ठळक बातम्या

PAK Beat SA 3rd ODI 2024: पाकिस्तानने दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर रचला इतिहास, 'हा' टप्पा गाठणारा ठरला जगातील पहिला संघ

Nitin Kurhe

जोहान्सबर्ग येथे खेळल्या गेलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात पाकिस्तानने डकवर्थ लुईस नियमाच्या जोरावर प्रोटीज संघाचा 36 धावांनी पराभव केला. पावसाने विस्कळीत झालेल्या झालेल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पाहुण्या संघाने 47 षटकांत 9 गडी गमावून 308 धावा केल्या.

Vinod Kambli Health Update: विनोद कांबळी यांची प्रकृती पुन्हा खालावली, रुग्णालयात दाखल

Amol More

कांबळीने टीम इंडियासाठी अनेक सामन्यांमध्ये दमदार कामगिरी केली आहे. त्याने आपल्या कारकिर्दीत 104 एकदिवसीय सामने खेळले. या फॉरमॅटमध्ये कांबळीने 2 शतके आणि 14 अर्धशतके झळकावली आहेत. यासह 2477 धावा झाल्या. त्याची वनडे सर्वोत्तम धावसंख्या 106 धावा आहे.

Earthquake in Gujarat: भूकंपामुळे हादरली गुजरातमधील कच्छची जमीन; 3.7 रिश्टर स्केल मोजण्यात आली भूकंपाची तीव्रता

Bhakti Aghav

भूकंपामुळे कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेचे किंवा इतर कशाचेही नुकसान झाल्याचे वृत्त नाही, असे जिल्हा प्रशासनाने सांगितले. गांधीनगर-आधारित ISR ने सांगितले की, भूकंप सकाळी 10.44 वाजता झाला आणि त्याचा केंद्रबिंदू लखपतच्या उत्तर-ईशान्य 76 किमी अंतरावर होता.

MS Dhoni: धोनीच्या अडचणी वाढ? झारखंड हाऊसिंग बोर्डाकडून होणार घराची चौकशी; निवासस्थानाचा व्यावसायिक वापर केल्याप्रकरणी नोटीस पाठवण्याची तयारी

Jyoti Kadam

2009 मध्ये, धोनीला सरकारकडून भूखंड दिला होता. गृहनिर्माण मंडळाने दिलेल्या भूखंडावर त्याने एक आलिशान घर बांधले. आता त्या ठिकाणी पॅथॉलॉजी सेंटर सुरू होणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्याप्रकरणी आता चौकशी करण्यात येणार आहे.

Advertisement

Sachet-Parampara Blessed with Baby Boy: सचेत-परंपरा यांच्या घरी पुत्ररत्नाचे आगमन, व्हिडीओ शेअर करून दिली माहिती

Shreya Varke

प्रसिद्ध संगीतकार जोडी सचेत-परंपरा यांच्या घरी लहान बाळाचे आगमन झाले आहे. दोघांनी नुकतेच लाडक्या मुलाच्या जन्माची घोषणा केली आहे. सचेत आणि परंपरा यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक सुंदर व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये नवजात मुलाचे हात आणि पाय दिसत आहेत आणि त्यांच्यासोबत पालकही दिसत आहेत.

MLR vs PRS BBL 2024-25 Dream11 Team Prediction: मेलबर्न रेनेगेड्स आणि पर्थ स्कॉचर्स यांच्यातील आजचा सामना, खेळपट्टीचा अहवाल आणि सर्वोत्तम ड्रीम11 संघ येथे पहा

Jyoti Kadam

बिग बॅश लीग 2024-25 चा 10 वा सामना आज 23 डिसेंबर रोजी मेलबर्न रेनेगेड्स विरुद्ध पर्थ स्कॉचर्स यांच्यात होणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना मेलबर्नच्या डॉकलँड्स स्टेडियमवर होणार आहे. मेलबर्न रेनेगेड्सने या स्पर्धेत आता दोन सामने खेळले आहेत.

PV Sindhu Wedding: पीव्ही सिंधू उदयपूरमध्ये वेंकट दत्ता साईसोबत अडकली लग्नबंधनात, See Photo

Bhakti Aghav

व्यापारी वेंकट दत्ता साई (Venkata Datta Sai) यांच्यासोबत पीव्ही सिंधूने सप्तपदी घेतली. पीव्ही सिंधू आणि वेंकट यांच्या लग्नाचा पहिला फोटोही समोर आला आहे. यामध्ये दोघांची जोडी खूपच सुंदर दिसत आहे. चाहते दोघांना लग्नासाठी शुभेच्छा देत आहेत.

NZ W vs AUS W 3rd ODI 2024 Scorecard: ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडचा 75 धावांनी पराभव करून मालिका 2-0 ने जिंकली; स्कोअरकार्ड पहा

Jyoti Kadam

न्यूझीलंड महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि ऑस्ट्रेलिया महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील तिसरा एकदिवसीय सामना 23 डिसेंबर रोजी वेलिंग्टन येथील बेसिन रिझर्व्ह स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडचा 75 धावांनी पराभव केला.

Advertisement

South Africa vs Pakistan 3rd ODI 2024 Highlights: पाकिस्तानचा दक्षिण आफ्रिकेवर 36 धावांनी विजय, सॅम आयुब विजयाचा ठरला नायक; सामन्याचे हायलाइट पहा

Jyoti Kadam

दक्षिण आफ्रिका राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध पाकिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील तिसरा एकदिवसीय सामना 22 डिसेंबर रोजी जोहान्सबर्ग येथील वांडरर्स स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात पाकिस्तानने DLS पद्धतीचा वापर करून दक्षिण आफ्रिकेचा 36 धावांनी पराभव केला.

Fussclass Dabhade Teaser: क्षिती जोग, अमेय वाघ, सिद्धार्थ चांदेकर यांची प्रमुख भूमिका असलेला चित्रपट ‘फसक्लास दाभाडे’ चा टीझर प्रदर्शित; पहा व्हिडिओ

Bhakti Aghav

हेमंत ढोमे लिखित, दिग्दर्शित या चित्रपटात क्षिती जोग, सिद्धार्थ चांदेकर, अमेय वाघ, निवेदिता सराफ, हरिष दुधाडे, राजन भिसे, राजसी भावे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

Pune Accident Video: फुटपथवर झोपलेल्या 9 मजुरांना डंपरने चिरडले, 3 जणांचा मृत्यू, 6 जखमी (पहा व्हिडिओ)

Shreya Varke

महाराष्ट्रातील पुण्यात अतिवेगाचा कहर पाहायला मिळत आहे. वाघोली परिसरात काल रात्री डंपरने फूटपाथवर झोपलेल्या ९ मजुरांना चिरडले. या भीषण अपघातात ३ मजुरांचा जागीच मृत्यू झाला, तर ६ जण गंभीर जखमी झाले. मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली . या घटनेत बळी पडलेले सर्व मजूर अमरावती जिल्ह्यातील रहिवासी होते.

NZ W vs AUS W 3rd ODI 2024 Scorecard: ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंड पुढे ठेवले 291 रन्सचे लक्ष्य; Ashley Gardner आणि Phoebe Litchfield यांनी झळकावली अर्धशतके

Jyoti Kadam

न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया महिला संघातील तिसरा एकदिवसीय सामना 23 डिसेंबर रोजी वेलिंग्टन येथील बेसिन रिझर्व्ह स्टेडियमवर खेळवला जात आहे. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाचा डाव 49 षटकांत सर्वबाद 290 धावांवर आटोपला.

Advertisement

Maharashtra Lottery Result: सागरलक्ष्मी, महा.गजलक्ष्मी सोम, गणेशलक्ष्मी भाग्यलक्ष्मी, महा. सह्याद्री धनलक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल

Jyoti Kadam

जर तुम्ही लॉटरी खेरदी करत असाल तर, या संकेतस्थळावर तुम्ही ती चेक करू शकता. महाराष्‍ट्र शासन तीन राष्‍ट्रीय सुटीचे दिवस वगळून साप्ताहिक सर्व दिवशी सोडती आयोजित करते.

Khalistani Terrorists Killed In Encounter: उत्तर प्रदेशातील पीलीभीतमध्ये 3 दहशतवाद्यांचा खात्मा; पंजाब पोलिस चौकीवर फेकले होते ग्रेनेड बॉम्ब

Bhakti Aghav

उत्तर प्रदेश पोलिस आणि पंजाब पोलिसांच्या संयुक्त पथकाने पंजाबमधील गुरुदासपूर जिल्ह्यातील पोलिस चौकीवर ग्रेनेड/बॉम्ब फेकणाऱ्या तीन गुन्हेगारांशी चकमक झाली, असे पोलिसांनी एका निवेदनात म्हटले आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून दोन एके 10, 19 बंदुका आणि दोन ग्लॉक पिस्तूल जप्त केल्या आहेत.

Mumbai Shocker: आईला किरकोळ दुखापत केल्याचा राग मनात धरून दोन भावांनी ओला कॅब चालकाचा भोसकून खून केला.

Jyoti Kadam

ओला कॅब चालकाच्या हत्येप्रकरणी मुंबई पोलिसांनी नुकतीच दोघांना अटक केली आहे. स्कूटरला धडक दिल्याने आई जखमी झाल्याच्या रागात दोघांनी त्याची हत्या केली. शिवाजी नगरमधून ही घटना उघडकीस आली.

Puja Khedkar Case: पूजा खेडकरच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर आज दिल्ली उच्च न्यायालय देणार निकाल

Bhakti Aghav

पूजा खेडकरवर नागरी सेवा परीक्षेत फसवणूक केल्याचा आणि बेकायदेशीरपणे ओबीसी आणि अपंगत्व कोट्याच्या लाभांचा दावा केल्याचा आरोप आहे. न्यायमूर्ती चंदर धारी सिंह यांच्या खंडपीठाने 27 नोव्हेंबर 2024 रोजी आपला निर्णय राखून ठेवला होता. दरम्यान, न्यायालयाने अंतिम निर्णय होईपर्यंत खेडकर यांना दिलेले अंतरिम संरक्षण वाढवले ​​आहे.

Advertisement

Rajasthan Shocker: राजस्थानमधील सीकरमध्ये शाळेतील शिक्षकाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

Jyoti Kadam

सीकर जिल्ह्यात एका 15 वर्षीय मुलीवर तिच्या शाळेतील शिक्षकाने बलात्कार केल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी रविवारी शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल केला.

MP: महिलेच्या पतीचा रस्ता अपघातात मृत्यू, आधुनिक प्रजनन पद्धतींद्वारे मूल होऊ देण्याच्या उद्देशाने केली वीर्य जतन करण्याची मागणी

Shreya Varke

मध्य प्रदेशातील रीवा येथे एका विधवेच्या असामान्य विनंतीने अधिकाऱ्यांना धक्का बसला आहे. तिचा पती जितेंद्र सिंग गहरवार यांचा रस्ता अपघातात आकस्मिक मृत्यू झाल्यानंतर नेहा सिंगने आपल्या दिवंगत पतीचे "वीर्य जतन" करण्याची मागणी केली. अपघातानंतर अवघ्या काही तासांनी केलेली ही विनंती, तिला आधुनिक प्रजनन पद्धतींद्वारे मूल होऊ देण्याच्या उद्देशाने होता.

Delhi Weather: दिल्लीत थंडीची लाट, किमान तापमान 7 अंश सेल्सिअसपर्यंत घसरल्याने दिल्लीकरांना भरली हुडहुडी

Bhakti Aghav

दिल्लीतील थंड वाऱ्यांमुळे येत्या काही दिवसांत तापमानात आणखी घसरण होण्याची शक्यता हवामान खात्याने (IMD) दिली आहे. IMD नुसार, या आठवड्यात दिल्लीचे कमाल तापमान 23 ते 24 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहू शकते. तर किमान तापमान 5 ते 7 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे.

Mumbai: अपघातानंतर पळून जाण्याचा प्रयत्न, पीडित तरुण चालत्या वाहनाच्या छतावर बसला, सांताक्रूझचा व्हिडिओ व्हायरल

Shreya Varke

सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक तरुण वेगवान टॅक्सीच्या छतावर बसून टॅक्सी चालकाला गाडी थांबवण्यास सांगत आहे. हा व्हिडिओ सांताक्रूझच्या उड्डाणपुलाचा आहे. काही लोकांनी त्यांच्या मोबाईलवर या व्यक्तीचा व्हिडिओ बनवला. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, वर बसलेली व्यक्ती ड्रायव्हरला 'गाडी बाजूला थांबवा' असे सांगत आहे.

Advertisement
Advertisement