Marriage Break Due to Low CIBIL Score: ऐकावं ते नवलंच! नवऱ्या मुलाचा CIBIL स्कोअर कमी आल्याने मोडलं लग्न; अकोल्यातील घटना
आतापर्यंत तुम्हा लग्न मोडण्याची विविध कारण ऐकली असतील पण तुमच्या CIBIL स्कोअरमुळे पण तुमचं लग्न मोडू शकतं, असं म्हटल्यास कदाचित तुम्हाला विश्वास बसणार नाही. कमी CIBIL स्कोअरमुळे बँक कर्ज नाकारू शकते. तथापि, एखाद्याच्या CIBIL स्कोअरचा थेट परिणाम लग्नावर होणे हे खूपचं दुर्मिळ आहे.
Marriage Break Due to Low CIBIL Score: आतापर्यंत तुम्हा लग्न मोडण्याची विविध कारण ऐकली असतील पण तुमच्या CIBIL स्कोअरमुळे (CIBIL Score) पण तुमचं लग्न मोडू शकतं, असं म्हटल्यास कदाचित तुम्हाला विश्वास बसणार नाही. पण हे घडलं आहे. जास्त CIBIL स्कोअरमुळे कर्जावरील व्याजदर कमी होऊ शकतात, तर कमी स्कोअरमुळे जास्त व्याजदर मिळू शकतात. काही प्रकरणांमध्ये, कमी CIBIL स्कोअरमुळे बँक कर्ज नाकारू शकते. तथापि, एखाद्याच्या CIBIL स्कोअरचा थेट परिणाम लग्नावर होणे हे खूपचं दुर्मिळ आहे.
मुर्तिजापूरमध्ये, दोन कुटुंबांनी त्यांच्या मुलांच्या लग्नाच्या प्रस्तावावर चर्चा केली. मुलगा आणि मुलगी एकमेकांना पसंत पडल्यानंतर लग्न करण्याचा निर्णय घेण्यात आला. वराच्या घरी झालेल्या बैठकीत, वधूच्या काकांनी वराचा CIBIL स्कोअर तपासण्याचा आग्रह धरला. त्यानंतर एक आश्चर्यकारक खुलासा झाला. वराचा संपूर्ण आर्थिक इतिहास त्याच्या CIBIL स्कोअरद्वारे उलगडला गेला, ज्यामुळे त्याचे कुटुंब अवाक झाले. (हेही वाचा - Iraq To Legalise Child Marriage? इराकमध्ये बालविवाह कायदेशीर होण्याची शक्यता; सरकारचा मुलींच्या लग्नाचे वय 15 वरून 9 वर आणण्याचा प्रस्ताव)
नवऱ्या मुलाचा CIBIL स्कोअर कमी असल्याने मुलीच्या कुटुंबामध्ये चर्चा सुरू झाली. यावरून त्याची आर्थिक पार्श्वभूमी मुलींच्या घरच्यांना माहित झाली. मुलाने अनेक बँकांकडून घेतलेले कर्ज घेतल्याचं त्याच्या CIBIL वरून उघडकीस आलं. त्याच्या कर्जाची माहिती समोर आल्यानंतर वधूच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला. त्यानंतर नवऱ्या मुलीच्या काकांनी मुलगा आर्थिकदृष्ट्या अस्थिर असल्याचं कारण सांगून जमलेलं लग्न मोडलं. (हेही वाचा: New Degree In Marriage: घटत्या जन्मदराच्या पार्श्वभूमीवर चिनी विद्यापीठाने जाहीर केली 'विवाह' विषयातील नवीन पदवी)
CIBIL स्कोअर म्हणजे काय?
पूर्वी क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो (इंडिया) लिमिटेड (CIBIL) म्हणून ओळखले जाणारे ट्रान्सयुनियन CIBIL लिमिटेड, भारतातील कर्जदारांचे क्रेडिट स्कोअर राखते. CIBIL स्कोअर हा तीन-अंकी क्रमांक असतो जो एखाद्या व्यक्तीचा क्रेडिट इतिहास, रेटिंग आणि अहवाल दर्शवतो. हा स्कोअर 300 ते 900 च्या दरम्यान असतो. जास्त स्कोअर असल्यास बँका मोठ्या प्रमाणावर कर्ज देतात.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)