ठळक बातम्या

Cryogenic Engine Test: इस्रोला मिळाले मोठे यश! क्रायोजेनिक इंजिन व्हॅक्यूम इग्निशन चाचणी केली यशस्वीरित्या पूर्ण

Bhakti Aghav

गगनयान मोहिमेसाठी हे इंजिन खूप महत्वाचे आहे. या मोहिमेअंतर्गत, भारत पहिल्यांदाच मानवांना अंतराळात पाठवणार आहे.

SL vs AUS, 2nd Test Match 2025 Day 3 Stumps Scorecard: तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला, श्रीलंकेला पराभवाचा धोका; कुसल मेंडिसकडून चौथ्या दिवशी मोठ्या खेळीची अपेक्षा; येथे पाहा स्कोरकार्ड

Nitin Kurhe

पाहुण्या संघाने दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. आता ऑस्ट्रेलियाचा संघ दुसरा कसोटी सामना जिंकून मालिका जिंकण्याच्या प्रयत्नात असेल. दुसरीकडे, श्रीलंकेचा संघ दुसऱ्या कसोटीत पुनरागमन करू इच्छितो. दरम्यान तिसऱ्या दिवसाच्या खेळाअखेर श्रीलंकेच्या संघाने 62.1 षटकांत आठ विकेट गमावून 211 धावा केल्या आहेत.

Maha Kumbh 2025: राजकुमार राव आणि पत्रलेखा यांनी प्रयागराजमधील त्रिवेणी संगमात केले स्नान, महाकुंभमेळ्यातील एक आध्यात्मिक यात्रा

Amol More

राजकुमार राव आणि पत्रलेखा यांच्या आधी अनेक प्रसिद्ध व्यक्ती महाकुंभमेळ्यात सहभागी झाल्या आहेत. यामध्ये हेमा मालिनी, अनुपम खेर, भाग्यश्री, मिलिंद सोमण, कवी कुमार विश्वास, क्रिकेटपटू सुरेश रैना, कुस्तीगीर द ग्रेट खली, नृत्यदिग्दर्शक रेमो डिसूझा आणि किन्नर आखाड्याचे महामंडलेश्वर ममता कुलकर्णी यांचा समावेश आहे.

Swati Maliwal's Reaction: 'महिलांविरुद्ध गुन्हे करणाऱ्यांना देव शिक्षा करतो'; 'आप'च्या पराभवनंतर स्वाती मालीवाल यांनी खास पोस्ट करत दिली प्रतिक्रिया

Bhakti Aghav

स्वाती मालीवाल यांनी आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. त्यांनी म्हटलं आहे की, रावणाचा अभिमानही भंगला आहे आणि आता ते फक्त केजरीवाल आहेत.

Advertisement

IND vs ENG 2nd ODI 2025: कटकमध्ये टीम इंडियाचा बोलबाला, गेल्या 18 वर्षांत एकही गमावलेला नाही सामना; येथे पाहा आकडेवारी

Nitin Kurhe

दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाचा वरचष्मा दिसत आहे. कारण टीम इंडियाने गेल्या 18 वर्षांपासून कटक स्टेडियममध्ये एकही एकदिवसीय सामना गमावलेला नाही. आता दुसरा एकदिवसीय सामना जिंकून संघ सलग आठवा सामना जिंकू शकतो. कटकच्या मैदानावर टीम इंडियाची आकडेवारी काय आहे ते जाणून घेऊया.

KCA Sends Notice S Sreesanth: श्रीशांतच्या अडचणी वाढल्या, संजू सॅमसनला पाठिंबा दिल्याने निर्माण झाला वाद

Amol More

श्रीशांतला ही नोटीस संजू सॅमसनला पाठिंबा दिल्याबद्दल नाही तर चुकीचे विधान केल्याबद्दल आणि असोसिएशनचा अपमान केल्याबद्दल पाठवण्यात आली आहे.

SL vs AUS: गॅले येथे ऐतिहासिक 156 धावा करून अ‍ॅलेक्स कॅरीने गिलख्रिस्टचा विक्रम मोडला

Amol More

कॅरीच्या शानदार खेळी आणि स्मिथच्या नाबाद 131 धावांच्या खेळीमुळे ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या दिवशी 414/10 धावा केल्या आणि श्रीलंकेवर 157 धावांची आघाडी घेतली.

अक्षय कुमारची भाची Naomika Saran करतेय बॉलिवूडमध्ये पदार्पण; Agastya Nanda सोबत झळकणार चित्रपटात

Jyoti Kadam

ज्येष्ठ अभिनेते राजेश खन्ना यांची नात आणि अक्षय कुमारची भाची नाओमिका सरन चित्रपटसृष्टीत प्रवेश करण्यासाठी सज्ज झाली आहे.

Advertisement

IIFA Awards 2025: जयपूरमध्ये पहिल्यांदाच होणार आयफा पुरस्कार सोहळा, कलाकार रंगमंचावर आग लावण्यासाठी सज्ज, जाणून घ्या, तिकीट बुकिंगसंबंधी संपूर्ण माहिती

Shreya Varke

आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट अकादमी पुरस्कार (आयफा) 8 आणि 9 मार्च रोजी जयपूर येथे होणार आहे. या पुरस्कार सोहळ्यात गेल्या वर्षभरात भारतीय चित्रपटसृष्टीत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या बॉलिवूडमधील सर्वोत्कृष्ट कलाकारांचा हा पुरस्कार दिला जातो. मंत्रमुग्ध करणारे सादरीकरण, उत्साह आणि अविस्मरणीय क्षणांनी भरलेला हा आगामी कार्यक्रम भव्य दिव्य असणार आहे. बॉलिवूडचा सर्वात प्रतिष्ठेचा पुरस्कार सोहळा, आयफा अवॉर्ड्स 2025 यावर्षी राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये होणार आहे. हा २५ वा पुरस्कार सोहळा रौप्यमहोत्सवसाजरा करत असून हा सोहळा दोन दिवस चालणार आहे.

IND vs ENG 2ND ODI Pitch Report: दुसऱ्या वनडे सामन्यात गोलंदाज की फलंदाज कोण करणार कहर? खेळपट्टीवर कोणाला मिळणार मदत? वाचा पिच रिपोर्ट

Nitin Kurhe

IND vs ENG: पहिल्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाने इंग्लंडचा चार विकेट्सने पराभव केला आहे. यासह टीम इंडियाने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. एकदिवसीय मालिकेत टीम इंडियाचे नेतृत्व रोहित शर्मा करत आहे. तर, इंग्लंडची कमान जोस बटलरच्या खांद्यावर आहे.

Nashik Shocker: नाशिकमध्ये शाळेच्या मुख्याध्यापकांचा अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्कार; आरोपी मुख्याध्यापकला अटक

Bhakti Aghav

शाळेच्या मुख्याध्यापकांनी एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्कार (Rape) केल्याची धक्कादायक बातमी उघडकीस आली आहे. या लाजिरवाण्या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे.

IND vs ENG 2nd ODI 2025 Preview: दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडिया विजयी मालिका सुरू ठेवणार की इंग्लंड पुनरागमन करेल? सामन्यापूर्वी, हेड टू हेड रेकॉर्ड, मिनी बॅटल आणि स्ट्रीमिंगसह सर्व तपशील घ्या जाणून

Amol More

भारत आणि इंग्लंड यांच्यात एकदिवसीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत एकूण 107 सामने खेळले गेले आहेत. यापैकी भारताने 58 सामने जिंकले आहेत, तर इंग्लंडने 44 वेळा विजय मिळवला आहे. 3 सामने निकालाविना संपले, तर 2 सामने बरोबरीत सुटले.

Advertisement

'Jana Shakti is paramount': दिल्ली निवडणुकीत भाजपच्या निर्णायक विजयानंतर PM Narendra Modi यांची पहिली प्रतिक्रिया; मानले जनतेचे आभार (See Post)

Prashant Joshi

राजधानीमध्ये भारतीय जनता पक्ष सरकार स्थापन करणार आहे. भाजप 47 जागांवर आघाडीवर आहे आणि आम आदमी पक्ष 23 जागांवर आघाडीवर आहे.

Lucky Ali Reveals Desire for Fourth Marriage: 3 अयशस्वी लग्नानंतर ज्येष्ठ गायक लकी अलीला पुन्हा अडकायचे विवाह बंधनात

Shreya Varke

बॉलिवूड गायक लकी अलीला परिचयाची गरज नाही. दरम्यान, गायकाने नुकतेच 66 व्या वर्षी चौथ्या लग्नाच्या शक्यतेचे संकेत दिले होते. दिल्लीच्या सुंदर नर्सरीमध्ये झालेल्या १८ व्या कथाकार आंतरराष्ट्रीय कथाकार महोत्सवात त्यांनी ही इच्छा व्यक्त केली. ओ सनम, क्यों चलती है पवन यांसारख्या हिट गाण्यांसाठी तो ओळखला जातो. दिल्लीत झालेल्या कथाकार इंटरनॅशनल स्टोरीटेलर्स फेस्टिव्हलमध्ये बॉलिवूड गायक लकीअलीने भाग घेतला होता.

Pat Cummins Welcome Second Baby: पॅट कमिन्सच्या घरी सोनपरीच आगमन; लेकीचा पहिला फोटो केला शेअर, नावही सांगितले

Jyoti Kadam

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स आणि त्याची पत्नी बेकी दुसऱ्यांदा आई-बाबा झाले आहेत. त्यांना कन्यारत्न प्राप्त पॅट कमिन्सने लेकीचा पहिला फोटो सोशल मीडियावर शेअर केला.

Milkipur Bypoll Election Results: अयोध्येत कमळ फुलले, भाजपचे चंद्रभानू पासवान विजयी, अजित प्रसाद यांचा 60 हजार मतांनी केला पराभव

Shreya Varke

मिल्कीपूर विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला असून भाजपचे चंद्रभान पासवान यांनी समाजवादी पक्षाचे अजित प्रसाद यांचा 70 हजार मतांनी पराभव केला आहे. फैजाबादलोकसभा निवडणुकीत सपाचे अवधेश प्रसाद यांच्याकडून झालेल्या पराभवाचा बदला घेण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याने मिल्कीपूरमध्ये आज चढाओढ वाढली होती. अयोध्येतील मिल्कीपूर पोटनिवडणुकीचे समोर आले आहेत. दरम्यान, आठ महिन्यांपूर्वी फैजाबादच्या लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर भाजपला सावरण्याची महत्त्वपूर्ण संधी मिळाली आहे.

Advertisement

Delhi Election Result 2025: दिल्ली विधानसभा निवडणूकीत आपचा पराभव का झाला? कोणत्या प्रमुख कारणांमुळे दिल्लीकरांनी बदलला कौल? जाणून घ्या

Bhakti Aghav

अरविंद केजरीवाल नवी दिल्ली मतदारसंघातून निवडणूक हरले आहेत. तसेच आपचे अनेक दिग्गज नेत्यांचा देखील दारूण पराभव झाला आहे. अखेर अशी कोणती कारण आहेत, ज्यामुळे आपला विधानसभा निवडणुकीत एवढा मोठा फटका बसला आहे? ही कारण आपण या लेखाच्या माध्यमातून जाणून घेऊयात.

Arvind Kejriwal on Delhi Assembly Elections 2025: ‘आम्ही जनादेश स्वीकारला’; विधानसभा निवडणूकीत पराभवावर अरविंद केजरीवाल यांची प्रतिक्रीया (Watch Video)

Jyoti Kadam

आपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी 2025 च्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत पराभव स्वीकारला. नुकत्याच जारी केलेल्या एका व्हिडीओत त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या.

Pune Guillain-Barré Syndrome: पुण्यात 500 कोटी रुपयांचा पाणीपुरवठा प्रकल्प, स्वच्छ पाणीपुरवठ्यासाठी नवीन कायदा; गुइलेन-बॅरे सिंड्रोमनंतर सरकारने दिली आश्वासने

Prashant Joshi

नांदेड गाव परिसरात जीबीएसचे प्रमाण जास्त असल्याने, पुणे महानगरपालिकेला पाण्याचे योग्य क्लोरिनेशन सुनिश्चित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. नांदेड गावात स्वच्छ पाण्याचा पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी व्यापक देखरेख केली जात आहे.

IND VS ENG 2nd ODI 2025 Fantasy11 Prediction: भारत-इंग्लंड यांच्यातील कटक येथील एकदिवसीय सामन्यापूर्वी अशी बनवा सर्वोत्तम प्लेइंग इलेव्हन

Jyoti Kadam

भारत विरुद्ध इंग्लंड दुसऱ्या एकदिवसीय 2025 फॅन्टसी 11 संघामध्ये शुभमन गिलला संघाचा कर्णधार बनवता येईल. आदिल रशीद (इंग्लंड) ला उपकर्णधार म्हणून निवडता येईल.

Advertisement
Advertisement