ठळक बातम्या
Corruption Case: सेबीच्या माजी प्रमुख Madhabi Puri Buch आणि इतरांना तूर्तास दिलासा; FIR दाखल करण्याच्या कारवाईला मुंबई उच्च न्यायालयाची स्थगिती, उद्या सुनावणी होण्याची शक्यता
Prashant Joshiशनिवारी दिलेल्या आदेशात, मुंबईस्थित विशेष एसीबी न्यायालयाचे न्यायाधीश शशिकांत एकनाथराव बांगर म्हणाले, ‘प्रथमदर्शनी, नियामक त्रुटी आणि संगनमताचे पुरावे आहेत, ज्याची निष्पक्ष चौकशी आवश्यक आहे.’ त्यानंतर त्यांनी एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले.
UPW-W vs GG-W WPL 2025 Preview: यूपी वॉरियर्स-गुजरात जायंट्स यांच्यातील सामन्यापूर्वी हेड टू हेड रेकॉर्ड; मिनी बॅटल आणि स्ट्रीमिंगसह सर्व माहिती घ्या जाणून
Jyoti Kadamयूपी वॉरियर्सविरुद्ध गुजरात जायंट्स यांचा 15 वा सामना 3 मार्च रोजी भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट स्टेडियमवर सायंकाळी 7.30 वाजता खेळला जाईल.
Shama Mohamed on Rohit Sharma: 'रोहित शर्मा खूप जाडा'; काँग्रेस नेत्या डॉ. शमा मोहम्मद यांचे संतापजनक विधान; सोशल मीडियावर टीका होताच दिले स्पष्टीकरण (Video)
Jyoti Kadamकाँग्रेस नेत्या डॉ. शमा मोहम्मद यांनी त्यांच्या एका सोशल मीडिया पोस्टमध्ये रोहित शर्माला जाड म्हटले होते. यानंतर, त्या क्रिकेट चाहत्यांपासून ते राजकारण्यांपर्यंत सर्वांचे लक्ष्य बनल्या आहेत.
Screen Use and Myopia Risk: दररोज एक तासापेक्षा जास्त वेळ मोबाईल पाहत असाल तर सावधगिरी बाळगा; अहवालात समोर आली भयावह माहिती
Prashant Joshiआजकाल बहुतेक लोकांचा स्क्रीन टायमिंग वाढत आहे. स्क्रीन टायमिंगचा परिणाम केवळ डोळ्यांवर होत नाही, तर मेंदू आणि एकूण आरोग्यावरही होत आहे. संशोधकांनी असा इशारा दिला आहे की, जास्त स्क्रीन टाइम मेंदूवर नकारात्मक परिणाम करू शकतो.
SC On Blind Candidates Appointed to Judicial Services: दृष्टिहीन उमेदवार जिल्हा न्यायपालिकेत नियुक्तीसाठी पात्र ठरणार; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
Bhakti Aghavन्यायालयाने अंध उमेदवारांना न्यायालयीन सेवांपासून वंचित ठेवणे हे त्यांच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन आहे यावर भर दिला. केवळ अपंगत्वाच्या आधारावर कोणालाही न्यायाधीश म्हणून काम करण्याची संधी नाकारता येणार नाही असे न्यायालयाने म्हटले आहे.
Israel Hamas War: इस्रायल आणि हिजबुल्लाह यांच्यात झालेल्या संघर्षानंतर इस्रायलमधील शाळा पुन्हा सुरू
Shreya Varkeऑक्टोबर 2023 मध्ये लेबनॉन सीमेवर इस्रायल आणि हिजबुल्लाह यांच्यात युद्ध सुरु असल्यामुळे तिकडचे जनजीवन विस्कळीत झाले होते. या युद्धात मोठ्या स्तरावर जीवित आणि वित्तीय हानी झाली आहे. दरम्यान, इस्रायलमधून एक आनंदाची बातमी समोर येत आहे. उत्तर इस्रायलमधील शाळा तब्बल दीड वर्षांनंतर पुन्हा सुरू झाल्या आहेत.
KKR Jersey for IPL 2025 Unveiled: इंडियन प्रीमियर लीगच्या यंदाच्या आवृत्तीत कोलकाता नाईट रायडर्सचे खेळाडू दिसणार नव्या जर्सीत (Watch Video)
Jyoti Kadamकोलकाता नाईट रायडर्सने आयपीएल 2025 साठी त्यांच्या नव्या जर्सीचे अनावरण केले. गतविजेता संघ ईडन गार्डन मैदानावर रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूशी सामना करून त्यांच्या आयपीएल 2025ला सुरुवात करतील.
MP Shocker: इंदूर येथे शेव न दिल्यामुळे 30 वर्षीय तरुणाची चाकूने भोकसून हत्या
Shreya Varkeइंदूरमध्ये शेव देण्यास नकार दिल्याने एका व्यक्तीची हत्या केल्याची धक्कादायक घटना आली आहे. ही दुर्दैवी घटना शुक्रवारी, २८ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री परदेशीपुरा भागात घडली. धर्मेंद्र ऊर्फ गोलू असे मृताचे नाव आहे. वृत्तानुसार, घटनेच्या दिवशी धर्मेंद्र आपल्या भावासाठी सेव-नुक्ती आणण्यासाठी आले होते. वृत्तानुसार, घटनेच्या दिवशी धर्मेंद्र आपल्या भावासाठी शेव घेऊन आले होते.
Mumbai Weather Update: मुंबईकरांना पुढील काही दिवस उष्णतेपासून मिळेल आराम; सकाळचे तापमान 18-19°C राहण्याची शक्यता
Prashant Joshiमुंबईत सकाळी पुढील 2-3 दिवस 18-19 अंश सेल्सिअस तापमान पाहायला मिळेल, ज्यामुळे मुंबई मधील लोकांची सकाळ थंड आणि आल्हाददायक ठरेल. दुपारीदेखील उष्णतेच्या झळा कमी होतील.
Maharashtra Lottery Result: सागरलक्ष्मी, महा.गजलक्ष्मी सोम, गणेशलक्ष्मी भाग्यलक्ष्मी, महा. सह्याद्री धनलक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Jyoti Kadamजर तुम्ही विजेते आहात तर तुम्हाला Maharashtra State Lottery claim form वर आवश्यक माहिती भरून द्यावी लागेल.यामध्ये पत्ता, मोबाइल नंबर,पॅन कार्ड, आधार कार्ड, ही माहिती भरणं आवश्यक असते.
Oscar 2025 Winners: यंदाच्या ऑस्कर सोहळ्यात ‘Anora’ चित्रपटाने जिंकले सर्वाधिक 5 पुरस्कार; ‘The Brutalist दुसऱ्या क्रमांकावर, जाणून घ्या संपूर्ण विजेत्यांची यादी
Prashant Joshi'द ब्रुटालिस्ट' चित्रपटासाठी अॅड्रियन ब्रॉडीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा ऑस्कर आणि 'अनोरा' चित्रपटासाठी मिकी मॅडिसनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा ऑस्कर मिळाला. या वर्षी, 'अनोरा' चित्रपटाने सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन, सर्वोत्कृष्ट पटकथा, सर्वोत्कृष्ट संकलन, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री या श्रेणींमध्ये सर्वाधिक 5 पुरस्कार जिंकले.
Kane Williamson: केन विल्यमसनने एकदिवसीय सामन्यात रचला विक्रम; रॉस टेलरला मागे टाकत भारताविरुद्ध सर्वाधिका 50 पेक्षा जास्त धावा करणारा ठरला खेळाडू
Jyoti Kadamन्यूझीलंड क्रिकेट संघाचा अनुभवी फलंदाज केन विल्यमसनने इतिहास रचला आहे. भारताविरुद्ध एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक 50 पेक्षा जास्त धावा खेळणारा न्यूझीलंडचा पहिला फलंदाज बनला आहे.
Champions Trophy 2025: नेमक घडलं काय? भर मैदानात सामन्यादरम्यान विराटने धरले अक्षर पटेलचे पाय (Watch Video)
Jyoti Kadamन्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात विराट कोहली अक्षर पटेलचे पाय पकडताना दिसला. अक्षरने विराटला असे करण्यापासून थांबवले. मात्र, हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Viral Video: पाकिस्तानातून भारतात आलेल्या सीमा हैदरचा डोहाळ जेवण सोहळा संपन्न, येथे पाहा व्हायरल व्हिडीओ
Shreya Varkeपबजी गेम खेळून भारतातील तरुणाच्या प्रेमात पडलेली सीमा हैदर सध्या प्रेग्नेंट आहे. सीमा हैदरचा बेबी शॉवर सोहळा रविवारी पार पडला. सर्वोच्च न्यायालयाचे वकील ए. पी. सिंह यांच्यासह शेकडो लोक या कार्यक्रमाला उपस्थित होते. सीमा हैदर गेल्या दोन वर्षांपासून सचिन मीनासोबत रबूपुरा येथे राहत आहे. ती पाकिस्तानातून नेपाळमार्गे भारतात आली होती. सीमाला आधीच चार मुले आहेत आणि आता ती सचिनसोबत पाचव्या मुलाची अपेक्षा करत होती. अखेर आनंदाची बातमी समोर आली असून सीमाचा डोहाळ जेवण सोहळा संपन्न झाला आहे.
Liquor Party at Shiv Sena's Chembur Office: शिवसेनेच्या चेंबूर कार्यालयात दारू पार्टी आयोजित केल्याचा आरोप; व्हिडीओ व्हायरल, ठाकरे गटाकडून टीका (Watch)
Prashant Joshiव्हायरल व्हिडिओमध्ये चेंबूरमधील शिवसेना कार्यालयात अनेक व्यक्ती दारू पिताना दिसत आहेत. पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराज, शिवसेना संस्थापक बाळासाहेब ठाकरे, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि स्थानिक आमदार मंगेश कुडाळकर यांसारख्या प्रमुख व्यक्तींचे पोस्टर लावलेले दिसत आहे, यामुळे वाद आणखी वाढला.
Varun Chakaravarthy Record: चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पदार्पण सामन्यात वरुण चक्रवर्तीची शानदार कामगिरी; खास विक्रमाची नोंद
Jyoti Kadamवरुण चक्रवर्ती: भारतीय संघाचा स्टार फिरकी गोलंदाज वरुण चक्रवर्तीने रविवारी न्यूझीलंडविरुद्ध चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पदार्पणाच्या सामन्यात शानदार कामगिरी करून एक खास विक्रम आपल्या नावावर केला.
Pune Shocker: पुण्यात वडिलांचा स्वतःच्या 14 वर्षीय मुलीवर 8 महिने लैंगिक अत्याचार; पोलिसांकडून अटक, गुन्हा दाखल
Prashant Joshiपीडित मुलगी 14 वर्षांची आहे आणि वडील 45 वर्षांचे आहेत. बाल हक्क समितीने हे प्रकरण उजेडात आणले आहे. वडिलांनी आपल्या अल्पवयीन मुलीवर आठ महिने लैंगिक अत्याचार केले. जुलै 2024 ते फेब्रुवारी 2025 दरम्यान अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची नोंद आहे.
Champions Trophy 2025: चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलिया संघात बदल; सलामीवीर मॅथ्यू शॉर्ट संघाबाहेर
Jyoti Kadamभारताविरुद्धच्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाला त्यांच्या संघात शेवटच्या क्षणी बदल करावे लागले आहेत.
Pilibhit Shocker: भूलतज्ज्ञ नसल्यामुळे डॉक्टरांनी केली नॉर्मल डिलिव्हरी, प्रसूती दरम्यान बाळाचा मृत्यू
Shreya Varkeउत्तर प्रदेशातील पीलीभीतमधील काशी राम माया राज या खासगी रुग्णालयात प्रसूती दरम्यान नवजात बाळाचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी केलेल्या चौकशीत असे समोर आले आहे कि, भूलतज्ज्ञ उपलब्ध नसल्यामुळे सिझेरियन शस्त्रक्रियेकडे दुर्लक्ष केले आणि त्याऐवजी नॉर्मल डिलिव्हरीचा पर्याय निवडला. प्रसूतीवेदना झाल्यानंतर पतीने पत्नीला दुसऱ्या रुग्णालयात नेण्याची विनंती केली, तेव्हा वैद्यकीय कर्मचार् यांनी नॉर्मल डिलिव्हरी सुरक्षित राहील, असे आश्वासन दिले, ज्याला कुमार यांनी होकार दिला.
Maharashtra Budget Session: आजपासून सुरु होणार महाराष्ट्राचे अर्थसंकल्पीय अधिवेशन; 10 मार्च रोजी अजित पवार सादर करणार राज्याचा अर्थसंकल्प
Prashant Joshiविधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अतिशय चांगले व संतुलित अर्थसंकल्प मांडण्याचा आमचा प्रयत्न आहे. आर्थिक शिस्त पाळताना भांडवली खर्चावर परिणाम होणार नाही, याची काळजी घेत आहोत. हे करत असताना कोणतीही फ्लॅगशिप योजना बंद करणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत दिली.