Mumbai Weather Update: मुंबईकरांना पुढील काही दिवस उष्णतेपासून मिळेल आराम; सकाळचे तापमान 18-19°C राहण्याची शक्यता

मुंबईत सकाळी पुढील 2-3 दिवस 18-19 अंश सेल्सिअस तापमान पाहायला मिळेल, ज्यामुळे मुंबई मधील लोकांची सकाळ थंड आणि आल्हाददायक ठरेल. दुपारीदेखील उष्णतेच्या झळा कमी होतील.

Temperature in India

वाढत्या तापमानामुळे मुंबईकरांसाठी फेब्रुवारी महिना थोडा क्लेशदायक ठरला. फेब्रुवारीमध्ये मुंबईकरांनी उष्णतेची लाटही अनुभवली. मात्र आता मुंबईकरांना थोडा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. मुंबईत सकाळी पुढील 2-3 दिवस 18-19 अंश सेल्सिअस तापमान पाहायला मिळेल, ज्यामुळे मुंबई मधील लोकांची सकाळ थंड आणि आल्हाददायक ठरेल. दुपारीदेखील उष्णतेच्या झळा कमी होतील. अशाप्रकारे पुढील काही दिवस उष्णतेपासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे. मात्र राज्यात इतर ठिकाणी तापमानात वाढ पाहायला मिळेल. मार्च ते मे महिन्यांमध्ये सर्वाधिक उन्हाच्या झळांचा सामना करावा लागू शकतो. वाढत्या तापमानामुळे नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. (हेही वाचा: Maharashtra: वाशिममध्ये बर्ड फ्लूचा कहर, 6000 कोंबड्यांचा संशयास्पद मृत्यू, नागरिकांना सतर्कतेचा इशारा)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now