ठळक बातम्या
Mumbai Local Western Railway Block Update: पश्चिम रेल्वे मार्गावर 8-9 फेब्रुवारी दरम्यान 13 तासांचा ब्लॉक; Grant Road-Mumbai Central दरम्यान देखभालीचं काम
Dipali Nevarekarदैनंदिन कामकाजातील व्यत्यय कमी करण्यासाठी हे काम रात्रभर केले जाणार आहे. ट्रॅक, सिग्नलिंग आणि ओव्हरहेड उपकरणांच्या देखभालीचे काम देखील केले जाणार आहे.
Mumbai: मुंबईत एनसीबीकडून केलेल्या कारवाईत 11.54 किलो कोकेन आणि 4.9 किलो ड्रग्स जप्त, 4 जणांना केली अटक
Shreya Varkeमुंबईत ड्रग्ज तस्करीचे नेटवर्क संपूर्ण ठिकाणी पसरलेले दिसत आहे. या जाळ्यात विद्यार्थ्यांसह बेरोजगार तरुण, तरुणी अडकत असल्याचे पाहायला मिळत आहे. तरुण आणि तरुणी नशेच्या आहारी जात असल्याचे पाहायला मिळत आहे. या परिस्थितीवर अनेकांनी चिंता व्यक्त केली आहे. दरम्यान, मुंबई झोनल युनिटने मुंबईतील ड्रग्ज तस्करीच्या मोठ्या आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश केला आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) ने केलेल्या या कारवाईत 11.54 किलो उच्च प्रतीचे कोकेन, 4.9 किलो हायब्रीड स्ट्रेन हायड्रोपोनिक तण, 5.5 किलो गांजाची गमी (200 पाकिटे) आणि 160,000 रुपये जप्त केले आहेत.
Marriage Break Due to Low CIBIL Score: ऐकावं ते नवलंच! नवऱ्या मुलाचा CIBIL स्कोअर कमी आल्याने मोडलं लग्न; अकोल्यातील घटना
Bhakti Aghavआतापर्यंत तुम्हा लग्न मोडण्याची विविध कारण ऐकली असतील पण तुमच्या CIBIL स्कोअरमुळे पण तुमचं लग्न मोडू शकतं, असं म्हटल्यास कदाचित तुम्हाला विश्वास बसणार नाही. कमी CIBIL स्कोअरमुळे बँक कर्ज नाकारू शकते. तथापि, एखाद्याच्या CIBIL स्कोअरचा थेट परिणाम लग्नावर होणे हे खूपचं दुर्मिळ आहे.
IND vs ENG 2nd ODI 2025: नागपुरमध्ये शानदार पुनरागमन, तरीही श्रेयस अय्यरला संघातून वगळण्याचा धोका, समजून घ्या संपूर्ण प्रकरण
Nitin Kurheअय्यरने केवळ मध्यंतरी अडकलेल्या भारतीय संघाची जबाबदारी घेतली नाही तर इंग्लिश गोलंदाजांनाही चांगलेच फटकावले. अय्यरच्या 36 चेंडूत 59 धावांच्या खेळीने सामन्याचा मार्ग पूर्णपणे बदलला. 163 च्या स्ट्राईक रेटने खेळत असलेल्या श्रेयसने त्याच्या डावात 9 चौकार आणि 2 षटकार मारले.
Navi Mumbai Shocker: नवी मुंबईतील पोद्दार शाळेत नववीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने शाळेच्या इमारतीवरून उडी केली आत्महत्या
Shreya Varkeनवी मुंबईतील पोद्दार शाळेत नववीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने शाळेच्या इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नवी मुंबईत उघडकीस आली आहे. नीलकृष्ण निलेश किन्हीकर असे या मुलाचे नाव आहे. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे. नववीत शिकणाऱ्या नीलकृष्णने अचानक इतके टोकाचे पाऊल का उचलले, याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. या घटनेमुळे शाळेत एकच खळबळ उडाली आहे.
त्रिशा गोंगडी जानेवारी महिन्यात महिला ICC Player of The Month साठी नॉमिनेट
Amol Moreआयसीसी मासिक पुरस्कारासाठी त्रिशा ऑस्ट्रेलियाची अनुभवी बेथ मुनी आणि वेस्ट इंडिजची फिरकीपटू करिश्मा रामहारिक यांच्याशी स्पर्धा करेल.
Rahul Gandhi: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक वादात, राहुल गांधी यांचे गंभीर आरोप; ECI, देवेंद्र फडणवीस यांची तत्काळ प्रतिक्रिया
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेराहुल गांधी आणि विरोधी पक्षनेत्यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत अनियमीतता झाल्याचा आरोप केला आहे. त्यासोबतच मतदार यादीतील कथित विसंगतींबद्दल चिंता व्यक्त केली आहे. त्यावर निवडणूक आयोग आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ प्रतिक्रिया दिली आहे.
The Diplomat Teaser Out: अभिनेता जॉन अब्राहमच्या 'द डिप्लोमॅट'चा टीझर रिलीज, टीझरमध्ये जॉन अब्राहमचा दमदार लूक आणि अॅक्शन सीन्स पाहून चाहत्यांना चित्रपटाची उत्सुकता
Shreya Varkeअभिनेता जॉन अब्राहम याचा आगामी 'द डिप्लोमॅट' चित्रपटाचा टीझर नुकताच रिलीज झाला आहे. टीझरमध्ये जॉन अब्राहमचा दमदार लूक आणि अॅक्शन सीन्स दाखवण्यात आले असून दमदार स्टाईलने प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी बॉलिवूड अॅक्शन स्टार जॉन अब्राहम पुन्हा एकदा सज्ज झाला आहे. द डिप्लोमॅट हा चित्रपट 7 मार्च 2025 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट शिवम नायर यांनी दिग्दर्शित केला असून यात हाय-ऑक्टेन थ्रिलर पाहायला मिळणार आहे,
SL vs AUS 2nd Test 2025 Day 2 Live Scorecard: दुसऱ्या दिवसाच्या लंच ब्रेकपर्यंत ऑस्ट्रेलियाने 2 गडी गमावून जोडल्या 85 धावा, श्रीलंकेचा पहिला डाव 257 धावांवर आटोपला, पाहा सामन्याचे लाईव्ह स्कोअरकार्ड
Amol Moreट्रॅव्हिस हेडने (21) काही आक्रमक फटके मारले पण निशान पेरिसच्या चेंडूवर दिनांजले डी सिल्वाने झेलबाद केले. मार्नस लॅबुशेन (4) प्रभात जयसूर्याने एलबीडब्ल्यू आऊट झाला.
Who is Mohini Mohan Datta: दिवंगत उद्योगपती रतन टाटा यांनी निकटवर्तीय मोहिनी मोहन दत्ता यांच्या नावे केले तब्बल 500 कोटी रुपये
Shreya Varkeटाटा समूहाचे माजी अध्यक्ष आणि पद्मविभूषण रतन टाटा यांचे 9 ऑक्टोबर 2024 रोजी निधन झाले आहे. रतन टाटा यांच्या निधनानंतर त्यांच्या संपत्तीचे काय होणार असा प्रश्न अनेकांना पडला होता. दरम्यान, रतन टाटा यांनी निधनापूर्वी एक-दोन कोटी नव्हे, तर ५०० कोटी रुपये एका व्यक्तीच्या नावे केले आहे. याचा खुलासा आता झाला आहे. दिवंगत उद्योगपती रतन टाटा यांच्या मालमत्तेबाबत नुकत्याच उघडण्यात आलेल्या इच्छापत्रानुसार त्यांनी आपल्या उर्वरित मालमत्तेचा एक तृतीयांश भाग त्यांचे निकटवर्तीय मोहिनी मोहन दत्ता (वय ७४) यांना दिला आहे.
Yashasvi Jaiswal Catch Reaction Video: 'अरे शर्मा क्यों रहा...' शानदार कॅचनंतर टीम इंडियाच्या खेळाडूंनी घेतली यशस्वी जैस्वालची फिरकी, पाहा व्हिडीयो
Amol Moreजैस्वालने मागे धावताना हा झेल घेतला, त्यामुळे त्याचे खूप कौतुक होत आहे. आता अक्षर पटेलने त्यांची फिरकी घेतली आहे. नागपूर एकदिवसीय सामन्यात भारताच्या 4 विकेट्सने विजय मिळवल्यानंतर बीसीसीआयने एक व्हिडिओ क्लिप शेअर केली आहे,
Pregnant Woman Sexually Assaulted: तामिळनाडूमध्ये चालत्या ट्रेनमध्ये गर्भवती महिलेवर लैंगिक अत्याचार; आरडा-ओरडा केल्याने आरोपींनी पीडितेला ट्रेनमधून फेकलं
Bhakti Aghavकोइम्बतूरमधील एका कपड्यांच्या कंपनीत काम करणारी ही महिला चित्तूरला जाण्यासाठी ट्रेनमध्ये चढली. येथे कोचमध्ये दोन पुरूषांनी तिचे लैंगिक शोषण केले.
Karuna Sharma on Dhananjay Munde: तर धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांचेही मंत्रिपद जाईल; करुणा शर्मा यांचा इशारा
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेकरुणा मुंडे यांनी धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांना इशारा देत म्हटले आहे की, मी तोंड उघडले तर त्यांचे मंत्रिपद जाईल.
ZIM vs IRE Only Test 2025 Day 2 Live Streaming: झिम्बाब्वे विरुद्ध आयर्लंड एकमात्र कसोटी सामन्याचा दुसऱ्या दिवसाचा खेळ रोमहर्षक ठरणार, जाणून घ्या केव्हा, कुठे आणि कसे पहायचे थेट प्रक्षेपण
Amol Moreआयर्लंड विरुद्ध झिम्बाब्वे द्विपक्षीय मालिकेचे टीव्ही प्रसारण भारतात उपलब्ध नाही. तथापि, भारतीय प्रेक्षक आयर्लंड विरुद्ध झिम्बाब्वे 2025 ही एकमेव कसोटी फॅनकोड ॲप आणि वेबसाइटवर लाईव्ह स्ट्रीमिंगद्वारे पाहू शकतात. यासाठी तुम्ही मॅच पास किंवा टूर पास खरेदी करून सामन्याचा आनंद घेऊ शकता.
Teacher Heart Attack: दहावीच्या विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभादरम्यान शिक्षकाचा हृदयविकाराचा झटक्याने निधन
Shreya Varkeपालघरच्या लालबहादूर शास्त्री हायस्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभादरम्यान घडलेल्या दुर्दैवी घटनेने सर्वांनाच हादरवून सोडले आहे. मनोर संकुलात असलेल्या एका शाळेत एका शिक्षकाला हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू झाला आहे. या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण शाळा आणि गावात शोककळा पसरली आहे. संजय लोहार असे निधन झालेल्या शिक्षकाचे नाव होते ते विद्यार्थ्यांमध्ये अत्यंत लोकप्रिय शिक्षक होते. शाळेत ही घटना घडली त्यावेळी दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ सुरू होता
Boy Killed As Car Hits At Nashik: नाशिकमध्ये हॉटेलच्या पार्किंग एरियामध्ये खेळणाऱ्या 4 वर्षाच्या मुलाला कारने चिरडले; चिमुरड्याचा मृत्यू (Watch Video)
Bhakti Aghavमृत मुलाचे वडील गाडी पार्क करण्यासाठी गेले असताना, पार्किंग क्षेत्रास आलेल्या दुसरा एका कारचालकाने मुलाला चिरडलं. घटनेनंतर कारचालक घटनास्थळावरून पळून गेला.
Delhi And Noida Schools Receive Bomb Threats: दिल्ली आणि नोएडातील सेंट स्टीफन्स कॉलेजच्या शाळांना बॉम्बच्या धमक्या
Bhakti Aghavशुक्रवारी सेंट स्टीफन्स कॉलेजसह (St. Stephen's College) नोएडा आणि दिल्लीतील दोन शाळांना ईमेलद्वारे बॉम्बस्फोटाच्या धमक्या मिळाल्या. पोलिसांनी श्वान पथकासह दोन्ही शाळांची झडती घेतली असून विद्यार्थ्यांना घरी पाठवण्यात आले आहे.
RBI MPC Meeting 2025: रेपो दरात 6.5% कपात; पाठिमागील पाच वर्षांमध्ये पहिल्यांदाच आरबीआयचा मोठा निर्णय
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेआरबीआयने जवळजवळ पाच वर्षात पहिल्यांदाच रेपो दर 25 बेसिस पॉइंट्सने कमी करून 6.5% केला आहे. जागतिक आव्हानांना न जुमानता गव्हर्नर संजय मल्होत्रा आर्थिक लवचिकतेवर प्रकाश टाकतात.
Santorini Island Earthquake: ग्रीसच्या सॅंटोरिनी बेटावर भूकंपाची मालिका सुरूच, ग्रीस सरकारकडून आणीबाणी जाहीर
Shreya Varkeग्रीसच्या सॅंटोरिनी बेटावर सुमारे एक आठवड्यापासून भूकंपांची मालिका सुरूच आहे. रिसॉर्ट बेटावर येत असलेल्या भूकंपानंतर ग्रीसच्या सरकारने गुरुवारी सँटोरिनीमध्ये आणीबाणी जाहीर केली आहे. बुधवारी रात्री बेटावर ५.२ रिश्टर स्केलतीव्रतेच्या भूकंपानंतर नागरी संरक्षण मंत्रालयाने आणीबाणी जाहीर केली आहे, ज्यामुळे अधिकाऱ्यांना तेथे तातडीने आवश्यक कारवाई करण्यास मदत होईल.