State-Level Tourism Festival: लवकरच महाबळेश्वर-पाचगणी परिसरात आयोजित केला जाणार तीन दिवसीय राज्यस्तरीय पर्यटन महोत्सव; मंत्री शंभूराज देसाई यांची माहिती
महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी याबाबत माहिती दिली. त्यांनी महोत्सवासाठी योग्य ठिकाण निवडण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. नुकतेच देसाई यांनी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात या भागातील मंजूर, चालू आणि प्रस्तावित विकास कामांचा आढावा घेण्यासाठी बैठक घेतली.
State-Level Tourism Festival: महाराष्ट्रामध्ये लवकरच मोठा पर्यटन महोत्सव आयोजित केला जाणार आहे. माहितीनुसार, दहावी आणि बारावीच्या परीक्षा संपल्यानंतर महाबळेश्वर-पाचगणी परिसरात भव्य तीन दिवसीय राज्यस्तरीय पर्यटन महोत्सव आयोजित करण्यात येणार आहे. महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी याबाबत माहिती दिली. त्यांनी महोत्सवासाठी योग्य ठिकाण निवडण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. नुकतेच देसाई यांनी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात या भागातील मंजूर, चालू आणि प्रस्तावित विकास कामांचा आढावा घेण्यासाठी बैठक घेतली. निवडणूकीपूर्वी अनेक विकास कामांना मंजूरी देण्यात आलेली आहे. सध्या ही विकास कामे कोणत्या टप्प्यावर आहेत यासंबधीचा आढावा देसाई यांनी घेतला.
महाबळेश्वर हे महाराष्ट्रातील सर्वोत्तम हिल स्टेशन आहे. हे सह्याद्रीच्या सपाटीवर समुद्रसपाटीपासून सुमारे 4500 फूट उंचीवर वसलेले आहे. जुन्या बॉम्बे प्रेसिडेन्सीची ही पूर्वीची उन्हाळी राजधानी होती. तेथील विलक्षण हिरवळ, सुंदर बागा आणि श्वास रोखून धरणारे दृश्य पर्यटकांना भुरळ भुरळ घालतात. ब्रिटीश काळात बांधलेल्या असंख्य भव्य वाड्या आजही राजाचे स्मारक म्हणून इथे उभ्या आहेत. यासह महाबळेश्वर हे स्ट्रॉबेरीसाठी प्रसिद्ध आहे. (हेही वाचा: New Mahabaleshwar: नवीन महाबळेश्वर प्रकल्पाचा विकास आराखडा प्रसिद्ध; ट्रेकिंग, वॉटर स्पोर्ट्स, टॉय ट्रेन्स, केबल सिस्टिमसह अनेक बाबींचा समावेश, जाणून घ्या सविस्तर)
State-Level Tourism Festival:
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)