ठळक बातम्या

IND W vs IRE W 2nd ODI 2025 Scorecard: दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय महिला संघाने आयर्लंडला दिले 371 धावांचे लक्ष्य, जेमिमाने झळकावले शतक

Nitin Kurhe

दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात, भारतीय महिला संघाने आयर्लंडविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत 5 गडी गमावून 370 धावा केल्या. संघाच्या या मोठ्या डावात जेमिमा रॉड्रिग्जने शतक झळकावत 102 धावा केल्या, तर हरलीन देओलने 89 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. खेळला.

Jemimah Rodrigues Half Century: आयर्लंडविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात जेमिमा रॉड्रिग्जने झळकावले 7 वे अर्धशतक; भारतीय महिला संघाची मजबूत स्थितीत

Jyoti Kadam

प्रथम फलंदाजी करताना, भारतीय महिला संघाने स्मृती मानधना, प्रतिका रावल, हरलीन देओल आणि त्यानंतर जेमिमा रॉड्रिग्जने तिचे 7 वे एकदिवसीय अर्धशतक झळकावल्याने चांगली धावसंख्ये केली आहे. तिने 62 चेंडूत 5 चौकारांच्या मदतीने ही कामगिरी केली आहे.

New BCCI Secretary Devajit Saikia: देवजीत सैकिया झाले बीसीसीआयचे नवे सचिव; जय शाह यांची जागा घेतली, सर्वसाधारण सभेत निर्णय

Prashant Joshi

बीसीसीआयच्या नियमांनुसार, कोणतेही रिक्त पद 45 दिवसांच्या आत विशेष सर्वसाधारण सभा बोलावून भरावे लागते. अशा परिस्थितीत बीसीसीआयने पद रिक्त झाल्यानंतर 43 व्या दिवशी बैठक बोलावली. सैकिया हे बीसीसीआयचे सचिव बनणे निश्चित मानले जात होते, कारण ते या पदासाठी एकमेव उमेदवार होते.

Harleen Deol Half Century: आयर्लंडविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात हरलीन देओलने झळकावले अर्धशतक; भारतीय संघाची मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल

Jyoti Kadam

प्रथम फलंदाजी करताना, भारतीय महिला संघाने चांगली सुरुवात केली, स्मृती मानधना, प्रतिका रावल आणि हरलीन देओल यांनी त्यांचे अर्धशतक झळकावले आहे. त्यांनी 57 चेंडूत 7 चौकारांच्या मदतीने ही कामगिरी केली.

Advertisement

Maharashtra Bank holidays in January 2025: मकर संक्रांतीनिमित्त 14 जानेवारीला महाराष्ट्रातील बँका बंद असणार? जाणून घ्या या महिन्यातील सुट्ट्यांची यादी

Prashant Joshi

जानेवारी महिन्यात सण, प्रादेशिक आणि राष्ट्रीय सुट्ट्यांव्यतिरिक्त, सर्व बँका (सरकारी आणि खाजगी) प्रत्येक महिन्याप्रमाणे दोन शनिवार आणि चार रविवारी बंद राहतील. भारतातील प्रत्येक राज्यामध्ये बँकांच्या सुट्ट्या वेगवेगळ्या असू शकतात.

Naxalites Killed In Encounter: बिजापूरमध्ये सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत 3 नक्षलवादी ठार

Bhakti Aghav

बस्तर रेंजचे पोलिस महानिरीक्षक सुंदरराज पी यांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी इंद्रावती राष्ट्रीय उद्यानाच्या जंगली भागात सुरक्षा दलांच्या संयुक्त पथकाने नक्षलविरोधी कारवाई केली असता ही चकमक सुरू झाली.

Maha Kumbh 2025: पाकिस्तानच्या लोकसंख्येच्या दुप्पट भाविक, IPL पेक्षा 10 पट जास्त कमाई, राम मंदिरापेक्षा 3 पट जास्त खर्च; पाहा महाकुंभ 2025 ची आकडेवारी

Prashant Joshi

जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमपेक्षा 160 पट अधिक परिसरात महाकुंभ आयोजित केला जात आहे. हा एकूण 4000 हेक्टर क्षेत्रात आयोजित केले जाईल. जगातील सर्वात मोठे स्पोर्ट्स स्टेडियम अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियम आहे जे 25 हेक्टरमध्ये बांधले गेले आहे.

India’s Largest Milk Producer State: उत्तर प्रदेश बनले भारतातील सर्वात मोठे दूध उत्पादक राज्य; एका दिवसात 1,062 लाख लिटर दूधाचे उत्पादन

Bhakti Aghav

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे सल्लागार अवनीश कुमार अवस्थी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर सांगितले की, राज्यात दरवर्षी 19.39 दशलक्ष टन किंवा दररोज 531.23 लाख लिटर दूध विक्रीयोग्य आहे. संघटित क्षेत्रात दरवर्षी 3.35 दशलक्ष टन म्हणजेच दररोज 91.78 लाख लिटर दूध प्रक्रिया केली जाते.

Advertisement

IND W vs IRE W 2nd ODI 2025 Live Score Updates: भारतीय महिला संघाला धक्का, स्मृती मानधनानंतर प्रतीका रावल 67 धावांवर बाद

Jyoti Kadam

प्रथम फलंदाजी करताना भारतीय महिला संघाची सुरुवात चांगली झाली, परंतु ओर्ला प्रेंडरगास्टने स्मृती मानधनाला बाद करून टीम इंडियाला पहिला धक्का दिला. त्यानंतर प्रतीका रावल बाद झाली.

Smriti Mandhana Half Century: स्मृती मानधनाचे अर्धशतक, भारतीय महिला संघाची दमदार कामगिरी दिली दमदार कामगिरी; येथे पहा स्कोअरकार्ड

Jyoti Kadam

भारतीय महिला संघाला चांगली सुरुवात मिळाली, टीम इंडियाची कर्णधार स्मृती मानधनाने 8 चौकार आणि 1 षटकार मारत तिचे 30 वे अर्धशतक पूर्ण केले. बातमी लिहिताना, भारताची धावसंख्या 156/1 (19) होती.

Donald Trump's Swearing-in Ceremony: परराष्ट्र मंत्री S Jaishankar भारताकडून डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहतील; मंत्रालयाने केली पुष्टी

Prashant Joshi

डोनाल्ड ट्रम्प 47व्यांदा आणि दुसऱ्यांदा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेणार आहेत. यावेळी त्यांच्या सरकारमध्ये अनेक भारतीय वंशाच्या लोकांचाही समावेश करण्यात आला आहे. 20 जानेवारी रोजी दुपारी 12 वाजता (भारतीय वेळेनुसार रात्री 10:30 वा.) शपथविधीला सुरुवात होईल.

Anand Mahindra On 90-Hour Work Week: 'माझी पत्नी खूप सुंदर आहे, तिला पाहत राहणं छान वाटतं'; कामाच्या वेळेवरील SN Subrahmanyan यांच्या वादग्रस्त विधानानंतर आनंद महिंद्रा यांची प्रतिक्रिया

Bhakti Aghav

आनंद महिंद्रा यांनी एक उदाहरण दित सांगितले की, अभियंते आणि एमबीए सारखी पार्श्वभूमी असलेल्या लोकांनी कला आणि संस्कृतीचा अभ्यास केला पाहिजे जेणेकरून ते चांगले निर्णय घेऊ शकतील. कुटुंब आणि मित्रांसोबत वेळ घालवण्याची गरज अधोरेखित करताना महिंद्रा म्हणाले, जर तुम्ही घरी वेळ घालवत नसाल, मित्रांसोबत वेळ घालवत नसाल, जर तुम्ही वाचन करत नसाल, जर तुम्हाला चिंतन करण्यासाठी वेळ मिळत नसेल, तर तुम्ही निर्णय घेताना योग्य इनपूट कसे आणाल?

Advertisement

Maharashtra Lottery Result: मोहिनी, महा.गजलक्ष्मी रवि, गणेशलक्ष्मी वैभव लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल

Jyoti Kadam

महाराष्ट्र लॉटरीची स्थापना होऊन 55 वर्ष झाली. ही राज्य सरकार संचालित लॉटरी विश्वासार्ह आहे. 12 एप्रिल 1969 रोजी राज्य सरकार संचालित महाराष्ट्र लॉटरीची स्थापना करण्यात आली.

8th Pay Commission: केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! सुधारित फिटमेंट फॅक्टरसह, पगार व पेन्शनमध्ये होऊ शकते 186 % वाढ; लवकरच 8 वा वेतन आयोग लागू होण्याची शक्यता

Prashant Joshi

सरकार 1 फेब्रुवारी रोजी 2025-26 या आर्थिक वर्षासाठी संसदेत सादर होणाऱ्या वार्षिक बजेटमध्ये 8 व्या वेतन आयोगाच्या (8th Pay Commission) स्थापनेची घोषणा करू शकते. गेल्या काही महिन्यांपासून केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी 8व्या वेतन आयोगाची संभाव्य घोषणा आणि 186% पगारवाढीशी संबंधित अटकळ चर्चेचे केंद्र बनले आहेत.

Pune Empress Garden Flower Show 2025: पुण्यात 24 ते 27 जानेवारी दरम्यान एम्प्रेस गार्डन फ्लॉवर शोचे आयोजन; देशभरातील नर्सरी मालक होणार सहभागी

Prashant Joshi

पुणे, कोल्हापूर, सांगली, नाशिक, आंध्र प्रदेश आणि देशभरातील नर्सरी मालकांनी या फ्लॉवर शोमध्ये सहभागी होण्याची अपेक्षा आहे. कवडे माळा, घोरपडी येथे वसलेले, एम्प्रेस बोटॅनिकल गार्डन 39 एकर समृद्ध जैवविविधतेने व्यापलेले आहे.

Nitin Gadkari Attends Special Screening of Emergency: नितीन गडकरींची कंगना राणौत आणि अनुपम खेर यांच्यासोबत 'इमर्जन्सी' चित्रपटाच्या स्पेशल स्क्रीनिंगला उपस्थिती

Bhakti Aghav

चित्रपट पाहिल्यानंतर नितीन गडकरी यांनी एक्सवर पोस्ट करत आपले विचार मांडताना भारताच्या इतिहासातील एका महत्त्वाच्या पण भयानक अध्यायावर प्रकाश टाकल्याबद्दल चित्रपट निर्माते आणि कलाकारांचे आभार मानले.

Advertisement

IND W vs IRE W 2nd ODI 2025 Live Toss Updates: भारतीय महिला संघाचा टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय; आयर्लंड प्रथम गोलंदाजी करणार, दोन्ही संघांचे प्लेइंग इलेव्हन पहा

Jyoti Kadam

टीम इंडियाची कर्णधार स्मृती मानधनाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ज्यामुळे आयर्लंड प्रथम गोलंदाजी करेल. भारतीय महिला संघ संघात कोणताही बदल न करता खेळत आहे.

IND W vs IRE W 2025, Rajkot Weather & Pitch Report: आयर्लंड आणि भारतीय महिला संघातील सामन्यादरम्यान कसे असेल हवामान? कशी आहे सौराष्ट्र क्रिकेट स्टेडियमची खेळपट्टी?

Jyoti Kadam

राजकोटमधील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान हवामान पूर्णपणे अनुकूल असेल. दिवसाचे तापमान सुमारे 28°C असेल, आकाश निरभ्र असेल आणि पावसाची शक्यता नाही.

Chief Guest For Republic Day Parade: इंडोनेशियाचे राष्ट्रपती असणार यंदाच्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे; भारत भेटीनंतर पाकिस्तानला जाणार नाहीत

Bhakti Aghav

इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष प्रबोवो सुबियांतो यावर्षी 26 जानेवारी रोजी होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहू शकतात. तथापि, भारताने अद्याप याबद्दल कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.

IND W vs IRE W 2nd ODI 2025 Live Telecast On DD Sports: भारत-आयर्लंड महिला संघाचा दुसरा एकदिवसीय सामना डीडी स्पोर्ट्सवर थेट प्रक्षेपित होईल? जाणून घ्या

Jyoti Kadam

दुसऱ्या एकदिवसीय सामन्याचे प्रसारण दूरदर्शन नेटवर्क डीडी स्पोर्ट्स किंवा डीडी नॅशनल वर डीडी फ्री डिशवर उपलब्ध असेल का? याबद्दल जाणून घेऊयात.

Advertisement
Advertisement