India National Cricket Team vs Bangladesh National Cricket Team Match Scorecard: भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ (India National Cricket Team) विरुद्ध बांगलादेश राष्ट्रीय क्रिकेट संघ (Bangladesh National Cricket Team) यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामन्याला शुक्रवारपासून सुरुवात झाली आहे. हा सामना कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर खेळला जात आहे. भारताने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. आज सामन्याचा चौथा दिवस आहे. याआधीचे तीन दिवस पावसामुळे वाया गेल. दरम्यान, प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या बांगलादेशचा पहिला डाव 233 धावांवर गारद झाला आहे. रवींद्र जडेजाने शेवटची विकेट घेवुन कसोटीत 300 बळी पूर्ण केले आहे
2ND Test. WICKET! 74.2: Khaled Ahmed 0(4) ct & b Ravindra Jadeja, Bangladesh 233 all out https://t.co/VYXVdyNHMN #INDvBAN @IDFCFIRSTBank
— BCCI (@BCCI) September 30, 2024
मोमिनुल हकने केल्या नाबाद 107 धावा
त्याआधी भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेत बांगालदेशला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. बांगलादेशने पहिल्या डावात दहा विकेट गमावून 233 धावा केल्या. बांगलादेशकडून मोमिनुल हकने नाबाद 107 सर्वाधिक धावा केल्या. तर भारताकडून जसप्रीत बुमराहने तीन आणि सिराज-अश्विनने प्रत्येकी दोन-दोन विकेट घेतल्या. आता पहिल्या डावासाठी भारतीय संघ फलंदाजीसाठी मैदानात उतरणार आहे. (हे देखील वाचा: Rohit Sharma Catch Video: उडता रोहित शर्मा! 'हिटमॅन'ने एका-हाती घेतला धक्कादायक झेल, बांगलादेशच्या फलंदाज पाहतच राहिला)
दोन्ही संघांची प्लेइंग 11
भारत
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, आकाश दीप, मोहम्मद सिराज.
बांगलादेश
शादमान इस्लाम, झाकीर हसन, नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), मोमिनुल हक, मुशफिकुर रहीम, शाकिब अल हसन, लिटन दास (विकेटकीपर), मेहदी हसन मिराझ, तैजुल इस्लाम, हसन महमूद, खालेद अहमद