Fire At Firecracker Market In Jabalpur: जबलपूरमधील फटाका बाजारात भीषण आग; आगीत 10 हून अधिक दुकाने जळून खाक (Watch Video)

वृत्तसंस्था एएनआयने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये दूरवर मोठ्या ज्वाळा दिसत असून घटनास्थळी स्फोटांचे आवाज ऐकू येत आहेत. अग्निशमन दल आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी काम करत आहे.

Fire At Firecracker Market In Jabalpur (फोटो सौजन्य - ANI)

Jabalpur Fire: रविवारी जबलपूरमधील फटाका बाजारात भीषण आग लागली. प्रादेशिक माध्यमांच्या वृत्तानुसार आगीत 10 हून अधिक दुकाने आणि 12 डझनहून अधिक दुचाकी जळून खाक झाल्या आहेत. वृत्तसंस्था एएनआयने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये दूरवर मोठ्या ज्वाळा दिसत असून घटनास्थळी स्फोटांचे आवाज ऐकू येत आहेत. अग्निशमन दल आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी काम करत आहे. आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

जबलपूरमधील फटाका बाजारात भीषण आग, पहा व्हिडिओ -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement