ठळक बातम्या

Mauni Amavasya Kadhi Ahe 2025: मौनी अमावस्येला संगमावर १० कोटी भाविक स्नान करणार; जाणून घ्या शाही स्नानाचा शुभ मुहूर्त आणि पूजा पद्धत; व्हिडिओ

Shreya Varke

प्रयागराज येथे होणाऱ्या महाकुंभात मौनी अमावस्येला विशेष महत्त्व आहे. असे मानले जाते की, या दिवशी गंगेचे पाणी अमृतासारखे होते. या दिवशी स्नान आणि दान केल्याने पापांचा नाश होतो आणि मोक्ष प्राप्त होतो. यावर्षी मौनी अमावस्या 29 जानेवारी 2025 रोजी साजरी केली जाणार आहे. या शुभमुहूर्तावर संगमात डुबकी लावण्यासाठी सुमारे १० कोटी भाविक येण्याची शक्यता आहे. अमावस्येला शाही स्नानासाठी भाविक येण्यास सुरुवात झाली आहे.

Maha Kumbh 2025: बॉक्सर मेरी कोमने महाकुंभात केले पवित्र स्नान, गंगेच्या काठावर धावताना आणि कॅमेऱ्यात पोज देताना दिसली, पाहा व्हिडिओ

Shreya Varke

प्रयागराज मध्ये होणाऱ्या महाकुंभ 2025 मध्ये अनेक मोठे सेलिब्रिटीदेखील सध्या गंगेत जाऊन स्नान करत आहेत. रविवारी, 26 जानेवारी रोजी प्रसिद्ध बॉक्सर मेरी कोमने त्रिवेणी संगमावर स्नान केले आणि या पवित्र कुंभ मेळ्याचा भाग बनली. बॉक्सर मेरी कोमने प्रयागराजमधील जत्रेचा आनंद लुटला. नेहमी ऊर्जेने भरलेली मेरी गंगेच्या काठावर धावताना आणि कॅमेऱ्याला पोज देताना दिसली. ती म्हणाली की, ती हिंदू संस्कृती आणि परंपरांचा आदर करते आणि ती प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी येथे आली आहे.

Navi Mumbai Traffic Diversions: घणसोलीतील रस्ते बांधकामादरम्यान नवी मुंबईमध्ये 27 जानेवारीपासून पुढील 25 दिवस वाहतुकीमध्ये बदल; पहा पर्यायी मार्ग

Prashant Joshi

याबाबत पोलीस उपायुक्त (वाहतूक) तिरुपती काकडे म्हणाले, नवी मुंबई महानगरपालिकेने (एनएमएमसी) कामाचे कंत्राट दिले असून ते 10० मीटर लांबीचे असून, हे काम 25 दिवसांत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.

Ladki Bahin Yojana Criteria Change: लाडकी बहीण योजना निकष बदल चर्चा, आदिती तटकरे यांची स्पष्ट उत्तर

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

लाडकी बहीण योजना निकष बदल होणार असल्याची चर्चा जोर पकड असताना महिला व बालविकासमंत्री आदिती तटकरे यांनी याबाबत स्षष्ट शब्दांमध्ये भाष्य केले आहे. त्या रायगड येथे बोलत होत्या.

Advertisement

Pakistan vs West Indies, 2nd Test Day 3 Live Streaming In India: तिसऱ्या दिवसाचा खेळ थोड्याच वेळात सुरू होणार, भारतात थेट सामना कधी, कुठे आणि कसा पहाल?

Jyoti Kadam

लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानची दुसऱ्या डावात निराशाजनक सुरुवात झाली आणि तीन फलंदाज बाद झाले. पाकिस्तानकडून बाबर आझमने सर्वाधिक 31 धावा केल्या. कामरान गुलामने 19 धावा केल्या.

Mumbai Coastal Road: मुंबईकरांसाठी खुशखबर! प्रभादेवी कनेक्टरसह फेब्रुवारीपर्यंत पूर्णपणे खुला होणार कोस्टल रोड; जाणून घ्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये व फायदे

टीम लेटेस्टली

मुंबई किनारी रस्त्याचे 94 टक्के काम पूर्ण झाले असून, उत्तरवाहिनी मार्गाचे उद्घाटन झाले आहे. प्रजासत्ताक दिनी हा मार्ग नागरिकांना समर्पित होत असून, आज सोमवार 27 जानेवारी पासून या मार्गासह अन्य तीन आंतरमार्गिका खुल्या होणार आहेत.

International Cricket Match Schedule For Today: आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आज कोणत्या टीमचे आहेत सामने? संपूर्ण वेळापत्रक पहा, फक्त एका क्लिकवर

Jyoti Kadam

प्रत्येक सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग आणि ब्रॉडकास्टिंग व्यवस्था वेगळी असेल, जेणेकरून क्रिकेट चाहते त्यांच्या आवडत्या संघांना आणि खेळाडूंना पाहू शकतील.

UCC In Uttarakhand: उत्तराखंड राज्यात आजपासून समान नागरी कायदा लागू; जाणून घ्या सविस्तर

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

सर्व समुदायांना समान हक्क सुनिश्चित करून समान नागरी संहिता लागू करणारे उत्तराखंड स्वतंत्र भारतातील पहिले राज्य बनले आहे. ऐतिहासिक कायद्याच्या तरतुदी आणि प्रमुख वैशिष्ट्यांबद्दल जाणून घ्या.

Advertisement

Mohammed Siraj Reacts to Dating Rumours With Zanai Bhosle: आशा भोसले यांची नात झनई भोसलेसोबतचा फोटो मोहम्मद सिराजने शेयर करत म्हंटले माझी बहिण, पाहा फोटो

Shreya Varke

टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आणि आशा भोसले यांची नात झनाई भोसले यांच्या डेटिंगच्या अफवांना तेव्हा वेग आला जेव्हा सिराज झनाईच्या 23 व्या वाढदिवसाच्या पार्टीत दिसला. झनाईने तिच्या वाढदिवसाचे अनेक फोटो शेअर केले आहेत. यातील एका फोटोत ती सिराजसोबत दिसली होती, ज्यामुळे या दोघांमध्ये काही खास आहे का, असा अंदाज चाहत्यांना आला होता. मात्र, झनई भोसले यांनी या अफवांना पूर्णविराम देत आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर फोटो शेअर करत सिराजला 'माझा लाडका भाऊ' म्हटले आहे.

Pune Guillain-Barre Syndrome Cases: पुण्यात गुइलेन-बॅरे सिंड्रोममुळे 2 जणांचा मृत्यू; एकूण प्रकरणांची संख्या 100 च्या पुढे, 17 रुग्ण व्हेंटिलेटर सपोर्टवर

Prashant Joshi

अहवालानुसार, 62 रुग्ण पुणे ग्रामीण, 19 पुणे महानगरपालिकेचे, 14 पिंपरी चिंचवड महापालिकेचे आणि 6 रुग्ण इतर जिल्ह्यातील आहेत. पुढील संक्रमण टाळण्यासाठी, नागरिकांना उकळलेले पाणी पिणे, ताजे-स्वच्छ आणि व्याव्स्ठीत्न शिजवलेले अन्न खाणे, तसेच शिजवलेल्या आणि न शिजवलेल्या पदार्थांचे मिश्रण टाळण्याचा सल्ला दिला जात आहे.

England Women U19 vs New Zealand Women U19 Free Live Streaming Online: इंग्लंड-न्यूझीलंड संघामधील सामन्याचे फ्री लाईव्ह स्ट्रीमिंग ऑनलाइन कसे पहाल? घ्या जाणून

Jyoti Kadam

आयसीसी अंडर 19 महिला विश्वचषक 2025 च्या सामन्याच्या सुपर सिक्स टप्प्यात, इंग्लंड संघ पुढील फेरीत प्रवेश करण्यासाठी न्यूझीलंड संघाशी सामना करेल.

Flash Radiotherapy for Cancer Treatment: 'फ्लॅश रेडिओथेरपी' म्हणजे काय, कर्करोगाच्या सुरक्षित आणि जलद उपचारांसाठी ती कशी उपयुक्त, जाणून घ्या, संपूर्ण माहिती

Shreya Varke

कॅन्सरच्या उपचारात नवी क्रांती सुरू झाली आहे. फ्लॅश रेडिओथेरपी हे एक अत्याधुनिक तंत्रज्ञान आहे जे आता एका सेकंदापेक्षा कमी वेळात रेडिएशन देऊ शकते. या नव्या पद्धतीमुळे उपचार जलद तर होतीलच, शिवाय ते सुरक्षित आणि परिणामकारक ही होतील. पारंपारिक रेडिओथेरपीमध्ये, ट्यूमरला कित्येक मिनिटे आणि अनेक सत्रांसाठी रेडिएशन दिले जाते. जरी हे तंत्र प्रभावी असले तरी ते निरोगी ऊतींचे नुकसान देखील करू शकते. विशेषत: जेव्हा कर्करोग मेंदूसारख्या शरीराच्या संवेदनशील भागात असतो.

Advertisement

Weather Forecast Today, January 27: मुंबई, दिल्ली, चेन्नई, बेंगळुरू, हैदराबाद, शिमला आणि कोलकाता येथील हवामान अपडेट्स, पावसाचा अंदाज

Shreya Varke

भारतीय हवामान शास्त्र विभागाने पश्चिम बंगाल, सिक्कीम, बिहार, ओडिशा, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरासह अनेक भागात दाट धुक्याचा यलो अलर्ट जारी केला आहे. याशिवाय बिहार, हिमाचल प्रदेश आणि पंजाबच्या तुरळक भागात थंडीची लाट येण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. आयएमडीच्या म्हणण्यानुसार, आकाश बहुतेक स्वच्छ राहील आणि पावसाची शक्यता नाही. सकाळच्या वेळी बहुतांश भागात उथळ धुके किंवा धुके पडण्याची शक्यता आहे. कमाल तापमान २३ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान ८ अंश सेल्सिअस राहील, असा अंदाज आहे.

Team India T20I Stats In Rajkot: टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टीम इंडियाची राजकोटमध्ये अशी आहे कामगिरी, येथे पाहा 'मेन इन ब्लू'ची आकडेवारी

Nitin Kurhe

दुसऱ्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात टीम इंडियाने इंग्लंडचा दोन विकेट्सने पराभव केला आहे. यासह टीम इंडियाने मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. आता मालिकेत टिकून राहण्यासाठी इंग्लंडला तिसरा टी-20 सामना जिंकणे आवश्यक आहे. या मालिकेत इंग्लंडची कमान जोस बटलरच्या खांद्यावर आहे. तर, टीम इंडियाचे नेतृत्व सूर्यकुमार यादव करत आहे.

India vs England, T20I Stats: टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टीम इंडिया आणि इंग्लंडची एकमेकांविरुद्ध अशी आहे कामगिरी, दोन्ही संघांची येथे पाहा आकडेवारी

Nitin Kurhe

दुसऱ्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात टीम इंडियाने इंग्लंडचा दोन विकेट्सने पराभव केला आहे. यासह टीम इंडियाने मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. आता मालिकेत टिकून राहण्यासाठी इंग्लंडला तिसरा टी-20 सामना जिंकणे आवश्यक आहे. या मालिकेत इंग्लंडची कमान जोस बटलरच्या खांद्यावर आहे. तर, टीम इंडियाचे नेतृत्व सूर्यकुमार यादव करत आहे.

Champions Trophy 2025 पूर्वी पाकिस्तानला मोठा धक्का, 'हा' स्टार खेळाडू स्पर्धेतून पडू शकतो बाहेर

Nitin Kurhe

19 फेब्रुवारीपासून पाकिस्तान आणि दुबई येथे होणाऱ्या या स्पर्धेसाठी अयुब उपलब्ध असेल का हे पाकिस्तानी निवडकर्त्यांना जाणून घ्यायचे होते. आता त्याच्याबद्दल, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे प्रमुख मोहसिन नक्वी म्हणाले की तो त्याच्या भविष्याबाबत कोणताही धोका पत्करू इच्छित नाही.

Advertisement

ICC Champions Trophy 2025: चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासात 'या' भारतीय गोलंदाजांनी घातला धुमाकूळ, घेतल्या आहेत सर्वाधिक विकेट्स; पाहा संपूर्ण यादी

Nitin Kurhe

बीसीसीआयने 18 जानेवारी रोजी होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचा चॅम्पियन्स ट्रॉफी आणि इंग्लंड वनडेसाठी भारताच्या संघात समावेश करण्यात आला आहे.

IND Likely Playing XI For 3rd T20I Against ENG: टीम इंडियामध्ये होणार मोठा बदल? तिसऱ्या टी-20 मध्ये मोहम्मद शमीला मिळू शकते संधी, राजकोटमध्ये भारत 'या' दिग्गजांसह उतरू शकतो मैदानात

Nitin Kurhe

टीम इंडियाने मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. आता मालिकेत टिकून राहण्यासाठी इंग्लंडला तिसरा टी-20 सामना जिंकणे आवश्यक आहे. या मालिकेत इंग्लंडची कमान जोस बटलरच्या खांद्यावर आहे. तर, टीम इंडियाचे नेतृत्व सूर्यकुमार यादव करत आहे.

Fire At Firecracker Market In Jabalpur: जबलपूरमधील फटाका बाजारात भीषण आग; आगीत 10 हून अधिक दुकाने जळून खाक (Watch Video)

Bhakti Aghav

वृत्तसंस्था एएनआयने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये दूरवर मोठ्या ज्वाळा दिसत असून घटनास्थळी स्फोटांचे आवाज ऐकू येत आहेत. अग्निशमन दल आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी काम करत आहे.

Railway Track Rod Falls On Auto In Warangal: हृदयद्रावक! तेलंगणातील वारंगलमध्ये लोखंडी सळ्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची ऑटोरिक्षाला धडक; 7 जणांचा मृत्यू, 6 जखमी

Bhakti Aghav

लोखंडाने भरलेल्या एका लॉरीने दोन ऑटो रिक्षांना ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला तेव्हा हा अपघात झाला. ओव्हरटेक करताना, लॉरीमधून एक लोखंडी रॉड ऑटो रिक्षावर पडला आणि त्यात सात जण जागीच ठार झाले. मृतांमध्ये चार महिला आणि एका मुलाचा समावेश आहे.

Advertisement
Advertisement