; मंत्री आदिती तटकरे यांची माहिती
Dipali Nevarekarआदिती तटकरे यांनी माहिती देताना सरसकट कोणत्याही अर्जाची छाननी होणार नाही. तक्रारीशिवाय आम्ही कोणत्याही अर्जा छाननी करणार नाही. असेही स्पष्ट केले आहे.
Voice Calls via Smartphone From Space: आता पहिल्यांदाच अंतराळातून मोबाईल कॉल करता येणार; ISRO अमेरिकन उपग्रह प्रक्षेपित करून रचणार इतिहास
Prashant Joshiभारत लवकरच अमेरिकन कंपनीचा एक विशाल कम्युनिकेशन उपग्रह प्रक्षेपित करणार आहे, ज्याद्वारे थेट अंतराळातून मोबाईल फोनवरून कॉल करण्याची सुविधा मिळेल. सॅटेलाईट टेलिफोनी क्षेत्रातील हे आतापर्यंतचे सर्वात आधुनिक, क्रांतिकारी आणि सर्वोत्तम तंत्रज्ञान मानले जात आहे.
TRAI On Fake Recharge Offers: खोट्या ऑफर्सच्या आमिषामुळे रिचार्ज पडू शकते महागात; ट्रायचा वापरकर्त्यांना इशारा
Bhakti Aghavट्रायने युजर्सना बनावट रिचार्ज ऑफरबद्दल चेतावणी दिली आहे. लोकांना फसवण्यासाठी फ्री रिचार्ज ऑफरचा वापर केला जात असल्याचं ट्रायने म्हटलं आहे. वास्तविक, हे सायबर गुन्हेगार ट्रायशी संबंधित असल्याचा दावा करतात आणि वैयक्तिक तपशील विचारतात. त्यासाठी काही ऑफर्सचे आमिषही दिले जाते. ज्यात अनेक लोक अडकतात.
Maharashtra’s Biggest Industrial Land: महाराष्ट्रातील सर्वात मोठी औद्योगिक जमीन Reliance Industries ला कवडीमोल भावात विकली
Prashant Joshiअर्बन इन्फ्रास्ट्रक्चर होल्डिंग्ज प्रायव्हेट लिमिटेडची उपकंपनी असलेल्या द्रोणागिरी इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड (DIPL) ने नवी मुंबई आयआयए प्रायव्हेट लि. मधील आपला 74 टक्के हिस्सा, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडला 1,628.03 कोटी रुपयांना विकला आहे, असे कंपनीने स्टॉक एक्सचेंजला सांगितले.
वाशी मध्ये 35 फूटी शिल्पावर चढली मानसिक रूग्ण महिला; तासाभराच्या प्रयत्नांनंतर पोलिसांनी केली सुटका
Dipali Nevarekarवाशी सेक्टर 17 मध्ये एका 35 फूट उंच शिल्पावर महिला चढल्याने पोलिसांनी मोठी कसरत करून तिची सुटका केली.
Makar Sankranti 2025 Date: यंदा मकर संक्रांती कधी आहे? काय आहे या दिवसाचं महत्त्व आणि पूजाविधी? जाणून घ्या
Bhakti Aghavमकर संक्रांती हा सण नवीन वर्षातील पहिल्या प्रमुख सणांपैकी एक आहे. या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो याला संक्रांती म्हणतात. हा दिवस केवळ धार्मिकच नव्हे तर सांस्कृतिक दृष्टिकोनातूनही विशेष मानला जातो.
Pune International Film Festival: यंदाच्या 23 व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे वेळापत्रक बदलले; आता होणार 13 ते 20 फेब्रुवारी दरम्यान
Prashant Joshiवेळापत्रक बदलल्याची माहिती पिफचे संचालक डॉ. जब्बार पटेल यांनी पत्रकार परिषदेत दिली. पुणे फिल्म फाऊंडेशन आणि महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागाने दादासाहेब फाळके चित्रनगरी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या पिफमध्ये यावर्षी 81 देशातील 150 हून अधिक चित्रपट दाखवले जाणार आहेत, असेही पटेल म्हणाले.
Cyber Fraud And WhatsApp Scams: व्हॉट्सॲप वापरताय? सावधान! सायबर गुन्हेगार शोधतात सोपे सावज, नका होऊ शिकार; घ्या जाणून
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेकेंद्रीय गृह मंत्रालयाच्या अहवालात 2024 मध्ये सायबर घोटाळ्यांसाठी सर्वात लक्ष्यित प्लॅटफॉर्म म्हणून व्हॉट्सऍप असल्याचे पुढे आले आहे. "पिग बुचरिंग स्कॅम," सायबर फसवणूक ट्रेंड आणि डिजिटल गुन्ह्यांचा सामना करण्यासाठी भारतीय गृहमंत्रायाने कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.
कोल्हापूर मध्ये पार्थिव अंत्यविधीला नेताना अॅम्ब्युलन्स खड्डात आदळली; 65 वर्षीय आजोबा झाले पुन्हा जीवंत
Dipali Nevarekarबुधवारी सकाळी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर गावकर्यांनी उत्साहात त्यांचं स्वागत केले. त्यांचं औक्षण करून, फुलांच्या पायघड्या घालून त्यांचं स्वागत झाले.
Vasai Crime: कंपनीत काम करणाऱ्या अल्पवयीन मुलीवर सहकाऱ्याकडून बलात्कार; फरार आरोपीचा शोध सुरू
Jyoti Kadamवसईमध्ये अल्पवयीन मुलीवर 31 डिसेंबर आणि 1 जानेवारी रोजी 50 वर्षीय व्यक्तीने बलात्कार केल्याची एफआयआर दाखल केला आहे. तक्रारीनुसार, आरोपीने प्रथम कंपनीच्या केबिनमध्ये आणि नंतर टेरेसवर मुलीवर अत्याचार केले.
Dulal Sarkar Shot Dead in West Bengal: धक्कादायक! पश्चिम बंगालमधील मालदा येथे TMC नगरसेवक दुलाल सरकार यांची गोळी झाडून हत्या
Bhakti Aghavबबला नावाने प्रसिद्ध असलेले दुलाल सरकार हे मालदामधील टीएमसीचे लोकप्रिय नगरसेवक होते. गुरुवारी पहाटे ढाललिया मोड परिसरात दुचाकीस्वार हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला केला. हल्लेखोरांनी त्यांच्यावर जवळून अनेक गोळ्या झाडल्या.
SA vs PAK 2nd Test, Capetown Pitch Report And Stats: दक्षिण आफ्रिका-पाकिस्तान यांच्यातील सामन्यापूर्वी न्यूलँड्सच्या आकडेवारीवर नजर टाका; खेळपट्टीचा अहवाल, सर्वाधिक धावा आणि विकेट घेणारे खेळाडू कोण?
Jyoti Kadamदक्षिण आफ्रिका-पाकिस्तान यांच्यातील दुसरी कसोटी 3 जानेवारीपासून खेळवली जाणार आहे. उभय संघांमधील हा सामना केपटाऊनमधील न्यूलँड्स येथे खेळवला जाणार आहे. दोन सामन्यांच्या मालिकेत दक्षिण आफ्रिका 1-0 ने आघाडीवर आहे.
Mukkam Post Bombilwadi (Marathi): मुक्काम पोस्ट बोंबीलवाडी, हिटलर कोकणात आल्याने उडालेली धम्माल
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेमुक्काम पोस्ट बोंबीलवाडी हा दुसऱ्या महायुद्धातला काळ दर्शवून हसवणारा मराठी कॉमेडी सिनेमा आहे. आकर्षक कथानक आणि प्रशांत दामले आणि वैभव मांगले यांच्या उत्कृष्ट अभिनयाने हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस सज्ज आहे.
Nashik Shocker: नाशिकमध्ये बापाने मुलासह शेजाऱ्याचा गळा चिरून केली हत्या; डोके घेऊन गाठले पोलीस स्टेशन, केले आत्मसमर्पण
Prashant Joshiस्थानिक लोकांना घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी आरोपी पिता-पुत्राच्या घराचे नुकसान केले आणि त्यांची कार पेटवून दिली. या घटनेने गावात तणावाचे वातावरण पसरले आहे.
AUS vs IND 5th Test, Sydney Pitch Report And Stats: ऑस्ट्रेलिया-टीम इंडिया यांच्यातील सामन्यापूर्वी सिडनी क्रिकेट ग्राउंडची आकडेवारी पहा; खेळपट्टीचा अहवाल, सर्वाधिक धावा आणि विकेट घेणारे खेळाडू कोण
Jyoti Kadamऑस्ट्रेलिया राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील पाचवी कसोटी 3 जानेवारीपासून खेळवली जाणार आहे. उभय संघांमधील हा सामना सिडनी येथील सिडनी क्रिकेट मैदानावर होणार आहे. पाच सामन्यांच्या मालिकेत सध्या 2-1 ने आघाडीवर आहे.
Santosh Deshmukh Murder Case: मोठ्या आकाला वाचवण्यासाठी छोट्या आकाचा एन्काऊंटरही होऊ शकतो; विजय वडेट्टीवार यांचा दावा
Bhakti Aghavया प्रकरणात कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड (Walmik Karad) वर खंडणीचा आरोप करण्यात येत आहे. तथापी, वाल्मिक कराड सीआयडीच्या ऑफिसमध्ये शरण आला. त्यानंतर कराडला 15 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. मात्र, आता काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी अत्यंत खळबळजनक दावा केला आहे.
Khel Ratna Award 2025: Manu Bhaker, Gukesh D, Harmanpreet Singh आणि Praveen Kumar ठरले यंदाचे खेलरत्न पुरस्काराचे मानकरी
Dipali Nevarekarआज जाहीर झालेल्या या पुरस्काराचा प्रदान सोहळा 17 जानेवारी 2025 दिवशी होणार आहे. दिल्लीत राष्ट्रपती भवनामध्ये सकाळी 11 वाजता एका खास सोहळ्यात हे पुरस्कार दिले जातील.
London Property Market: काय सांगता? लंडनमध्ये ब्रिटिशांपेक्षा भारतीयांच्या जास्त मालमत्ता; अहवालात समोर आली माहिती
Prashant Joshiबॅरेट लंडनने सुमारे दोन वर्षापूर्वी लंडनच्या रिअल इस्टेटबाबत अहवाल तयार केला होता. ब्रिटनची राजधानी लंडनच्या प्रॉपर्टी मार्केटमध्ये भारतीयांनी दबदबा निर्माण केल्याचे अहवालात प्रथमच समोर आले. बॅरेट लंडनच्या मते, लंडनमधील रिअल इस्टेटच्या बाबतीत भारतीयांनी ब्रिटीशांना मागे टाकले आहे .
Golden Jackals in Mumbai: सोनेरी कोल्हा प्रजाती धोक्यात? गोल्डन जॅकल्स नामशेष होण्याच्या मर्गावर?
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेJackal Radio-Collaring: एका सर्वेक्षणात मुंबईतील सोनेरी कोल्हा धोक्यात असून त्याची प्रजातिच नष्ट होण्याच्या मार्गावर असल्याचे पुढे आले आहे. नैसर्गिक आदिवास नष्ट होऊ लागल्याने, या महत्त्वाच्या प्रजातीचे संरक्षण करण्यासाठी तज्ज्ञांनी 'प्रोजेक्ट जॅकल'चा आग्रह धरला आहे.
Armaan Malik-Aashna Shroff Wedding Pics: लग्नाच्या बंधनात अडकला लोकप्रिय गायक अरमान मलिक; गर्लफ्रेंड आशना श्रॉफसोबत बांधली लग्नगाठ, पहा फोटोज
Bhakti Aghavनवविवाहित जोडप्याने इन्स्टाग्रामवर लग्नाचे खास फोटो चाहत्यांसह शेअर केले आहेत. इतकंच नाही तर त्याने खास कॅप्शनसह लग्नाचे फोटो पोस्ट केले आहेत. अरमान मलिक आणि आशना श्रॉफ यांची प्रेमकहाणी त्यांच्या एंगेजमेंटच्या वेळी चर्चेत आली होती.