Golden Jackals in Mumbai: सोनेरी कोल्हा प्रजाती धोक्यात? गोल्डन जॅकल्स नामशेष होण्याच्या मर्गावर?

Jackal Radio-Collaring: एका सर्वेक्षणात मुंबईतील सोनेरी कोल्हा धोक्यात असून त्याची प्रजातिच नष्ट होण्याच्या मार्गावर असल्याचे पुढे आले आहे. नैसर्गिक आदिवास नष्ट होऊ लागल्याने, या महत्त्वाच्या प्रजातीचे संरक्षण करण्यासाठी तज्ज्ञांनी 'प्रोजेक्ट जॅकल'चा आग्रह धरला आहे.

Golden jackal | (Photo credit: archived, edited, representative image)

Golden Jackal Conservation: विस्तीर्ण समुद्रकिनारा आणि खारफुटीचे जंगल (Mangrove Destruction)लाभलेल्या मुंबई आणि नवी मुंबई परिसरात वास्तव्यास असलेल्या वन्यजीवांसमोर (Wildlife in Mumbai) अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. खास करुन या परिसरात आढळणारा सोनेरी कोल्हा आणि इतर जीव. भारतीय वन्यजीव संवर्धन संस्थेने खारफुटी परिसरात एक अभ्यास केला. या अभ्यासासाठी केलेल्या मूलभूत सर्वेक्षणात मुंबई महानगर प्रदेशातील (MMR) सोनेरी कोल्हा (Golden Jackal) आणि त्याच्या प्रजातीबद्दल चिंताजनक तपशील पुढे आला आहे. या अभ्यासात त्यांचे वितरण, त्यांच्या अस्तित्वासाठीची आव्हाने आणि शहरातील वाढता मानव-प्राणी संघर्ष अधोरेखित केला आहे. वन्यप्राणी आणि मानव यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होत आहे. मानव त्याच्या ज्ञानाचा वापर करुन बनविलेल्या वेगवेगळ्या हत्यार आणि तंत्रज्ञानामुळे वन्यजीवांवर विजय मिळवत आहे. परिणामी जंगलातील आणि पर्यायाने निसर्गातीलच विविध प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर येऊन ठेपल्या आहेत. या पार्श्वभूमीवर भारतीय वन्यजीव संवर्धन संस्थेने केलेला अभ्यास अतिशय महत्त्वाचा ठरतो.

सर्वेक्षणातील निष्कर्ष-व्यापक वितरण परंतु असुरक्षित अधिवास

भारतीय वन्यजीव संवर्धन संस्थेने केलेल्या अभ्यासात खारफुटी परिसरात विविध वन्यजीवांचा अभ्यास करण्यात आला. त्यापैकी महत्त्वाचे आणि उल्लेखनीय रित्या दिसून आलेले वन्यजीव आणि पक्षी खालील प्रमाणे:

गोल्डन जॅकल्सला धोका?

पर्यावरणवादी कार्यकर्ते आणि अभ्यासक इशारा देतात की, कोस्टल रोड आणि प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत गृहनिर्माण विकास यासारख्या पायाभूत सुविधा प्रकल्पांमुळे वस्तीचा नाश होते आहे. बहुतांश सरकारी प्रकल्प समुद्रकिनारपट्टी आणि खारफुटीवर होत आहे. त्यामुळे सोनेरी कोल्हा त्याच्या नैसर्गिक आदिवासातून बाहेर पडू लागला आहे. त्यातच विघातक लोकामुळे खारफुटीच्या जंगलात लागलेल्या आगी, निहित स्वार्थांनी भडकावल्या गेल्या आहेत. ज्यामुळे वन्य प्राण्यांच्या आदिवासांची मोठीच समस्या उत्पन्न झाली आहे. दरम्यान, या प्रजातीच्या संरक्षणाची खात्री करण्यासाठी नॅटकनेक्ट फाउंडेशनने प्रोजेक्ट टायगर प्रमाणेच "प्रोजेक्ट जॅकल" सादर करण्याचे आवाहन केले आहे. यामध्ये हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी आणि अधिवासाच्या गरजा समजून घेण्यासाठी प्रजातींची तपशीलवार जनगणना आणि रेडिओ-कॉलरिंग समाविष्ट असेल. (हेही वाचा, Golden Jackal in Navi Mumbai: खारघर मध्ये झालं सोनेरी कोल्ह्याचं दर्शन, व्हिडिओ व्हायरल)

मानव आणि वन्यजीव संघर्षामुळे जैवविविधता धोक्यात

शहरी वसाहतींमध्ये कोल्हे घुसण्याच्या घटना वाढल्या आहेत. अलीकडेच, अनुशक्ती नगरमध्ये एका सोनेरी कोल्ह्याने एका महिलेवर हल्ला केला आणि नंतर त्या प्राण्याला रेबीज असल्याची पुष्टी झाली. चेंबूर आणि ट्रॉम्बे येथे अशाच प्रकारच्या घटना घडल्या आहेत, जिथे पाच कोल्हे रहस्यमय परिस्थितीत मृतावस्थेत आढळले होते. वाढत्या संघर्षांमध्ये भटक्या कुत्र्यांची भूमिका आणि मानवी भीती यावरही तज्ज्ञ प्रकाश टाकतात. प्राणी बचावकर्ता अमर गुरंग टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना म्हणाले, 'कुत्रे अनेकदा कोल्ह्यांवर हल्ला करतात आणि घाबरलेले रहिवासी दगड फेकतात किंवा सापळे लावतात'. त्यामुळे कोल्हे मृत होतात. इतकेच नव्हे तर कोल्ह्यांची संख्या घटू लागल्याने जैवविविधता धोक्यात येते. पर्यावरणीय व्यवस्थेसाठी सोनेरी कोल्हे महत्वाचे आहेत, जे उंदीर, साप आणि कीटकांची शिकार करून कीटक नियंत्रणास हातभार लावतात. खारफुटीचे अधिवास कमी होत असल्याने, नाजूक पर्यावरणीय संतुलन विस्कळीत होत आहे, ज्यामुळे संपूर्ण खारफुटी-पाणथळ परिसंस्थेवर परिणाम होत आहे.

त्वरित उपाययोजना कारवाई करण्याची मागणी

गोल्डन जॅकलच्या संरक्षणासाठी संरक्षणवाद्यांनी त्वरित उपाययोजना करण्याचे आवाहन केले आहेः

  • प्रोजेक्ट जॅकलः जनगणना आणि रेडिओ-कॉलरिंगसह कोकिळाच्या संवर्धनासाठी एक सर्वसमावेशक उपक्रम.
  • खारफुटीचे संरक्षणः खारफुटीच्या अधिवासांचा नाश रोखण्यासाठी न्यायालयाच्या आदेशांची काटेकोर अंमलबजावणी.
  • पशुवैद्यकीय रुग्णालयः कोल्हे आणि इतर वन्यजीवांच्या गरजा भागविण्यासाठी जुई नगरमधील पशुवैद्यकीय सुविधा कार्यान्वित करणे.

दरम्यान, गोल्डन जॅकल हे वन्यजीव संरक्षण कायदा, 1972 अंतर्गत संरक्षित आहेत, परंतु त्यांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी ठोस प्रयत्न आवश्यक आहेत. मुंबई जसजशी विकसित होत आहे, तसतसे पर्यावरणीय संतुलन राखण्यासाठी आणि पुढील मानव-प्राणी संघर्ष रोखण्यासाठी जैवविविधतेचे रक्षण करणे हे प्राधान्य असले पाहिजे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now