प्रियंका चोप्राच्या वाढदिवसानिमित्त Nick Jonas ने खास फोटो शेअर केला आहे.

 

हरियाणामध्ये 617 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे हरियाणातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 6,022 वर पोहचली आहे. 


 

कर्नाटकमध्ये आज 4120 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत.

कर्नाटकमध्ये आज 4120 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत.

झारखंडमध्ये आज 153 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.

 

आंध्रप्रदेश येथील विशाखापट्टणमच्या आदिविवाराम भागात केबलचे काम करत असताना विजेच्या धक्क्याने दोन जणांचा मृत्यू झाला आहे. एएनआयचे ट्विट- 

   

तेलंगणातही कोरोनाचा विळखा पडत चालला आहे. राज्यात आज 1 हजार 296 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. ज्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 45 हजार 76 पोहचला आहे. यापैकी 415 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 32 हजार 438 जणांनी कोरोनावर मात केली आहे.

 

जम्मू-काश्मीरमध्ये आज 701 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.

 

राजस्थानमध्ये आज 934 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.

 

मुंबईत गेल्या 24 तासात 1193 रुग्णांना डिस्चार्ज तर 71,685 जणांची प्रकृती सुधारल्याचे BMC कडून सांगण्यात आले आहे.

Load More

मुंबई मध्ये (Mumbai Rains Update) मागील काही दिवस विश्रांती घेतलेला पाऊस आज पुन्हा हजेरी लावेल असे अंदाज आहेत. हवामान खात्याचे उपमहासंचालक के. एस. होसाळीकर यांच्या माहितीनुसार, आज व उद्या (19 व 20 जुलै) रोजी मुंबईत मध्यम स्वरूपात पाऊस होईल मात्र कोकणात जोरदार सरी बरसतील असे अंदाज आहेत. दुसरीकडे राजधानी दिल्ली मध्ये काल रात्रीपासून तुफान पाऊस सुरु आहे. काही ठिकाणी तर यामुळे पाणी साचल्याचे प्रकार सुद्धा घडत आहेत.

आसाम (Assam Flood Update) मध्ये ब्रह्मपुत्रा नदीला आलेल्या पुरामुळे अवस्था गंभीर होत चालली आहे. नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने सामान्य जीवन विस्कळीत झाले आहे. बहुतांश नागरिकांची घरे पाण्याखाली गेली आहेत.आतापर्यंत पुरामुळे 70 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. 30 जिल्ह्यातील 53 लाखांहून अधिक नागरिकांना याचा फटका बसला आहे. काजीरंगा, टायगर रिझर्व्ह (बोकाहाट) येथे पुरामुळे 96 जनावरांचा मृत्यू झाला आहे.

आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या. 

दरम्यान, कोरोना (Coronavirus Update) च्या बातम्यांकडे सुद्धा आपण लक्ष ठेवून आहोत, देशात आता 10 लाखाच्या पार कोरोना रुग्ण आहेत, तर कोरोनाचा हॉटस्पॉट महाराष्ट्रात 3 लाखाचा रुग्णसंख्येचा टप्पा ओलांडलेला आहे.