ठळक बातम्या
Bigg Boss 18 Finale: 'बिग बॉस 18' चा विजेता ट्रॉफीसोबत किती बक्षीस रक्कम जिंकणार, येथे संपूर्ण माहिती जाणून घ्या
Amol Moreआज टीव्ही रिअॅलिटी शो 'बिग बॉस 18' चा ग्रँड फिनाले आहे. या शोच्या अंतिम फेरीत 6 स्पर्धक पोहोचले आहेत. या यादीत विवियन डिसेना, एशा सिंग, करणवीर मेहरा, रजत दलाल, चुम दरंग आणि अविनाश मिश्रा यांचा समावेश आहे.
Fire At Mahakumbh in Prayagraj: प्रयागराज येथील महाकुंभमेळा परिसरात आग; अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी दाखल
Bhakti Aghavस्वयंपाक करताना सिलेंडरमध्ये स्फोट झाल्याचे सांगण्यात येत आहे, त्यानंतर आग संपूर्ण परिसरात पसरली. ही आग इतकी भीषण आहे की आजूबाजूच्या संपूर्ण परिसरात काळ्या धुराचे लोट पसरले आहेत.
'Bought iPhone from Begging': भिकेच्या पैशातून खरेदी केला 16 प्रो मॅक्स; अजमेरमधील भिकाऱ्याने सर्वांना केले चकीत (Watch Video)
Jyoti Kadamअजमेरमधून सगळ्यांना चकीत करणारीबाब समोर आली आहे. भिकाऱ्याने जमा झालेल्या 13लाख रुपयांतून आयफोन 16 प्रो मॅक्स खरेदी केला आहे. त्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
Leopard Attack In Gir: गुजरातमधील गीर सोमनाथमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; तर दुसरा गंभीर जखमी
Bhakti Aghavबिबट्याच्या हल्ल्यात एका 44 वर्षीय पुरूषाचा मृत्यू झाला. तसेच आणखी एक जण गंभीर जखमी झाला. वन विभागाच्या अधिकाऱ्याने रविवारी या घटनेची माहिती दिली. घटनेनंतर, बिबट्या घटनास्थळावरून पळून गेला. जखमीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Shakib Al Hasan Arrest Warrant: शाकिबविरुद्ध अटक वॉरंट जारी, लवकरच तुरुंगात जाणार? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
Amol Moreशाकिबविरुद्ध चेक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर, ढाका न्यायालयाने त्याच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी केले. क्रिकबझच्या वृत्तानुसार, शाकिब आणि इतर तिघांविरुद्ध खटला सुरू आहे. त्याला दोन वेगवेगळ्या धनादेशांद्वारे सुमारे 4 कोटी 14 लाख बांगलादेशी टाका मिळण्यात अपयश आले.
Hair Loss, Baldness vs. Alopecia: अलोपेसिया आणि केस गळणे, टक्कल पडणे यांमध्ये फरक काय? त्याचे प्रकार आणि उपचार यांबातब घ्या जाणून
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेअलोपेसिया (Alopecia) आणि केस गळणे (Hair Loss) यातील फरक, त्यांची कारणे, प्रकार आणि उपचार पर्याय जाणून घ्या. केस गळती प्रभावीपणे रोखण्यासाठी आहार टिपा आणि उपाय घ्या जाणून.
Maha Kumbh 2025: महाकुंभ 2025च्या 7 व्या दिवसापर्यंत 17 लाखाहून अधिक भाविकांचे त्रिवेणी संगमावर पवित्र स्नान
Jyoti Kadamउत्तर प्रदेश सरकारने जाहीर केलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, रविवारी 17 लाखाहून अधिक भाविकांनी महाकुंभ मेळ्याला भेट दिली. महाकुंभाच्या सातव्या दिवशी, त्रिवेणी संगम येथे 7.02 लाख भाविकांनी सकाळी 8 वाजेपर्यंत पवित्र स्नान केले.
PAK vs WI 1st Test 2025 Day 3 Scorecard: मुलतान कसोटीत पाकिस्तानचा शानदार विजय, वेस्ट इंडिजचा 127 धावांनी केला पराभव; फिरकी गोलंदाजांचे वर्चस्व
Nitin Kurheपहिल्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी पाकिस्तानने वेस्ट इंडिजचा 127 धावांनी पराभव केला. पाकिस्तानने पहिल्या डावात 230 धावा केल्या, तर वेस्ट इंडिजचा संघ फक्त 137 धावांवर ऑलआउट झाला. दुसऱ्या डावात पाकिस्तानने 157 धावा केल्या, त्यानंतर वेस्ट इंडिजला जिंकण्यासाठी 251 धावांचे लक्ष्य मिळाले, परंतु वेस्ट इंडिजला फक्त 123 धावा करता आल्या आणि सामना गमावावा लागला.
Champions Trophy 2025: गद्दाफी स्टेडियमवर सीट, मोठी स्क्रीन नाही... अंतिम मुदततीत 1 फेब्रुवारीपर्यंत वाढ, PCB करेल का सर्व काम पुर्ण?
Amol Moreगद्दाफी स्टेडियम हे पाकिस्तान क्रिकेट बोर्डासाठी (PCB) मोठी डोकेदुखी बनले आहे. येथील नूतनीकरणाचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. 25 जानेवारीपर्यंत हे काम पूर्ण होईल असे सांगितले जात आहे. पण खरा प्रश्न असा आहे की: पीसीबी या तारखेपर्यंत काम पूर्ण करू शकेल का? कारण ते 1 फेब्रुवारी 2025 पर्यंत पूर्ण करून ICC कडे सोपवायचे आहे.
Saif Ali Khan Stabbing Case: सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीला 5 दिवसांची पोलिस कोठडी
Bhakti Aghavअभिनेत्यावर 17 जानेवारी रोजी पहाटे 2:00 वाजता त्याच्या मुंबईतील राहत्या घरी हल्ला करण्यात आला. नंतर त्याला पहाटे 3:00 वाजता लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या अभिनेत्याची प्रकृती स्थिर आहे.
ICC Champions Trophy 2025: विश्वचषकानंतर हे 3 भारतीय पहिल्यांदाच खेळणार एकदिवसीय सामना, इंग्लंड मालिका आणि चॅम्पियन्स ट्रॉफी गाजवणार
Nitin Kurhe2023 च्या एकदिवसीय विश्वचषकानंतर एकही एकदिवसीय सामना खेळलेले नसलेले काही भारतीय खेळाडू देखील आहेत. आता ते इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत आणि नंतर चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये दिसणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी ही विश्वचषकानंतरची दुसरी सर्वात मोठी एकदिवसीय स्पर्धा आहे.
Rohit Sharma Ranji Return: देशांतर्गत क्रिकेटमध्ये हिटमॅन 10 वर्षांनी परतणार, रोहित 'या' संघाविरुद्ध खेळणार
टीम लेटेस्टलीशनिवारी बीसीसीआय मुख्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत रोहितने याबद्दल आपली प्रतिक्रिया दिली. यावेळी, देशांतर्गत सामन्यांमध्ये स्टार खेळाडूंच्या सहभागाबाबत त्यांनी सांगितले की, आंतरराष्ट्रीय कॅलेंडरच्या व्यस्त वेळापत्रकामुळे खेळाडूंना वेळ काढणे कठीण आहे.
Goa Paragliding Accident: गोव्यात पॅराग्लायडिंग करताना पुण्यातील तरुणीचा मृत्यू; ऑपरेटरनेही गमावला जीव
Bhakti Aghavपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना सायंकाळी 4.30 ते 5 च्या दरम्यान घडली. गोवा पोलिसांनी मृतांची ओळख पटवली असून तरुणीचे नाव शिवानी डबले (वय, 27) आणि ऑपरेटर सुमन नेपाली (वय, 26) अशी त्यांची नावे आहेत. शिवानी डबले आपल्या मैत्रिणीसोबत गोव्याला फिरायला आली होती.
Ladki Bahin Yojana: 'महिलांनो पैसे परत करा', लाडकी बहीण योजना लाभार्थ्यांना मंत्र्यांचे अवाहन
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेमहाराष्ट्रातील मंत्री अदिती तटकरे यांनी अपात्र लाडकी बहीण योजना लाभार्थ्यांना निधी परत करण्याचे आवाहन केले आहे. पडताळणीचे प्रयत्न, पात्रता निकष आणि सार्वजनिक कल्याणकारी योजनांबद्दल जाणून घ्या.
ICC Champions Trophy 2025: यशस्वी जैस्वाल एकदिवसीय क्रिकेटमध्ये करू शकतो पदार्पण, देशांतर्गत क्रिकेटमध्ये कसा आहे रेकाॅर्ड?
Nitin Kurheयशस्वी जैस्वालची टी-20 क्रिकेट आणि कसोटी क्रिकेटमध्ये कामगिरी उत्कृष्ट राहिली आहे. त्याच वेळी, जर आपण त्याच्या एकदिवसीय स्वरूपातील विक्रमाबद्दल बोललो तर, जैस्वालला 2019 मध्ये विजय हजारे ट्रॉफीमध्ये यश मिळाले.
8th Pay Commission: केंद्राप्रमाणेच महाराष्ट्रातही 8वा वेतन आयोग लागू करा, राज्यसेवा कर्मचारी आग्रही
Jyoti Kadamकेंद्र सरकारने कर्मचाऱ्यांना ८ वा वेतन आयोग लागू केल्यानंतर आता महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी आठवा वेतन आयोग लागू करण्याची मागणी धरली आहे.
Manu Bhaker's Grandmother-Maternal Uncle Killed In Accident: मनू भाकरवर कोसळला दु:खाचा डोंगर! मामा आणि आजीचा रस्ते अपघातात मृत्यू (Watch Video)
Bhakti Aghavमनू भाकर यांचे मामा युद्धवीर सिंग आणि आजी सावित्री देवी स्कूटरवरून प्रवास करत होते. वृत्तानुसार, चुकीच्या बाजूने येणाऱ्या एका ब्रेझा कारने स्कूटरला धडक दिली. ही टक्कर इतकी भीषण होती की, या अपघातात दोघेही जखमी झाले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.
Himachal Pradesh: हिमाचलमध्ये वेगवेगळ्या पॅराग्लायडिंग अपघातात 2 जणांचा मृत्यू, ग्लायडर्स हवेतच आदळले
Jyoti Kadamकांगडा आणि कुल्लू जिल्ह्यात 24 तासांत दोन वेगवेगळ्या पॅराग्लायडिंग अपघातांमध्ये दोन पर्यटकांचा मृत्यू झाला. हे पर्यटक गुजरात आणि तामिळनाडूचे असल्याचे सांगितले जात आहे.
Emergency Box Office Collection Day 2: कंगना राणौतच्या 60 कोटी बजेटच्या 'इमर्जन्सी'ने 'आझाद'ला टाकले मागे; 2 दिवसांत कमावले 'इतके' कोटी
Jyoti Kadamकंगना राणौतचा वादग्रस्त चित्रपट 'इमर्जन्सी'ने अजय देवगणच्या पुतण्या 'आझाद' चित्रपटापेक्षा जास्त कमाई केली आहे.
Jeet Adani Wedding: Travis Scott चा कार्यक्रम ते पाहुण्यांसाठी 1 हजार हून अधिक आलिशान गाड्या; Gautam Adani यांचा मुलगा जीतच्या लग्नात काय असणार खास? जाणून घ्या
Bhakti Aghavसध्या जीत अदानी यांच्या लग्नाची सर्वत्र चर्चा सुरू आहे. इंटरनेटवर व्हायरल होणाऱ्या अफवांमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, जीत अदानीच्या लग्न समारंभात हनी सिंग आणि ट्रॅव्हिस स्कॉटसह जगातील काही मोठे कलाकार एकाच छताखाली परफॉर्म करणार आहेत.