Diwali 2018 : दिवाळी स्पेशल 5 सहजसोप्या रांगोळी डिझाईन्स
दिवाळी हा रोषणाईचा सण आहे. हिंदू परंपरेतील दिवाळी हा एक मोठा सण आहे. भारतभर मोठ्या उत्साहाने साजरा केल्या जाणार्या या सणामध्ये दिव्यांची आरास, फटाके, नवीन कपडे आणि भेटवस्तू यांची रेलचेल असते. भारतीय परंपरेमध्ये प्राचीन काळापासून घराबाहेर अंगणात रांगोळी काढली जाते. रांगोळी ही दिवाळीतील एक प्रमुख आकर्षणाचा भाग असतो.
ठिपक्यांची रांगोळी, फुलांची रांगोळी, भव्य स्वरूपात रांगोळीच्या रूपातून साकारलेली चित्रं अशा विविध रूपांमध्ये रांगोळी साकारली जाते. आजकाल घरासमोर मोठी रांगोळी काढण्यासाठी खुली जागा नसते. त्यामुळे किमान सणाच्या दिवशी लहानशी रांगोळी काढली जाते. मग यंदा दिवाळीमध्ये तुमच्या घरासमोर कोणती रांगोळी काढायची हा प्रश्न पडला असेल तर हा या काही डिझाईन्स तुम्हांला नक्की मदत करू शकतील. दिवाळीत नरकचतुर्दशी दिवशी अभ्यंगस्नान का केले जाते?
यंदा दिवाळीमध्ये सकाळी उठल्यावर किंवा संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस तुम्हांला नेमकी कोणती रांगोळी काढायची ? हा प्रश्न आता सतावणार नाही. जाणून घ्या काय आहे दिवाळीतील पाच दिवसांचे महत्व; काळ आणि पूजेचे शुभ मुहूर्त
तुम्हांला ही दिवाळी सुखाची, आनंदाची जावो ! या शुभेच्छा