महाराष्ट्र

Amravati News: 'मोदीजी आपसे बैर नही, राणा तेरी खैर नही', बॅर्नसमुळे अमरावतीत राजकारणात खळबळ

Pooja Chavan

लोकसभा निवडणूकी पूर्वी आज राजकिय पक्षांनी आपआपल्या उमेदवारांची नावे घोषित करण्यास सुरुवात केली आहे.

Congress Leaders Meet Sharad Pawar: शरद पवार आणि काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये महत्त्वाची बैठक (Watch Video)

टीम लेटेस्टली

राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा एका बाजूला मुंबईत प्रवेश करत आहे. दुसऱ्या बाजूला काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे. काँग्रेस नेते केसी वेणुगोपाल, रमेश चेन्निथला आणि बाळासाहेब थोरात यांनी मुंबईत येथे ही भेट घेतली.

Pune Fire: पुण्यात दोन ठिकाणी आग, घटनेमुळे शहरात खळबळ, सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही

Pooja Chavan

पुणे शहरातील येरवाड्यात लाकडी साहित्याच्या गोदामाला आग लागल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Bharat Jodo Yatra in Mumbai Today: भारत जोडो यात्रा आज मुंबईमध्ये, महाराष्ट्र काँग्रेस निवडणुकीसाठी पूर्णपणे सज्ज- नाना पटोले

टीम लेटेस्टली

राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रा आज मुंबईमध्ये दाखल होत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र क्रॉग्रेस अधिक सक्रीय झाली आहे. प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्र काँग्रेस निवडणुकीसाठी पूर्णपणे सज्ज आहे.

Advertisement

Mumbai Customs: मुंबई विमानतळावरुन 1.72 कोटी रुपयांचे 2.99 किलो सोने जप्त

टीम लेटेस्टली

अधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीमध्ये हे सोने आरोपींच्या अंगावर, खाद्यपदार्थ असलेल्या खजूर आणि शरीराच्या इतर पोकळ अवयवांमध्ये साठवले होते, अशी माहिती विमानतळ आयुक्तालयाने दिली आहे. ही कारवाई 14-15 मार्च रोजी करण्यात आली.

Virar Crime: विरार येथे 40 वर्षीय व्यक्तीची निर्घृण हत्या, आरोपीवर गुन्हा दाखल

Pooja Chavan

विरार पूर्व परिसरातील नांरगी कोपरी कच्ची खदान रोडवर एका ४० वर्षीय व्यक्तीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

10-Year-Old Boy Raped by 3 Minors: मुंबईच्या घाटकोपरमध्ये 10 वर्षीय मुलावर बलात्कार; 3 अल्पवयीन मुलांना अटक, गुन्हा दाखल

टीम लेटेस्टली

या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पीडित मुलाचा जबाब नोंदवण्यात आला आहे. त्यानंतर पोलिसांनी घाटकोपर येथील 12, 15 आणि 16 वर्षे वयोगटातील तीन मुलांना ताब्यात घेतले.

Maharashtra To Purchase Land In Kashmir: पर्यटन भवनासाठी महाराष्ट्र काश्मीरमध्ये जमीन खरेदी करणार; ठरणार असे करणारे पहिले भारतीय राज्य

टीम लेटेस्टली

नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय भाषणात, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी श्रीनगर आणि अयोध्येत पर्यटक आणि भाविकांच्या सुविधा वाढवण्यासाठी दोन महाराष्ट्र भवन बांधण्याची घोषणा केली. या दोन भवनांच्या बांधकामासाठी राज्य सरकारने 77 कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

Advertisement

Malegaon Bomb Blast Case : मोठी बातमी! मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी साध्वी प्रज्ञा ठाकूरनंतर सुधाकर द्विवेदीविरोधात वॉरंट जारी

Jyoti Kadam

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी सुनावणीच्यावेळी सातत्यानं गैरहजर राहिल्यानं सुधाकर द्विवेदी याला न्यायालयाने जोरदार धक्का दिली आहे. विशेष न्यायाधीश लाहोटी यांनी याबाबत गंभीर दखल घेत द्विवेदीविरोधात वॉरंट जारी केले आहे.

Mumbai: 'इतरांना गुलामगिरीत अडकवून कल्याणकारी राज्यात स्वच्छता साधता येत नाही'; Bombay High Court ची BMC वर टीका, जाणून घ्या काय आहे प्रकरण

टीम लेटेस्टली

उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने बीएमसीची याचिका फेटाळताना म्हटले आहे की, औद्योगिक न्यायाधिकरणाचा आदेश बाजूला ठेवणे ही न्यायाची फसवणूक होईल. कल्याणकारी राज्यात, नागरिकांच्या एका विभागाची स्वच्छता इतरांना ‘गुलामगिरी’त ढकलून साध्य करता येत नाही. शहर ज्या पायावर काम करते त्याला आधार देण्याचे काम हे 580 कामगार करतात.

CM Eknath Shinde : मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा! सफाई कर्मचा-यांच्या मुलांच्या परदेशातील शिक्षणाची जबाबदारी आता महापालिकेची

Jyoti Kadam

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिका कर्मचाऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. त्यांच्या मुलांच्या परदेशातील शिक्षणाचा खर्च महापालिका करणार आहे.

Mumbai Shocker: सहकाऱ्याच्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार; तटरक्षक दलाच्या दोन कर्मचाऱ्यांना अटक

टीम लेटेस्टली

एका पोलीस अधिकाऱ्याने माहिती दिली आहे. ही घटना गेल्या वर्षी 17 ऑक्टोबर रोजी शहराच्या उत्तर उपनगरातील आरोपीच्या घरात घडली होती. ही मुलगी दहावीची विद्यार्थिनी आहे, तर आरोपी तटरक्षक कर्मचारी 30 आणि 23 वर्षांचे आहेत.

Advertisement

Pune Accident: वाघोलीत ओव्हरटेकच्या नादात टॅंकरची धडक समोरून येणाऱ्या दुचाकीला, एकाचा मृत्यू, थरारक घटनेचा Video आला समोर

Pooja Chavan

पुण्यात एक भीषण अपघात घडला आहे. हा अपघात जवळच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

Pimpri Chinchwad Crime: पिंपरी चिंचवडमध्ये बॉयफ्रेंडच्या मदतीनं पत्नीनं केली पतीची हत्या, आरोपीला अटक

Amol More

राहुल गाडेकर याची पत्नी सुप्रिया गाडेकर हिने कोरोना काळामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील निमगाव पांगा या ठिकाणी एक लॅब सुरू केली होती. ही लॅब चालवत असतानाच तिचे सुरेश मोटाभाऊ पाटोळे या भारतीय सैन्य दलातील जवानाशी विवाहबाह्य प्रेमसंबंध जुळले.

New GM Of BEST: वरिष्ठ IAS अधिकारी अनिल डिग्गीकर यांनी स्वीकारला बेस्टच्या महाव्यवस्थापक पदाचा पदभार

Bhakti Aghav

प्रमुख नियुक्त्यांपैकी, डिग्गीकर यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त, पुण्यातील महाराष्ट्र ऊर्जा विकास संस्थेचे (महाऊर्जा) महासंचालक आणि बीएमसीमध्ये अतिरिक्त आयुक्त म्हणून काम केले आहे.

Sachin Ahir on petrol-diesel prices fell : 'इंधन दर कपात हा भाजपचा प्रत्येक निवडणूकीपूर्वीचा 'झुमला'', सचिन अहिर यांची टिका (Watch Video)

Jyoti Kadam

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करण्यात आले आहेत. त्यावर विरोधकांकडून सडकू टिका करण्यात येत आहे. सचिन अहिर यांनी इंधन दर कपातीवरून भाजपवर टिका केली आहे.

Advertisement

MVA Meeting: महाविकास आघाडीची आज जागा वाटपावर बैठक; प्रकाश आंबेडकर यांना अद्याप आमंत्रण नाही

टीम लेटेस्टली

ठाकरे गट, कॉंग़्रेस आणि शरद पवार गट पहिल्यांदा एकत्र निवडणूकीला सामोरे जात आहेत. त्यामुळे त्यांच्यातील जागावाटप कसे होणार हे पाहणं कार्यकर्त्यांसाठीही उत्सुकतेचे आहे.

Lok Sabha Election 2024: नाशिकची जागा आपल्यालाच हवी, भाजपच्या कार्यकर्त्यांची मंत्री महाजनांकडे मागणी

Amol More

नाशिक लोकसभा मतदारसंघात गोडसे यांच्या विरोधात वातावरण असून, अनेक सर्वेक्षणातून हे पुढे आले आहे. यात नाशिकच्या जागेबाबत खासदार शिंदे यांनी खासदार हेमंत गोडसे यांचे नाव परस्पर जाहीर केल्याने नाराजी व्यक्त केली.

Mumbai News: विनाकारण पाच जणांवर चाकूने हल्ला, आरोपीवर गुन्हा दाखल, साकीनाका येथील घटना

Pooja Chavan

मुंबईतील साकी नाका परिसरात एका व्यक्तीने विनाकारण पाच जणांवर चाकूने वार केल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.

Bharat Jodo Nyay Yatra : राहुल गांधींची 'भारत जोडो न्याय यात्रा' पालघरमध्ये दाखल, स्थानिक पश्नांवरून साधणार जनतेशी संवाद

Jyoti Kadam

पालघरमध्ये काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची 'भारत जोडो न्याय यात्रा' दाखल झाली आहे. तिथे जनतेशी संवाद साधून ते राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच ठाण्यात दाखल होणार आहेत.

Advertisement
Advertisement