Health startup Mojocare layoffs: मोजोकेअरने 170 कर्मचाऱ्यांना कामावरुन हटवल्याचे वृत्त, गुंतवणूकदारांना कंपनीमध्ये आर्थिक अनियमितता आढळून आल्याचीही चर्चा

सूत्रांच्या हवाल्याने प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, हेल्थटेक स्टार्टअप असलेल्या मोजोकेअरच्या (Mojocare) प्रमुख गुंतवणूकदारांना कंपनीमध्ये आर्थिक अनियमितता आढळून आली आहे.

Layoffs Representative Image (Photo Credit: Pixabay)

बेंगळुरू-आधारित हेल्थकेअर स्टार्टअपने (Bengaluru-Based Healthcare Startup) आपले लक्ष्य पूर्ण करण्यासाठी विक्री बिले आणि वाढीव महसूल वाढवला असल्याचे समजते. सूत्रांच्या हवाल्याने प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, हेल्थटेक स्टार्टअप असलेल्या मोजोकेअरच्या (Mojocare) प्रमुख गुंतवणूकदारांना कंपनीमध्ये आर्थिक अनियमितता आढळून आली आहे. केवळ मोजोकेअरच नव्हे तर सेक्वॉइया सर्ज, बी कॅपिटल आणि चिराते व्हेंचर्स यांनी बेंगळुरूस्थित कंपनीमध्ये आर्थिक अनियमितता आढळून आली आहे, असे कन्सोर्टियमने रविवारी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे. ही घटना म्हणजे, भारतीय स्टार्टअपमधील कॉर्पोरेट गव्हर्नन्सच्या अपयशाचे आणखी एक उदाहरण आहे, असे अभ्यासकांनी म्हटले आहे.

एक लहान मात्र भक्कम समूह म्हणून काम करण्याच्या उद्देशाने कंपनीने आगोदर 170 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले. त्यानंतर हे घडले आहे. मोजोकेअरच्या टाळेबंदीबद्दल प्रथम Entrackr ने शनिवारी अहवाल दिला. मोजोकेअरच्या प्रमुख गुंतवणूकदारांनी कंपनीच्या आर्थिक ताळेबंदाचे पुनरावलोकन सुरू केले. विश्लेषण सुरुअसताना, प्रारंभिक निष्कर्षांनी आर्थिक अनियमितता उघडकीस आणल्या असल्याचे स्पष्ट झाले. तसेच विविध परिचालन आणि बाजार घटकांमुळे व्यवसाय मॉडेल टिकाऊ नसल्याचेही पुढे आले. परिणामी, मोजोकेअर आता आपले विविध विभाग कमी करणार आहे आणि गुंतवणूकदार गट कंपनीच्या संक्रमणाद्वारे कंपनीसोबत काम करत आहे, असे निवेदनात म्हटले आहे.

दरम्यान, मोजोकेअरने बाजारातून एकूण $24 दशलक्ष उभे केले आहेत आणि शेवटच्या निधी संकलनादरम्यान त्याचे मूल्य सुमारे $70-75 दशलक्ष इतके होते. अलीकडील टाळेबंदीनंतर, कंपनीने भांडवल कार्यक्षमता आणि तर्कसंगत खर्चावर चर्चा केली आणि एका लहान संघाला या हालचालीचे स्पष्टीकरण दिले. कंपनीने मात्र सध्याच्या समूहाच्या आकाराचा उल्लेख केलेला नाही.

प्रसारमाध्यमांतील वृत्तांनंतर मोजोकेअरने प्रवक्त्यांच्या माध्यमातून एक निवेदन प्रसिद्ध केले आहे. ज्यात म्हटले आहे की, आम्ही मोजोकेअरमध्ये आमच्या गुंतवणूकदारांशी जवळून काम करत आहोत. कंपनीतून पैसे काढले जात असल्याचे सर्व आरोप आम्ही फेटाळतो आहोत. आमच्या गुंतवणूकदारांसह आम्ही सक्रियपणे व्यवसायासाठी काय सर्वोत्कृष्ठ आहे याबाबत विचार आणि चर्चा करत आहोत.

ट्विट

मोजोकेअर भारतपे, गोमेकॅनिक, झिलिंगो, ट्रेल, बायजू यासारख्या जवळपास अर्धा डझन सेक्वॉइया पोर्टफोलिओ कंपन्यांना फॉलो करते. ज्यांची आर्थिक अनियमितता सिद्ध झाली आहे किंवा त्यांची छाननी सुरू आहे. BharatPe आणि Zilingo हे नवीन टीमद्वारे चालवले जात असताना, GoMechanic ला Servizzy या लाइफलाँग ग्रुपच्या नेतृत्वाखालील 70% पेक्षा जास्त कर्मचार्‍यांना काढून टाकल्यानंतर कंपनीने विकत घेतले. ट्रेलने गेल्या वर्षी मार्चमध्ये त्याच्या जवळपास निम्म्या कर्मचार्‍यांना काढून टाकले. तेव्हाही कंपनी जोरदार चर्चेत आली होती.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)