ठळक बातम्या

IND W vs IRE W 1st ODI 2025 Live Streaming: वेस्ट इंडिजला लोळवल्यानंतर भारतीय महिला संघ भिडणार आयर्लंडसोबत, पहिला वनडे सामना कधी अन् कुठे पाहणार? जाणून घ्या एका क्लिकवर

Nitin Kurhe

हरमनप्रीतच्या अनुपस्थितीत, सलामीवीर स्मृती मानधना कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळेल, तर अष्टपैलू दीप्ती शर्मा संघाची उपकर्णधार असेल. दुसरीकडे, गॅबी लुईस या मालिकेत आयर्लंडचे नेतृत्व करेल.

Mumbai: मला इंदिरा गांधी खूप कणखर महिला वाटल्या, पण त्या कमकुवत असल्याचं मला कळलं: Kangana Ranaut

Shreya Varke

'इमर्जन्सी'मध्ये इंदिरा गांधींची भूमिका साकारणारी कंगना रणौत म्हणते की, मी माजी पंतप्रधानांना खूप कणखर महिला मानत होते, परंतु सखोल अभ्यासानंतर आता मला वाटते की, ती कमकुवत होती आणि "स्वतःवर विश्वास ठेवत नव्हती". हिमाचल प्रदेशातील मंडी मधून पहिल्यांदाच लोकसभेवर निवडून आलेली कंगना नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असते.

L&T chairman SN Subrahmanyan:'आठवड्यातून 90 तास काम करा', एल अँड टीचे एस एन सुब्रमण्यम नारायणमूर्ती यांच्याही एक पाऊल पुढे

Jyoti Kadam

'आठवड्यातून 70 तास काम करावे' हे इन्फोसिसचे सह-संस्थापक नारायणमूर्ती यांच्या विधानानंतर, एल अँड टीचे अध्यक्ष एसएनसुब्रमण्यम यांनी कर्मचाऱ्यांना आठवड्यातून 90 तास काम करण्याचा सल्ला दिला आहे.

Maharashtra Assembly Elections 2024: महायुतीच्या विजयाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी दाखल केली याचिका

Prashant Joshi

असीम सरोदे, अजिंक्य गायकवाड आणि श्रिया आवळे या वकिलांच्या माध्यमातून दाखल करण्यात आलेल्या याचिकांमध्ये, संबंधित महायुतीच्या उमेदवारांचा निवडणूक विजय रद्द म्हणून घोषित करण्यासाठी निवडणूक आयोगाला निर्देश देण्याची मागणी केली आहे.

Advertisement

Women's Ashes 2025: आजपासून ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमध्ये अ‍ॅशेस मालिका खेळवली जाणार, येथे पहा संपूर्ण वेळापत्रक, संघ, सामन्याची वेळ आणि लाईव्ह स्ट्रीमिंगची माहिती

Amol More

ऑस्ट्रेलिया महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि इंग्लंड महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील अ‍ॅशेस 2024-25 12 जानेवारीपासून सुरू होईल. सुरुवातीला दोन्ही संघांमध्ये तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवली जाईल आणि त्यादरम्यान समान संख्येने टी-20 सामने खेळले जातील.

Himachal Pradesh Paragliding Death: मनालीच्या रायसनमध्ये पॅराग्लायडिंग अपघातात तेलंगणातील पर्यटक ठार, वैमानिक जखमी

Shreya Varke

पॅराग्लायडिंगसारखे साहसी खेळ किती सुरक्षित आहेत, जे थराराचे आश्वासन देतात परंतु बऱ्याचदा गंभीर जोखीम घेऊन येतात? तेलंगणातील ३२ वर्षीय पर्यटक महेश रेड्डी यांचा मनालीजवळ पॅराग्लायडिंग अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याने हिमाचल प्रदेशच्या साहसी पर्यटन क्षेत्रातील सुरक्षेच्या नियमांवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. रायसन गावात रेड्डी यांचे विमान उड्डाण घेतल्यानंतर काही मिनिटांतच जीवघेणा ठरल्याने त्यांचे कुटुंबीय आणि मित्र-मैत्रिणी हादरून गेले.

Buldhana Hair Loss Causes: केस गळती, डोक्याला टक्कल पडण्याचे कारण सापडले; Buldhana Takkal Virus संदर्भात धक्कादायक माहिती

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

बुलढाणा जिल्ह्यात चर्चेत आलेला टक्कल व्हायरस आणि केसगळती प्रकरणात धक्कादायक माहिती पुढे आली आहे. टक्कल प्रभावीत गावांमध्ये पाण्यात क्षार आणि नायट्रेट अधिक प्रमाणावर आहे. त्याचेच हे दुष्परिणाम असल्याची प्राथमिक माहिती आहे.

Afghanistan Team Mentor: अफगाणिस्तानने मोठी खेळी, 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानी दिग्गज खेळाडूला मार्गदर्शक बनवले

Amol More

युनूस खान 19 फेब्रुवारीपासून कराची येथे सुरू होणाऱ्या कंडिशनिंग कॅम्पमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी संघाची तयारी करेल आणि स्पर्धेच्या शेवटपर्यंत संघासोबत राहील. युनूस खान यांनी यापूर्वी 2022 मध्येही अफगाणिस्तान संघासोबत काम केले आहे.

Advertisement

Tamilnadu Road Accident: तामिळनाडूतील राणीपेट येथे झालेल्या बस-ट्रकच्या धडकेत, 4 जण ठार, ३० जखमी

Shreya Varke

तामिळनाडूतील राणीपेट येथे गुरुवारी ट्रक आणि बसची भीषण धडक झाली. या दुर्घटनेत चार जणांचा मृत्यू झाला असून ३० जण जखमी झाले आहेत. सर्व जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मंजुनाथ, कृष्णप्पा, शंकरन आणि सोमशेखरन अशी मृतांची नावे आहेत, अशी माहिती राणीपेट पोलिसांनी दिली. जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यातील तिघांची प्रकृती चिंताजनक आहे.

Japan Population Crisis: घटत्या जन्मदरामुळे जगाच्या नकाशावरून नामशेष होऊ शकतो जपान; तज्ज्ञांनी व्यक्त केली चिंता

Prashant Joshi

नुकतेच जारी करण्यात आलेला अंदाज बालकांच्या लोकसंख्येमध्ये 2.3% ची वार्षिक घट दर्शवितो, ज्यामुळे आगामी वर्षांमध्ये जपानमध्ये घटणाऱ्या संख्येबद्दल चिंता निर्माण झाली आहे. जपानचा जन्मदर 1.20 पर्यंत घसरला आहे, जो 1947 नंतरचा सर्वात कमी आहे.

MLS vs SYS BBL 2024-25 Preview: आज मेलबर्न स्टार्स आणि सिडनी सिक्सर्स यांच्यात रंगणार रोमांचक सामना, हेड टू हेड, पिच रिपोर्ट, मिनी बॅटल आणि लाईव्ह स्ट्रीमिंगसह सर्व माहिती येथे घ्या जाणून

Amol More

Mysore Shocker: नशाकरणे जीवावर बेतले; केकमध्ये वापरण्यात येणारे एसेन्स प्यायल्याने म्हैसूर तुरुंगात 3 कैद्यांचा मृत्यू

Jyoti Kadam

केक बनवण्यासाठी वापरले जाणारे एसेन्स प्यायल्याने म्हैसूर तुरुंगातील तीन कैद्यांचा मृत्यू झाला. बेकरी विभागात काम करणाऱ्या या तिघांनी नशा करण्यासाठी ते प्यायले असावे असा संशय व्यक्त केला जात आहे.

Advertisement

Coffee and Heart Health: सकाळी कॉफी पिल्याने हृदय राहील निरोगी, मृत्यूचा धोकाही होतो कमी; नव्या अभ्यासात मोठा खुलासा

Prashant Joshi

अमेरिकेतील टुलेन युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांनी नुकत्याच केलेल्या एका अभ्यासात दावा केला आहे की, जे लोक सकाळी कॉफी पितात त्यांचा कोणत्याही कारणामुळे मृत्यूचा धोका 16 टक्क्यांनी कमी होतो आणि हृदयविकारामुळे मृत्यूचा धोका 31 टक्क्यांनी कमी होऊ शकतो.

Google Map Mislead: गुगल मॅपच्या भरवशावर बसले अन् पोलिसही अडकले; नागालँडमध्ये स्थानिकांनी रात्रभर पोलिसांना ठेवले ओलीस

Jyoti Kadam

गुगल मॅपची आणखी मोठी एक चूक समोर आली आहे. ताज्या घटनेत आसाम पोलिसांचे १६ सदस्यीय पथक गुगल मॅप्सच्या चुकीच्या निर्देशांमुळे नागालँडच्या मोकोकचुंग जिल्ह्यात अडकले. जिथे स्थानिकांनी त्यांच्यावर हल्ला केला. त्यांना ओलीस ठेवले.

Hockey India League 2024-25: यानसेनच्या हॅटट्रिकमुळे तमिळनाडू ड्रॅगन्सचा रोमांचक विजय; हैदराबाद स्टॉर्मनेही आपला पहिला विजय नोंदवला

Amol More

शेवटच्या 15 मिनिटांत तीन गोल करून ड्रॅगन्सने सामन्याचे चित्र बदलले. ब्लेक गोव्हर्सने हुशारीने जॅनसेनसाठी संधी निर्माण केली आणि त्या खेळाडूने चेंडू गोलमध्ये टाकून स्कोअर 4-4 असा केला आणि त्याची हॅटट्रिक पूर्ण केली.

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेतून 25% लाभार्थी वगळणार? सरकार दरमहा वाचवणार 900 कोटी रुपये? घ्या जाणून

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

Ladki Bahin Yojana Update: लाडकी बहीण योजना लभार्थी असणाऱ्या एकूण महिलांपैकी 25 महिलांना निकषांच्या आधारवर वगळले जाण्याची शक्यता आहे. खास करुन एकाच वेळी अनेक योजनांचा समांतर लाभ घेणाऱ्या महिलांवर ही कारवाई होऊ शकते. घ्या जाणून

Advertisement

Elon Musk Supports Priyanka Chaturvedi: यूके बाल लैंगिक शोषण प्रकरणावर Shiv Sena-UBT खासदार प्रियंका चतुर्वेदींनी पाकिस्तानी लोकांना केले लक्ष्य; Elon Musk यांनी दिले समर्थन

Prashant Joshi

पाकिस्तानी वंशाच्या पुरुषांचा समावेश असलेल्या टोळ्यांच्या बाल लैंगिक शोषण प्रकरणाच्या संदर्भात इंग्लंडच्या विविध भागात’ ‘आशियाई’ या शब्दाच्या वापरावर आक्षेप घेतल्याने वाद निर्माण झाला आहे.

Champions Trophy 2025: चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी भारताला आणखी एक धक्का, बुमराहनंतर आणखी एक स्टार गोलंदाज संघाबाहेर

Amol More

पाचव्या कसोटीपूर्वी वेगवान गोलंदाज आकाश दीपला पाठीची दुखापत झाली होती, याची पुष्टी माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरने केली. शेवटच्या कसोटीत त्याच्या जागी प्रसिद्ध कृष्णाचा समावेश करण्यात आला.

Sri lanka vs Australia Test Series 2025: श्रीलंका विरूद्ध मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाकडून स्टीव्ह स्मिथच्या खांद्यावर नेतृत्वाची धुरा; नॅथन मॅकस्विनीचे पुनरागमन, पॅट कमिन्स संघाबाहेर

Jyoti Kadam

श्रीलंका दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलिया संघाने आपला संघ जाहीर केला आहे. दोन कसोटी सामन्यांच्या या मालिकेत स्टीव्ह स्मिथला संघाचा कर्णधार बनवण्यात आले आहे. तो 7 वर्षांनी ऑस्ट्रेलियन संघाची जबाबदारी घेणार आहे.

Arrest for Snipping Woman's Hair: तरुणीचे केस कापले, दादर येथून एकास अटक

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

Mumbai News: दादर स्थानकावर महाविद्यालयीन विद्यार्थ्याचे केस कापल्याच्या आरोपाखाली जीआरपीने 35 वर्षीय व्यक्तीला अटक केली. 2023 मध्येअशाच प्रकारे घडलेल्या घटनेशी त्याचा संबंध आहे का, तेही पाहिले जात आहे.

Advertisement
Advertisement