ठळक बातम्या

Lala Lajpat Rai Jayanti 2025 Quotes: लाला लजपतराय यांच्या जयंतीनिमित्त जाणून घ्या त्यांचे अमूल्य विचार, येथे पाहा खास संदेश

Shreya Varke

'करो या मरो'चे धोरण अवलंबणारे लाला लजपतराय हे काँग्रेस पक्षाचे नेते होते आणि लोक त्यांना प्रेमाने लालाजी म्हणून हाक मारत असत. त्यांच्या जयंतीनिमित्त देशभरातील लोक स्वातंत्र्य लढ्यातील त्यांच्या योगदानाचे स्मरण करून त्यांना आदरांजली वाहतात. 'पंजाब केसरी' लाला लजपत राय यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे हे 10 महान विचार तुम्हीही आपल्या प्रियजनांसोबत शेअर करू शकता.

Indore Shocker: शाळेत १२ वर्षीय मुलाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू, कुटुंबीयांना मोठा धक्का

Shreya Varke

हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होण्याचे प्रमाण खूप जास्त आहे. पूर्वी वृद्धांमध्ये हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण अधिक होते, परंतु आता लहान शाळकरी मुलांनाही हृदयविकाराचा झटका येण्याची तक्रार येऊ लागली आहे. अशीच एक घटना इंदूर जिल्ह्यात उघडकीस आली आहे. लासुदिया पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना उघडकीस आली आहे. आठवीत शिकणाऱ्या १२ वर्षीय विद्यार्थ्याला शर्यती दरम्यान हृदयविकाराचा झटका आला.

Vinod Kambli आणि Andrea Hewitt यांचाही होणार होता घटस्फोट; थोडक्यात वाचला संसार, जाणून घ्या नेमकं घडलं तरी काय?

Jyoti Kadam

विनोद कांबळी यांची पत्नी अँड्रिया हेविटने नुकत्याच एका मुलाखतीत मोठा खुलासा केला. 2023 मध्ये अँड्रियाने घटस्फोटासाठी अर्ज केल्याचे म्हटले.

Couple Dies By Suicide In Front Of Train At Vikhroli Station: कुटुंबियांचा प्रेमसंबंधाला विरोध; विक्रोळी स्टेशनवर ट्रेनसमोर उडी मारून मारून जोडप्याने संपवली जीवनयात्रा

Bhakti Aghav

कुर्ला रेल्वे पोलिसांनी (Kurla Railway Police) अपघाती मृत्यूचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. या घटनेत भांडुपमधील हनुमान नगर येथील रहिवासी नितेश दंडपल्ली (वय, 20) यांचा समावेश आहे, जो त्याच परिसरातील एका 15 वर्षीय मुलीशी प्रेमसंबंधात होता.

Advertisement

Ranji Trophy 2025: रोहित-गिलनंतर केएल राहुल देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळणार, जाणून घ्या रणजी ट्रॉफीत कधी दिसणार?

Amol More

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये खेळणारे भारतीय संघातील अनेक खेळाडू सध्या रणजी ट्रॉफीमध्ये आपली ताकद दाखवत आहेत. यामध्ये रोहित शर्मा, शुभमन गिल, ऋषभ पंत, यशस्वी जयस्वाल, श्रेयस अय्यर आणि रवींद्र जडेजा सारखे खेळाडूंचा समावेश आहे. आता अशी बातमी येत आहे की भारतीय संघाचा स्टार फलंदाज केएल राहुल देखील लवकरच

ICC Women's ODI Cricketer of The Year: भारतीय खेळाडू Smriti Mandhana ठरली आयसीसी महिला वनडे 'क्रिकेटर ऑफ द इयर'; दुसऱ्यांदा जिंकला पुरस्कार

Prashant Joshi

स्मृतीने गेल्या वर्षी एकूण 13 सामने खेळले, ज्यामध्ये ती 57.46 च्या उत्कृष्ट सरासरीने आणि 95.15 च्या मजबूत स्ट्राइक रेटने 747 धावा करण्यात यशस्वी ठरली. या काळात तिने 4 शतके आणि 3 अर्धशतके झळकावली.

PM Kisan Yojana: पीएम किसान योजना, 19 वा हप्ता कधी होणार खात्यावर जमा? फेब्रुवारी महिन्यातील तारीख निश्चित

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

PM Kisan February 2025: पीएम किसान 19 वा हप्ता फेब्रुवारीमध्ये अपेक्षित आहे 2025. पात्र शेतकऱ्यांना त्यांच्या बँक खात्यात थेट २००० रुपये मिळतील. पात्रता, अर्ज कसा करावा आणि इतर प्रमुख तपशीलांबद्दल जाणून घ्या.

Mahakumbh 2025: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संतांसह केले त्रिवेणी संगमात पवित्र स्नान (Watch Video)

Bhakti Aghav

अमित शहा यांनी सोमवारी प्रयागराज येथील महाकुंभात त्रिवेणी संगमात साधू आणि संतांसह पवित्र स्नान केले. याआधी त्यांनी संतांशीही चर्चा केली. प्रशासनाने त्यांच्या आगमनाची विस्तृत तयारी केली होती.

Advertisement

Ration Card Update: नागरिकांसाठी महत्वाची बातमी! 15 फेब्रुवारीनंतर रेशन कार्ड असूनही मिळणार नाही धान्य, जाणून घ्या सविस्तर

Shreya Varke

केंद्र सरकारने नागरिकांसाठी अनेक योजना राबविल्या आहेत. या योजनांमध्ये नागरिकांना आर्थिक मदत मिळते. केंद्र सरकारने राबविलेली अशीच एक योजना म्हणजे रेशन कार्ड हि आहे. शिधापत्रिकाधारकांना कमी दरात रेशन दिले जाते. या योजनेअंतर्गत सरकार सर्वसामान्य नागरिकांना मदत करते. गरीब कुटुंबातील नागरिकांना जीवनावश्यक वस्तू कमी दरात दिल्या जातात. कोट्यवधी लोकांना या योजनेचा लाभ होतो.

Pakistan vs West Indies 2nd Test 2025 Day 3 Scorecard: दुसऱ्या कसोटीत पाकिस्तानचा 120 धावांनी पराभव; वेस्ट इंडिजने मालिका 1-1 ने बरोबरीत संपवली, सामन्याचा स्कोअरकार्ड पहा

Jyoti Kadam

पाकिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि वेस्ट इंडिज क्रिकेट संघ यांच्यातील दुसरा कसोटी सामना मुलतानमधील मुल्तान क्रिकेट स्टेडियमवर खेळवण्यात आला. वेस्ट इंडिजने पाकिस्तानचा 120 धावांनी पराभव करत 2 सामन्यांची मालिका 1-1 अशी बरोबरीत संपवली.

Pune Guillain-Barre Syndrome Cases: पुण्यात गुइलेन-बॅरे सिंड्रोमचा प्रादुर्भाव; आता WHO करत आहे परिस्थितीची पाहणी, संघटनेने दिली नांदेड गावाला भेट (Video)

Prashant Joshi

पुण्यात जीबीएसच्या प्रादुर्भावादरम्यान जागतिक आरोग्य संघटना (WHO) आणि पुणे महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांच्या पथकाने नांदेड गावाला भेट दिली. हा आजार मोठे आरोग्य संकट बनू नये, यासाठी जगातील आरोग्य संघटना आता परिस्थितीची पाहणी करत आहे.

Bomb Threat In Sardar Vallabhbhai Patel School at Kandivali: कांदिवलीतील सरदार वल्लभभाई पटेल शाळेत बॉम्बने उडवून देण्याची धमकी; अफझल टोळीकडून आला धमकीचा ई-मेल

Bhakti Aghav

मुंबईतील कांदिवली परिसरातील सरदार वल्लभभाई पटेल शाळेला (Sardar Vallabhbhai Patel School) सोमवारी एक धमकीचा ई-मेल मिळाला. अफझल टोळीकडून आलेल्या या मेलमध्ये सरदार वल्लभभाई पटेल शाळेचा परिसर उडवून देण्याची धमकी देण्यात आली.

Advertisement

Woman Finds Worms In Chicken: चिकन खाणाऱ्या महिलेच्या जेवणात आढळल्या अळ्या, व्हिडिओ पाहिल्यानंतर सोडणार मांसाहार, पाहा व्हिडीओ

Shreya Varke

इंटरनेटवर मांसाहारी खाद्यपदार्थांनाचा आणखी एक घृणास्पद व्हिडीओ व्हायरल होत आहे. इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओमध्ये एका महिलेला अशाच एक वाईट प्रसंगाला सामोरे जाताना दिसत आहे. ज्यात चिकनमध्ये मोठमोठे किडे रेंगाळताना दिसत आहे. या क्लिपमध्ये ग्राहकाला दिलेल्या चिकनच्या तुकड्याभोवती अनेक कीटक रेंगाळताना दिसत आहेत. जेवणाची थाळी पाहिली तर ग्राहकाला काही घास खाल्ल्यानंतर अळ्या दिसल्यासारखे वाटत होते.

Pune IT Job Walk-in Interview: अबब! केवळ 100 पदांसाठी तब्बल 3,000 अभियंते रांगेत; पुण्यातील ज्युनियर डेव्हलपरच्या वॉक-इन मुलाखतीचा व्हिडिओ व्हायरल, आयटी जॉब स्पर्धेचे विदारक चित्र (Video)

Prashant Joshi

आयटी टॅलेंटचे भरभराटीचे केंद्र म्हणून पुण्याची ख्याती असूनही, नोकर भरतीसाठी इतक्या मोठ्या प्रमाणात जमलेले तरुण ही बाब नवीन कामाबाबतची आव्हाने अधोरेखित करते.

Applications For SEBI Chairman Post: सेबीला मिळणार नवीन अध्यक्ष, सरकारने मागवले अर्ज; पगार आणि पात्रतेसह जाणून घ्या अटी

Bhakti Aghav

सेबीने नवीन अध्यक्षांसाठी अर्ज मागवले आहेत. विद्यमान अध्यक्षा माधवी पुरी बुच यांचा तीन वर्षांचा कार्यकाळ 28 फेब्रुवारी रोजी संपत आहे. पीटीआयच्या वृत्तानुसार, बुच यांनी 2 मार्च 2022 रोजी सेबीचे अध्यक्षपद स्वीकारले होते.

Maha Kumbh 2025: अनिल अंबानी आणि टीना अंबानी यांनी प्रयागराज महाकुंभात केले स्नान, येथे पाहा व्हायरल व्हिडीओ

Shreya Varke

प्रयागराजयेथील महाकुंभमेळ्यात लाखो भाविक संगमात स्नान करण्यासाठी दाखल होत आहेत. दरम्यान, उद्योगपती अनिल अंबानी आणि त्यांच्या पत्नी टीना अंबानी यांनीही महाकुंभात हजेरी लावत संगमात स्नान केले. अनिल अंबानी आणि टीना अंबानी यांच्यासह इतरही अनेक नामवंत व्यक्ती या महाकुंभात सहभागी होत आहेत. पौष पौर्णिमेला १३ जानेवारीपासून सुरू झालेला महाकुंभ मेळ्यात अनेक भाविक येत आहेत. आतापर्यंत लाखो भाविकांचे स्वागत करण्यात आले आहे.

Advertisement

Jay Shah Offers Prayers At Hanumangarhi Temple: आयसीसी अध्यक्ष जय शाह यांच्याकडून अयोध्येत हनुमानगढी मंदिरात पूजा (Watch Video)

Jyoti Kadam

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (ICC) अध्यक्ष जय शाह यांनी अयोध्या येथे हनुमानगड मंदिरात पूजा केली. ज्याचा व्हिडिओ एएनआय या वृत्तसंस्थेने शेअर केला आहे.

Mahakumbh Mela 2025 From Space: पहा अंतराळातून कसे दिसते महाकुंभाचे दृश्य; NASA च्या अंतराळवीराने शेअर केली छायाचित्रे (See Photos)

Prashant Joshi

नासाचे अंतराळवीर डॉन पेटिट यांनी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरून (ISS) महाकुंभाचे छायाचित्र शेअर केले आहे. या फोटोमध्ये प्रयागराज शहर दिव्यांनी उजळून निघालेले दिसत आहे.

Hair Loss and Baldness Cases In Buldhana: बुलढाणा जिल्ह्यातील केस गळणे, टक्कल पडणे कारणे आणि समस्या समजल्या; आरोग्य विभागाच्या पत्रामुळे माटरगाव खुर्दचे ग्रामस्थ चिंतेत

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

Hair Care Tips: नायट्रेट अधिक प्रमाणावर असलेले पाणी प्यायलाने बुलढाणा जिल्ह्यातील विविध गावांमध्ये नागरिकांना केस गळणे, टक्कल पडणे अशी समस्या उद्भवली आहे. समस्याग्रस्त माटरगाव बुद्रुक ग्रामपंचायत कार्यालयास आरोग्य विभागाकडून लेखी पत्राद्वारे शुद्भ पाणी पिण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

Car Falls Into Gorge At Varandha Ghat: वरंधा घाटात 100 फूट खोल दरीत कोसळली कार; एकाचा मृत्यू, 8 जखमी

Bhakti Aghav

महाडहून भोरला जात असताना पहाटे 4:00 वाजता उंबर्डे गावाजवळ गाडीचे नियंत्रण सुटले आणि कार दरीत कोसळली. या अपघातात एका प्रवाशाचा मृत्यू झाला असून आठ जण जखमी झाले. जखमींपैकी अनेकांची प्रकृती गंभीर असल्याचे वृत्त आहे.

Advertisement
Advertisement