Arvind Kejriwal on Delhi Assembly Elections 2025: ‘आम्ही जनादेश स्वीकारला’; विधानसभा निवडणूकीत पराभवावर अरविंद केजरीवाल यांची प्रतिक्रीया (Watch Video)

आपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी 2025 च्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत पराभव स्वीकारला. नुकत्याच जारी केलेल्या एका व्हिडीओत त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या.

Photo Credit- X

Arvind Kejriwal on Delhi Assembly Elections 2025: दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांचा दिल्ली विधानसभा निवडणुक 2025 मध्ये (Delhi Assembly Election 2025) पराभव झाला. विधानसभा निवडणुकीती पराभवावर त्यांनी मत व्यक्त करताना, "आम्ही जनतेचा जनादेश मोठ्या नम्रतेने स्वीकारतो. या विजयाबद्दल मी भाजपचे (BJP) अभिनंदन करतो आणि मला आशा आहे की लोकांनी ज्या आश्वासनांसाठी त्यांना मतदान केले. ती सर्व आश्वासने ते पूर्ण करतील." पक्षाच्या मागील कामगिरीची कबुली देताना, केजरीवाल यांनी गेल्या दशकात आरोग्य, शिक्षण आणि पायाभूत सुविधांमध्ये केलेल्या महत्त्वपूर्ण प्रगतीवर काम केल्याचे त्यांनी म्हटले. 'आप लोकांशी जोडलेले राहून रचनात्मक विरोधी पक्ष म्हणून आपली भूमिका सुरू ठेवेल', असे ते पुढे म्हणाले.

 विधानसभा निवडणूकीत पराभवावर अरविंद केजरीवाल यांची प्रतिक्रीया 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now