Video: प्रसिद्ध होण्यासाठी लोक काहीही करत असतात. विशेषत: तरुणांमध्ये प्रसिद्ध होण्याची स्पर्धा लागली आहे. त्यासाठी ते काहीही करायला तयार असतात. आता असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे, ज्यामध्ये एक तरुण जीवघेणा स्टंट करत आहे. या व्हिडीओमध्ये तरुण इमारतीवरून खाली उडी मारताना दिसत आहे. तो तरुण पाठीमागे पलटून खाली उडी मारतो परंतु खाली वाळू असते त्यामुळे त्याला काहीच होत नाही. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक जोरदार कमेंट करत आहेत. या तरुणाने ज्या पद्धतीने बॅक फ्लिप जंप केला आहे, ते पाहता त्याने खूप सराव केला असेल असे वाटते, पण या स्टंट दरम्यान झालेली एक चूकही या तरुणाचा जीव घेऊ शकते.

व्हिडिओ पाहा:

व्हिडिओ ट्विटरवर @HayulAnsari नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 'तो काही लाईक्ससाठी आपला जीव धोक्यात घालत आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत 4 हजारांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. लोक या व्हिडिओवर जोरदार कमेंट करत आहेत. एकाने लिहिलं, दु:खी, दुसऱ्याने लिहिलं, भावावर खूप जबाबदारी आहे. तिसऱ्याने लिहिले आहे की, 'तो मोठा मूर्ख आहे.