Marathi Bhasha Din 2019: मराठी राजभाषा दिन 27 फेब्रुवारी दिवशीच साजरा करण्याचं नेमकं कारण काय?

कुसुमाग्रज म्हणजेच विष्णू वामन शिरवाडकर यांचा जन्मदिन म्हणून हा दिवस त्यांच्या स्मरणार्थ साजरा केला जातो.

Marathi Bhasha Din 2019 (Photo Credit: File Photo)

Marathi Rajbhasha Diwas 2019: 27 फेब्रुवारी हा दिवस जागतिक स्तरावर मराठी राजभाषा दिवस (Marathi Rajbhasha Din) म्हणूण ओळखला जातो. ज्येष्ठ साहित्यिक विष्णू वामन शिरवाडकर (Vishnu Vaman Shirwadkar) म्हणजे कुसुमाग्रज (Kusumagraj) यांचा जन्मदिन 'मराठी भाषा दिवस' म्हणून साजरा केला जातो. मराठी ही भाषा महाराष्ट्र आणि गोवा या राज्याची अधिकृत भाषा आहे. महाराष्ट्राची राजभाषा म्हणून तिची ओळख आहे. मात्र अजुनही मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त झालेला नाही. त्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारकडून प्रयत्न सुरु आहेत. Marathi Bhasha Din 2019: मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी खास WhatsApp Messages, SMS, Wishes आणि शुभेच्छापत्र!

27 फेब्रुवारी दिवशी मराठी भाषा दिन का साजरा केला जातो?

साहित्यिक विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज यांना साहित्य विश्वातला मानाचा 'ज्ञानपीठ पुरस्कार' देऊन गौरव करण्यात आला. 1987 साली त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार देण्यात आला. त्यानंतर कुसुमाग्राज यांचा जन्मदिन मराठी भाषेचा गौरव दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला. म्हणून 27 फेब्रुवारी हा दिवस जागतिक पातळीवर मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. Marathi Bhasha Din 2019: मराठी भाषेचं सौंदर्य अधिक खुलवतात महाराष्ट्रातील या '14' मजेशीर बोली भाषा

कसा साजरा केला जातो मराठी राजभाषा दिवस?

जागतिकीकरणाच्या आजच्या युगात इंग्रजी भाषेचा प्रभाव वाढत आहे. अशामध्ये अनेक प्रादेशिक भाषा हरवत चालल्या आहेत. त्यामुळे मराठी भाषा बोली भाषेत,लिखाणात, श्राव्य साहित्याच्या स्वरुपात टिकवण आवश्यक आहे. मराठी भाषा टिकावी आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहचावी यासाठी प्रयत्न केले जातात. प्रमुख्याने 'मराठी राजभाषा दिनी' विशेष प्रयत्न केले जातात. शालेय स्तरापासून प्रशासकीय स्तरावर विविध स्पर्धा, कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.Kusumagraj Birth Anniversary 2019: पाठीवरती हात ठेवून फक्त 'लढ' म्हणा म्हणाणाऱ्या कुसुमाग्रज यांच्या लोकप्रिय कविता

बदलत्या काळानुसार भाषेवर  भौगोलिक,राजकीय, संस्कृतिक बदलाचे परिणाम होतात. मराठी भाषेवरही ते होत आहेत. त्यामुळे ते स्वीकारत भाषा टिकवली तरच ती पुढच्या पिढीपर्यंत ती पोहचू शकते.