Nagpur: महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेनंतर नागपुरात स्थानिकांकडून मैदानाचे शुद्धीकरण, Watch
खेळाच्या मैदानावर महाविकास आघाडीने सभा घेतल्यानंतर याठिकाणी कचरा झाला असून तो साफ करण्याचं काम येथील स्थानिक आणि भाजप कार्यकर्ते करत आहेत.
Nagpur: रविवारी नागपूरमध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांची सरकारविरोधात वज्रमूठ सभा पार पडली. या सभेतून महाविकास आघाडीतील नेत्यांनी सरकारवर टीकेची तोफ डागली. दरम्यान आज शहरातील भाजप कार्यकर्त्यांनी आणि स्थानिकांनी या मैदाचे गोमूत्र शिंपडून शुद्धीकरण केलं. खेळाच्या मैदानावर महाविकास आघाडीने सभा घेतल्यानंतर याठिकाणी कचरा झाला असून तो साफ करण्याचं काम येथील स्थानिक आणि भाजप कार्यकर्ते करत आहेत. (हेही वाचा - Uddhav Thackeray Statement: आरएसएस-भाजपचे हिंदुत्व म्हणजे गोमूत्र हिंदुत्व, उद्धव ठाकरेंची घणाघाती टीका)