महाराष्ट्र

Nashik Mumbai Highway Accident: नाशिक मुंबई हायवे फ्लायओव्हरवर भीषण अपघात, 6 जणांचा मृत्यू

Amol More

नाशिक मुंबई हायवे फ्लायओव्हरवरील पिकअप आणि मिनी ट्रकमध्ये झालेल्या अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात 5 जण जखमी झाले आहेत त्यापैकी 2 जणांची प्रकृती गंभीर आहे.

Amit Shah on Naxalism: गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितली देशातून नक्षलवाद संपण्याची तारिख

Amol More

भारतीय जनता पक्षाचे राज्यस्तरीय अधिवेशन शिर्डी येथे होत आहे. दरम्यान, भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री अमित शाह यांनीही या कार्यक्रमाला उपस्थित राहत कार्यकर्त्यांचे आभार मानले.

Drunk Youth Hits Traffic Cop Near Magarpatta: पुण्यात मगरपट्टाजवळ मद्यधुंद तरुणाचा वाहतूक पोलिसावर हल्ला; घटना कॅमेऱ्यात कैद (Watch Video)

Bhakti Aghav

शनिवारी संध्याकाळी ही घटना घडली. हडपसर पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेतले आहे. ही घटना रासकर चौकातील मगरपट्टाजवळ घडली, जिथे हडपसर वाहतूक विभाग वाहतूक व्यवस्थापित करत होता.

Satara Shocker: मानमध्ये दारूच्या नशेत क्षुल्लक कारणावरून तरुणाने केली आईची हत्या; पोलिसांकडून आरोपीला अटक

Prashant Joshi

आईने जेवण देण्यास नकार दिला व स्वतः जेवण वाढून घेण्यास सांगितले. या कारणावरून दोघांमध्ये भांडण झाले. त्यानंतर परिस्थिती चिघळली. यावेळी रागाच्या भरात व नशेत विशालने त्याच्या 48 वर्षीय आईवर स्टीलच्या भांड्याने हल्ला केला.

Advertisement

Maharashtra Bank holidays in January 2025: मकर संक्रांतीनिमित्त 14 जानेवारीला महाराष्ट्रातील बँका बंद असणार? जाणून घ्या या महिन्यातील सुट्ट्यांची यादी

Prashant Joshi

जानेवारी महिन्यात सण, प्रादेशिक आणि राष्ट्रीय सुट्ट्यांव्यतिरिक्त, सर्व बँका (सरकारी आणि खाजगी) प्रत्येक महिन्याप्रमाणे दोन शनिवार आणि चार रविवारी बंद राहतील. भारतातील प्रत्येक राज्यामध्ये बँकांच्या सुट्ट्या वेगवेगळ्या असू शकतात.

Maharashtra Lottery Result: मोहिनी, महा.गजलक्ष्मी रवि, गणेशलक्ष्मी वैभव लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल

Jyoti Kadam

महाराष्ट्र लॉटरीची स्थापना होऊन 55 वर्ष झाली. ही राज्य सरकार संचालित लॉटरी विश्वासार्ह आहे. 12 एप्रिल 1969 रोजी राज्य सरकार संचालित महाराष्ट्र लॉटरीची स्थापना करण्यात आली.

Pune Empress Garden Flower Show 2025: पुण्यात 24 ते 27 जानेवारी दरम्यान एम्प्रेस गार्डन फ्लॉवर शोचे आयोजन; देशभरातील नर्सरी मालक होणार सहभागी

Prashant Joshi

पुणे, कोल्हापूर, सांगली, नाशिक, आंध्र प्रदेश आणि देशभरातील नर्सरी मालकांनी या फ्लॉवर शोमध्ये सहभागी होण्याची अपेक्षा आहे. कवडे माळा, घोरपडी येथे वसलेले, एम्प्रेस बोटॅनिकल गार्डन 39 एकर समृद्ध जैवविविधतेने व्यापलेले आहे.

Jalgaon: विना परवाना अल्पवयीन वाहनचालकांवर पोलिसांची कारवाई; पालकांकडून एकूण 18 लाख दंड वसूल

Prashant Joshi

नियमाचे वारंवार उल्लंघन केल्यास पालकांवर गुन्हे दाखल केले जातील, असा इशारा वाहतूक पोलिसांनी दिला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी सांगितले की, अल्पवयीन मुलांचा समावेश असलेल्या अपघातांमध्ये वाढ झाल्याने ही कारवाई करण्यात आली.

Advertisement

Thane Accident: ठाण्यात पानखंडा रोडवर MSRTC Bus ची मेट्रोच्या खांबाला धडक; 8 जण जखमी

Bhakti Aghav

चालक कृष्णा अडसूळ हा बेदरकारपणे आणि निष्काळजीपणे गाडी चालवत होता. एमएसआरटीसीच्या तक्रारीवरून भारतीय न्याय संहिता आणि मोटार वाहन कायद्याअंतर्गत चालकाविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. त्याला अद्याप अटक करण्यात आलेली नाही.

Mumbai Fire: मुंबईतील कुर्ला परिसरातील एका हॉटेलमध्ये भीषण आग, अग्निशमन दलाच्या 5 गाड्या घटनास्थळी दाखल

Amol More

मुंबईतील एका हॉटेलमध्ये भीषण आग लागली आहे. आग विझविण्यासाठी पाच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

Nanded Shocker: नांदेडमध्ये स्मार्टफोन न मिळाल्याने विद्यार्थ्याने केली आत्महत्या; शेतकरी बापानं देखील त्याच ठिकाणी संपवले जीवन

Amol More

मुलाच्या आत्महत्येनंतर वडिलांनीही त्याच दोरीने गळफास घेतला ज्याने त्याच्या मुलाने गळफास घेतला होता. यानंतर दोघांचेही मृतदेह त्यांच्या शेतातील झाडाला लटकलेले आढळले.

Parking Area Certificate: महाराष्ट्रातील कार खरेदीदारांना लवकरच नवीन वाहनांची नोंदणी करण्यासाठी 'पार्किंग एरिया' प्रमाणपत्राची आवश्यकता लागणार

Amol More

राज्यातील वाहतूक कोंडी आणि प्रदूषण कमी करण्यासाठी महाराष्ट्र सरकार एका नाविन्यपूर्ण योजनेचा विचार करत आहे. नवीन वाहनांची नोंदणी करण्यासाठी पार्किंग क्षेत्रे अनिवार्य करण्याचा हा निर्णय आहे.

Advertisement

Woman Kills Son: मानसिक आजाराने त्रस्त असलेल्या आईने आपल्या 10 वर्षाच्या मुलाची केली हत्या; गुन्हा दाखल, मुंबईच्या वांद्रे परिसरातील धक्कादायक घटना

Prashant Joshi

गुरुवारी संध्याकाळी अभिलाषा अचानक काही कारणावरून चिडली. या रागाच्या भरात तिने मुलाला ओढत बेडरूममध्ये नेले आणि नंतर खोलीचा दरवाजा बंद केला. खोलीतच तिने आपल्या 10 वर्षाच्या मुलाचा वायरने गळा दाबून खून केल्याचा आरोप आहे.

BMC Election 2025: उद्धव ठाकरेंची शिवसेना बीएमसी निवडणूक 2025 एकट्याने लढणार; Sanjay Raut यांची मोठी घोषणा

Prashant Joshi

उद्धव गटाचे नेते राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी याबाबत माहिती दिली आहे. ते म्हणाले की, त्यांचा पक्ष महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकट्याने लढवणार आहे.

State-Level Tourism Festival: लवकरच महाबळेश्वर-पाचगणी परिसरात आयोजित केला जाणार तीन दिवसीय राज्यस्तरीय पर्यटन महोत्सव; मंत्री शंभूराज देसाई यांची माहिती

टीम लेटेस्टली

महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी याबाबत माहिती दिली. त्यांनी महोत्सवासाठी योग्य ठिकाण निवडण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. नुकतेच देसाई यांनी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात या भागातील मंजूर, चालू आणि प्रस्तावित विकास कामांचा आढावा घेण्यासाठी बैठक घेतली.

Devendra Fadnavis On Maharashtra Politics: शरद पवार NDA मध्ये सामील होतील का? देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'राजकारणात सर्वकाही शक्य आहे'

Bhakti Aghav

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, शरद पवार यांना हे समजले आहे की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही एक नियमित राजकीय शक्ती नाही तर एक राष्ट्रवादी शक्ती आहे. कोणत्याही स्पर्धेत इतरांची प्रशंसा करणे चांगले असते. कदाचित म्हणूनच पवारांनी संघाचे कौतुक केले असावे. शरद पवार हे चाणक्य आहेत.

Advertisement

App for Real-Time Bus Tracking: आता लालपरीचे लोकेशन समजणार! ST महामंडळाने रिअल-टाइम बस ट्रॅकिंग आणि लोकेशन अपडेट्ससाठी लाँच केले अॅप

Bhakti Aghav

या अॅपमुळे प्रवाशांना त्यांच्या मोबाइल डिव्हाइसवर लालपरी बसेसचे स्थान ट्रॅक करता येणार आहे. या अॅपद्वारे, प्रवाशांना त्यांच्या एसटी तिकिटावरील क्रमांकाच्या आधारे त्यांच्या निवडलेल्या बस स्टॉपवर बसची अपेक्षित आगमन वेळ देखील समजणार आहे.

Maharashtra Lottery Result: महाराष्ट्रलक्ष्मी, महा.गजलक्ष्मी शनि, गणेशलक्ष्मी समृद्धी, महा. सह्याद्री प्रभालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल

Jyoti Kadam

कमी पैशांच्या गुंतवणूकीतून मोठा धनलाभ व्हावा, चांगल आयुष्य जगता यावं असं प्रत्येकाला वाटतं. महाराष्ट्र राज्य सरकारची लॉटरी सिस्टीम ही अशा इच्छूकांसाठी लाभदायी आहे.

Mumbai Metro Line 2B: मुंबईकरांसाठी खुशखबर! मेट्रो लाईन 2ब पूर्णत्वाच्या मार्गावर, 78 टक्के काम पूर्ण, जाणून घ्या स्थानके व इतर तपशील

Prashant Joshi

या लाईनच्या माध्यमातून अंधेरी, वांद्रे, चेंबूर आणि मानखुर्द सारखे भाग जोडले जातील. ही सेवा सुरु झाल्यानंतर दररोज 10 लाखांहून अधिक रायडरशिप मिळवेल अशी अपेक्षा आहे.

Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse Case: मुंबई उच्च न्यायालयाचा शिल्पकार जयदीप आपटे यांना दिलासा; 25 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर

Bhakti Aghav

शिल्पकार जयदीप आपटे यांना मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी जामीन मंजूर केला. न्यायमूर्ती एन. आर. बोरकर यांनी 25 हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर आपटे यांना जामीन मंजूर केला. जयदीप आपटे यांनी सोसाट्याच्या वाऱ्यामुळे कांस्य पुतळा पडला असा दावा केला होता.

Advertisement
Advertisement