ठळक बातम्या

UP Shocker: हुंड्याची मागणी पूर्ण न झाल्याने पतीने दारूच्या नशेत कापली पत्नीची नाक

Shreya Varke

हुंड्याच्या मागणीमुळे अनेक महिलांना सासरच्या मंडळींकडून छळाला सामोरे जावे लागते. असाच एक प्रकार हरदोई जिल्ह्यातील सहजनपूर गावातून समोर आला आहे. जिथे पतीने चक्क पत्नीची नाक कापली आहे. आई-वडिलांकडे ५० हजार रुपयांची मागणी केली होती. या कारणावरून आरोपीने पत्नीवर धारदार शस्त्राने वार करून तिचे नाक कापले.त्यानंतर ही महिला बेशुद्ध पडली. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

IND vs NZ Champions Trophy 2025 Final Live Score Update: भारताला मिळाली तिसरी विकेट, कुलदीपने केन विल्यमसनला केले बाद

Nitin Kurhe

न्यूझीलंडने टाॅस जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या न्यूझीलंडला तिसरा धक्का लागला आहे. केन विल्यमसन 11 धावा करुन बाद झाल आहे. न्यूझीलंडचा स्कोर 75/3

IND vs NZ Champions Trophy 2025 Final Live Score Update: वरुण नंतर कुलदीपची कमाल, भारताने न्यूझीलंडला दिला दुसरा धक्का

Nitin Kurhe

टीम इंडियाचे नेतृत्व रोहित शर्मा करत आहे. तर, न्यूझीलंडची कमान मिचेल सँटनरच्या खांद्यावर आहे. दरम्यान, न्यूझीलंडने टाॅस जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या न्यूझीलंडला दुसरा धक्का लागला आहे.

Rohit Sharma Funny Memes: रोहित शर्मा पुन्हा टॉस हरला; सोशल मीडियावर मजेदार मीम्सचा पाऊस

Jyoti Kadam

भारत विरुद्ध न्यूझीलंड चॅम्पियन्स ट्रॉफी 2025च्या फायनल सामन्यात रोहित शर्मा पुन्हा एकदा टॉस हरला, ज्यामुळे सोशल मीडियावर मजेदार मीम्स सुरू झाल्या आहेत. रोहित शर्माने सलग 15 वेळा नाणेफेक गमावली आहे.

Advertisement

IND vs NZ Champions Trophy 2025 Final Live Score Update: वरुणला मिळाली पहिली विकेट, विल यंग 15 धावा करुन बाद

Nitin Kurhe

न्यूझीलंडने टाॅस जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या न्यूझीलंडला पहिला धक्का लागला आहे, न्यूझीलंडचा स्कोर 64/1

‘Chhaava’ Box Office Collection: विकी कौशल स्टारर 'छावा'ची बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई; चित्रपट 500 कोटींहून अधीकची कमाई

Jyoti Kadam

विकी कौशलचा ऐतिहासिक ड्रामा चित्रपट 'छवा' बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत आहे आणि आता तो 520 कोटी रुपयांच्या ऐतिहासिक कमाईच्या अगदी जवळ पोहोचला आहे.

IND vs NZ Champions Trophy 2025 Final: वनडे सामन्यात रोहित शर्माने सलग 12 वेळा नाणेफेक गमावली, नको असलेला विक्रम नावावर; ब्रायन लाराच्या क्लबमध्ये सामील

Nitin Kurhe

एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक टॉस गमावणाऱ्या कर्णधारांच्या यादीत हिटमॅनचे नाव नोंदवले गेले आहे. त्याने सलग 12 सामन्यात नाणेफेक गमावून वेस्ट इंडिजचा माजी क्रिकेटपटू ब्रायन लाराची बरोबरी केली आहे. या महान फलंदाजाच्या नावावर या फॉरमॅटमध्ये सलग 12 सामन्यांमध्ये टॉस हरण्याचा विक्रमही आहे.

8th Pay Commission: आठवा वेतन आयोग, केंद्र सरकार एप्रिल महिन्यात सुरु करणार महत्त्वाची प्रक्रिया? कर्मचाऱ्यांठी मोठी बातमी

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

सरकार एप्रिल 2025 मध्ये 8th pay commission प्रक्रिया सुरू करण्याची शक्यता आहे, ज्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांचे पगार आणि पेन्शन वाढण्याची शक्यता आहे. फिटमेंट फॅक्टर आणि अपेक्षित भत्त्यांबद्दल तपशील जाणून घ्या.

Advertisement

Gujarat Medical College Ragging: मेडिकल कॉलेजमधून रॅगिंगचे प्रकरण समोर; एमबीबीएस इंटर्न्सचे अपहरण आणि छळ, गुजरातमधील घटना

Jyoti Kadam

एका इंस्टाग्राम पोस्टमुळे संतप्त झालेल्या गुजरातमधील भावनगर मेडिकल कॉलेजमधील सहा एमबीबीएस डॉक्टरांनी तीन इंटर्नचे अपहरण केले, त्यांना मारहाण केली आणि त्यांचा शारिरीक छळ केला.

Viral Video: एक्स्प्रेसच्या स्लीपर कोचमध्ये सीटवरून दोन महिलांमध्ये जोरदार हाणामारी, व्हिडीओ व्हायरल

Shreya Varke

लोकल ट्रेन, मेट्रो ट्रेन आणि एक्स्प्रेस ट्रेनचे अनेक व्हिडिओ समोर येतात. असाच एक व्हिडिओ एक्स्प्रेस ट्रेनमधून समोर आला आहे, जिथे स्लीपर कोचमध्ये बसलेल्या दोन महिलांमध्ये जोरदार हाणामारी झाली. प्रवाशांमध्ये एका सीटवरून हि हाणामारी झाली आहे. या भांडणाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, सीटवर दोन महिला बसल्या आहेत आणि या दरम्यान त्यांच्यात वाद निर्माण होतो आणि दुसरी महिला अचानक एका महिलेला कानशिलात लगावते.

IND vs NZ Champions Trophy 2025 Final Toss Update: अंतिम सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकली, भारत प्रथम गोलंदाजी करणार

Nitin Kurhe

भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि न्यूझीलंड राष्ट्रीय क्रिकेट संघ (IND vs NZ) यांच्यात दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जाईल. या स्पर्धेत टीम इंडियाचे नेतृत्व रोहित शर्मा करत आहे. तर, न्यूझीलंडची कमान मिचेल सँटनरच्या खांद्यावर आहे. दरम्यान, न्यूझीलंडने टाॅस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

Raj Thackeray On Woman Day: राजमाता जिजाऊ यांच्या नावाने ओळखला जावा- राज ठाकरे

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी जागतिक महिला दिन, कुंभमेळा, गंगा नदी प्रदुषण या मुद्द्यांवर सडेतोड भाष्य केले आहे. ते पुणे येथे पक्षाच्या 19 व्या स्थापनादिनानिमित्त बोलत होते.

Advertisement

IND vs NZ, ICC Champions Trophy 2025 Final: फायनलमध्ये विराट कोहलीकडे मोठा विक्रम करण्याची संधी, एकदिवसीय क्रिकेटमध्ये दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरू शकतो

Jyoti Kadam

संगकाराने 404 एकदिवसीय सामन्यांच्या 380 डावांमध्ये 14,234 धावा केल्या. 2015 पासून तो या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. जर कोहलीने या सामन्यात चांगली कामगिरी केली तर 10 वर्षांनंतर एकदिवसीय क्रिकेटमधील टॉप-2 फलंदाजांच्या यादीत बदल होईल.

Amroha: आमरोमध्ये जमिनीच्या वादातून झालेल्या हाणामारीत वृद्धाची हत्या, 2 जण गंभीर जखमी

Shreya Varke

उत्तर प्रदेशातील अमरोहाच्या कुआ खेरा भागात जमिनीच्या वादातून जमावाने कुटुंबावर केलेल्या हल्ल्यात एका वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाला, तर आईआणि मुलगा गंभीर जखमी झाल्याचे वृत्त आहे. 8 मार्च रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडलेली ही धक्कादायक घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या फुटेजमध्ये दोन वृद्ध व्यक्ती त्यांच्या अंगणात बसलेले दिसत आहेत, त्यावेळी सशस्त्र हल्लेखोरांच्या एका गटाने काठ्या आणि बंदुका घेऊन आत घुसून निर्घृण हल्ला केला.

Maharashtra Lottery Result: मोहिनी, महा.गजलक्ष्मी रवि, गणेशलक्ष्मी वैभव लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल

Jyoti Kadam

मोहिनी लॉटरीच्या सोडतीची संख्या 441, महा. गजलक्ष्मी रवि लॉटरीच्या सोडतीची संख्या 1775, गणेशलक्ष्मी वैभव लॉटरीच्या सोडतीची संख्या 861 आहे. तिनही लॉटरींचे पहिले बक्षिस 10 हजारांचे आहे.

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजना, सरकारकडून तोंडाच्या वाफा, अन् हवेत दांडपट्टा; महिलांमध्ये नाराजी

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

लाडकी बहीण योजना लाभार्थ्यांना मार्च महिन्यात फेब्रुवारी महिन्यातील हप्ता मिळाला. मार्च महिन्यातील हप्ता केव्हा मिळणार याबाबत उत्सुकता आहे. राज्य सरकारने आश्वासन न पाळल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी आहे.

Advertisement

IND vs NZ, ICC Champions Trophy 2025 Final Match Stats And Preview: टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्यात चुरशीचा सामना; आज 'हे' मोठे विक्रम होऊ शकतात

Jyoti Kadam

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा अंतिम सामना आज म्हणजेच 9 मार्च रोजी भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि न्यूझीलंडचा राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यात खेळला जाईल.

Andhra Pradesh: मतिभ्रमाने त्रस्त असलेल्या तरुणाने महिलेवर केला चाकू हल्ला, आंध्र प्रदेश येथील घटना

Shreya Varke

आंध्र प्रदेशातील मुंमिदिवरम मंडलातील अनाथावरम येथे एका व्यक्तीने विवाहितेवर चाकूने हल्ला केल्याची घटना शनिवारी घडली. आरोपी पंथगंती जय रामकृष्ण याने महिलेवर हल्ला केला. या घटनेत महिला गंभीर जखमी झाली आणि तिला तातडीने उपचारासाठी अमलापुरम येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मुम्मिदीवरमचे इन्स्पेक्टर मोहन राव यांनी सांगितले की, पीडित ा आणि आरोपी दोघेही शेजारी असून त्यांना प्रत्येकी दोन मुले आहेत.

IND vs NZ, ICC CT 2025 Final Live Telecast On DD Sports: भारत विरुद्ध न्यूझीलंड चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलचे थेट प्रक्षेपण फ्री डिशवर पाहू शकता? दूरदर्शन टीव्ही चॅनेलवरील प्रसारण कसे पहाल

Jyoti Kadam

जिओ स्टार हे भारतातील आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे अधिकृत प्रसारक आहे. आठ देशांच्या स्पर्धेचे प्रसारण डीडी स्पोर्ट्स, डीडी नॅशनल, डीडी फ्री डिश किंवा दूरदर्शन नेटवर्कवर उपलब्ध असेल का? हे जाणून घेऊयात.

Pune BMW Obscenity Case: बीएमडब्लूने फिरणाऱ्या मस्तवाल गौरव आहुजा यास अटक; पुणे येथील शास्त्री चौक अश्लिलता प्रकरण

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

Gaurav Ahuja Arrest: सार्वजनिक ठिकाणी अश्लील वर्तन करताना कॅमेरात कैद झालेल्या पुण्यातील व्यावसायिकाचा मुलगा गौरव आहुजा याला सातारा येथे अटक करण्यात आली आहे. पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी त्यास पुणे पोलिसांच्या ताब्यात दिल्याचे वृत्त आहे.

Advertisement
Advertisement