Khalistani Terrorists Killed In Encounter: उत्तर प्रदेशातील पीलीभीतमध्ये 3 दहशतवाद्यांचा खात्मा; पंजाब पोलिस चौकीवर फेकले होते ग्रेनेड बॉम्ब
पोलिसांनी घटनास्थळावरून दोन एके 10, 19 बंदुका आणि दोन ग्लॉक पिस्तूल जप्त केल्या आहेत.
Khalistani Terrorists Killed In Encounter: पीलीभीत (Pilibhit) मध्ये सोमवारी उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) आणि पंजाब पोलिसांच्या (Punjab Police) संयुक्त पथकाच्या नेतृत्वाखाली झालेल्या चकमकीत तीन खलिस्तानी दहशतवादी (Khalistani Terrorists) ठार झाले. उत्तर प्रदेश पोलिस आणि पंजाब पोलिसांच्या संयुक्त पथकाने पंजाबमधील गुरुदासपूर जिल्ह्यातील पोलिस चौकीवर ग्रेनेड/बॉम्ब फेकणाऱ्या तीन गुन्हेगारांशी चकमक झाली, असे पोलिसांनी एका निवेदनात म्हटले आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून दोन एके 10, 19 बंदुका आणि दोन ग्लॉक पिस्तूल जप्त केल्या आहेत.
डीजीपी पंजाब पोलिसांनी एक्स वर पोस्ट करत लिहिलं आहे की, '#पाक-प्रायोजित खलिस्तान जिंदाबाद फोर्स (KZF) दहशतवादी मॉड्यूलच्या विरोधात एक मोठा यश मिळवताना, यूपी पोलिस आणि पंजाब पोलिसांच्या संयुक्त ऑपरेशनमध्ये पोलिस दलावर गोळीबार करणाऱ्या तीन मॉड्यूल सदस्यांसह चकमक झाली. हे दहशतवादी मॉड्यूलमध्ये सामील होते. पीएस पुरनपूरच्या हद्दीत ही चकमक झाली आहे. पीलीभीत आणि पंजाबच्या संयुक्त पोलिस दल आणि #गुरदासपूरमधील पोलिस चौकीवर झालेल्या ग्रेनेड हल्ल्यात जखमी झालेल्यांना तात्काळ वैद्यकीय उपचारासाठी CHC पुरणपूर येथे नेण्यात आले आहे.' (हेही वाचा -Dantewada Encounter: छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत 9 नक्षलवादी ठार)
डीजीपी पंजाब पोलिसांनी एक्सवर दिली माहिती -
चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा -
पीलीभीतचे पोलीस अधीक्षक अविनाश पांडे, एसआय अमित प्रताप सिंग, निरीक्षक नरेश त्यागी, एसएचओ पुरनपूर, एसआय ललित कुमार, हेड कॉन्स्टेबल जगवीर, माधोतांडा एसएचओ अशोक पाल, कॉन्स्टेबल सुमित, हितेश, इन्स्पेक्टर केबी सिंग आणि एसआय सुनील शर्मा या चकमकीत सहभागी होते. पिलीभीतचे पोलीस अधीक्षक अविनाश पांडे यांनी सांगितले की, तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला असून त्यांच्यावर गुरुदासपूर पोलिस चौक्यांवर हल्ला केल्याचा आरोप आहे. (हेही वाचा -Encounter In Chhattisgarh: छत्तीसगडमधील नारायणपूर जिल्ह्यात सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत 7 नक्षलवादी ठार)
पोलिस चौक्यांवर हल्ला -
पंजाबमधील गुरुदासपूरमध्ये पोलिस चौक्यांमध्ये बॉम्बस्फोट झाले होते. यापूर्वी बंद असलेल्या बक्षीवाल पोलिस चौकीवर गुरुवारी हल्ला झाला होता. त्यानंतर शुक्रवारी रात्री, आणखी एका बंद पोलीस चौकीत स्फोट झाला. या दोन्ही पोलीस चौक्या कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे नुकत्याच बंद करण्यात आल्या होत्या. स्फोटामुळे आजूबाजूच्या घरांतील लोक घाबरले.