Voice Calls via Smartphone From Space: आता पहिल्यांदाच अंतराळातून मोबाईल कॉल करता येणार; ISRO अमेरिकन उपग्रह प्रक्षेपित करून रचणार इतिहास

भारत लवकरच अमेरिकन कंपनीचा एक विशाल कम्युनिकेशन उपग्रह प्रक्षेपित करणार आहे, ज्याद्वारे थेट अंतराळातून मोबाईल फोनवरून कॉल करण्याची सुविधा मिळेल. सॅटेलाईट टेलिफोनी क्षेत्रातील हे आतापर्यंतचे सर्वात आधुनिक, क्रांतिकारी आणि सर्वोत्तम तंत्रज्ञान मानले जात आहे.

ISRO (Photo Credits: Twitter)

इस्रोसाठी (ISRO) 2025 हे वर्ष खूप खास असणार आहे. येत्या 6 महिन्यांत इस्रो एकामागून एक मोठ्या मोहिमा राबवणार आहे. इस्रोमुळे भारताच्या अवकाश तंत्रज्ञानाचे जगभरातून कौतुक होत आहे. पण आता भारत एवढ्यावरच थांबलेला नाही, तर यापुढेही काम करणार आहे. बातमीनुसार, लवकरच स्पेसमधून थेट मोबाईलवर कॉल करता येणार आहे. भारताची अंतराळ संस्था इस्रो या विशेष मोहिमेत महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. अहवालानुसार, इस्रो या वर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये अमेरिकन कम्युनिकेशन सॅटेलाइट 'ब्लू बर्ड' प्रक्षेपित करणार आहे, ज्याच्या मदतीने कोणत्याही स्मार्टफोनद्वारे थेट अंतराळातून कॉल केले जाऊ शकतात.

भारत लवकरच अमेरिकन कंपनीचा एक विशाल कम्युनिकेशन उपग्रह प्रक्षेपित करणार आहे, ज्याद्वारे थेट अंतराळातून मोबाईल फोनवरून कॉल करण्याची सुविधा मिळेल. सॅटेलाईट टेलिफोनी क्षेत्रातील हे आतापर्यंतचे सर्वात आधुनिक, क्रांतिकारी आणि सर्वोत्तम तंत्रज्ञान मानले जात आहे. भारत स्वत:च्या रॉकेटमधून अमेरिकन कंपनीचा एवढा मोठा संचार उपग्रह प्रक्षेपित करण्याची ही पहिलीच वेळ असेल. याआधी भारताने आतापर्यंत फक्त छोटे अमेरिकन उपग्रह सोडले आहेत.

अमेरिकेची टेक्सासस्थित कंपनी AST SpaceMobile या मिशनमध्ये विशेष भूमिका बजावत आहे. ही कंपनी एका नवीन तंत्रज्ञानाद्वारे उपग्रहाला थेट स्मार्टफोनशी जोडण्यासाठी एक उत्तम योजना बनवत आहे. यासाठी कोणत्याही वेगळ्या हँडसेटची गरज भासणार नाही, ज्यामुळे ते 'स्टारलिंक' सारख्या विद्यमान तंत्रज्ञानापेक्षा खास आणि वेगळे बनते. या संदर्भात कंपनीने दावा केला आहे की, या नवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कोणत्याही स्मार्टफोनला थेट इंटरनेट आणि ब्रॉडबँड सेवा मिळेल. हे तंत्रज्ञान ज्या भागात पारंपारिक दूरसंचार पायाभूत सुविधा बिघडतात किंवा अस्तित्वात नाहीत अशा ठिकाणीही काम करेल. (हेही वाचा: ISRO आणि ESA ची आगामी AXIOM-4 मिशनसाठी जागतिक सहकार्याला प्रोत्साहन देण्यासाठी करारावर स्वाक्षरी)

'ब्लू बर्ड' उपग्रहाची खासियत-

  • याद्वारे अंतराळातूनही मोबाईल नेटवर्क उपलब्ध होणार असून ते अतिशय सोपे असेल.
  • या तंत्रज्ञानामुळे जगात कुठेही बोलणे शक्य होणार आहे. अगदी दुर्गम भागातही नेटवर्क उपलब्ध होईल.
  • 'स्टारलिंक' प्रमाणेच यातही स्वस्त इंटरनेट सुविधा मिळणार आहे.
  • या तंत्रज्ञानामुळे ते ग्लोबल सिम म्हणूनही काम करू शकणार आहे.
  • आपत्ती व्यवस्थापनात मदत- पूर, भूकंप किंवा कोणत्याही आपत्तीच्या वेळी मोबाइल टॉवर काम करत नसतील, तेव्हा हे तंत्रज्ञान अत्यंत उपयुक्त ठरेल.

भारतासाठी मोठी उपलब्धी-

भारताच्या दृष्टीकोनातून, हे प्रक्षेपण इस्रोसाठी एक मोठी उपलब्धी ठरेल, कारण यामुळे अमेरिकन कंपन्यांचा भारताच्या रॉकेट आणि प्रक्षेपण प्रणालीवरील विश्वास आणखी वाढेल. या विशेष मोहिमेत इस्रोचे लॉन्च व्हेईकल मार्क-3 (LVM-3) वापरले जाणार आहे. हा 6000 किलोचा ब्लू बर्ड उपग्रह लो अर्थ ऑर्बिट (LEO) मध्ये ठेवला जाईल. या उपग्रहाचा अँटेना अंदाजे 64 चौरस मीटरचा असेल, जो फुटबॉल मैदानाच्या निम्म्या आकाराचा असेल असे मानले जाते.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now