ठळक बातम्या
Virat Kohli Spotted At Gateway of India: अलिबागला जाण्यासाठी विराट कोहली पुन्हा एकदा गेटवे ऑफ इंडियावर बोटीतून प्रवास करताना दिसला, पहा व्हिडिओ
Amol Moreविराटचा हा व्हिडिओ त्याच्या चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय बनला आणि गेटवे ऑफ इंडिया येथे त्याच्या उपस्थितीबद्दल ते उत्सुक दिसत होते.
Satta Matka: सट्टेबाजीच्या आहारी जाणं तुम्हांला बनवू शकतं कंगाल; या मोहजाळ्यात अडकण्यापूर्वी जाणून घ्या खास गोष्टी
टीम लेटेस्टलीयश मिळेल या आशेतून अधिक पैसे गमावले जातात. पुढील वेळेस नुकसान भरून काढणारं यश मिळेल या अपेक्षेतूनच व्यक्ती या खेळाच्या आहारी जाते.
Mohammed Shami Nets Practice: दुखापतीनंतर मोहम्मद शमी शानदार कमबॅकसाठी सज्ज, नेटमध्ये केला जोरदार सराव
Amol Moreभारतीय संघ सध्या इंग्लंडविरुद्धच्या पांढऱ्या चेंडूवरील मालिकेच्या तयारीत पूर्णपणे गुंतलेला आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात 22 जानेवारीपासून पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळली जाणार आहे.
Uddhav Thackeray Meets Sharad Pawar: स्थानिक निवडणुकांबाबतच्या महाविकास आघाडीतील मतभेदाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी घेतली शरद पवारांची भेट (Video)
Prashant Joshiविरोधी आघाडीचे शिल्पकार पवार, एमव्हीएमधील अशांतता शांत करण्यासाठी पुढे आले असल्याचे दिसत आहे. आजच्या बैठकीवेळी शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि आमदार आदित्य ठाकरेही उपस्थित होते. बैठक संपल्यानंतर उद्धव ठाकरे मातोश्रीकडे रवाना झाले.
Vinod Kambli Struggles to Walk: विनोद कांबळीला चालताही येत नव्हते; पत्नी अँड्रियाच्या 'त्या' कृतीने जिंकली अनेकांची मने (Watch Video)
Jyoti Kadamवानखेडे स्टेडियमच्या 50 व्या वर्धापन दिनानिमित्त झालेल्या भव्य कार्यक्रमातील विनोद कांबळींचा एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यात त्यांना चालण्यास त्रास होत असताना त्यांच्या पत्नीने त्यांना आधार दिला असा हा व्हिडीओ आहे.
Pune Shocker: लग्नाच्या नावाखाली विवाहित व्यक्तीने केली महिला डॉक्टरची फसवणूक; 10 लाखही उकळले, मानसिक धक्क्यामुळे तरुणीची आत्महत्या
Prashant Joshiअहवालानुसार, पल्लवी पोपट फडतरे असे आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरचे नाव आहे. तिचे वय 25 वर्षे होते. कुलदीप आदिनाथ सावंत असे महिला डॉक्टरची फसवणूक करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी कुलदीप सावंतविरुद्ध पुण्यातील बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
8th Pay Commission: आठवं वेतनआयोग समितीच्या स्थापनेला मंजूरी मिळाल्यानंतर कोविड काळात गोठवलेल्या 18 महिन्यांचा DA मिळण्याचा आशा पल्लवित
Dipali Nevarekarजर सरकारने हा फ्रीझ केलेला डीए/ डीआर रीलीज करण्याचा निर्णय घेतल्यास केंद्र सरकारी लेव्हल-1 श्रेणीतील कर्मचाऱ्यांना 11,880 रुपये ते 37,554 रुपये एवढे DA Arrears मिळू शकते. तर, लेव्हल-13 श्रेणीतील कर्मचाऱ्यांना 1,23,100 रुपये ते 2,15,000 रुपये Arrears मिळण्याचा अंदाज आहे.
Who Is Neeraj Chopra Wife Himani Mor: नीरज चोप्राची पत्नी हिमानी मोर आहे तरी कोण? टेनिस खेळाडूबद्दल घ्या जाणून
Jyoti Kadamभारताचा स्टार भालाफेक पटू नीरज चोप्राने टेनिसपटू हिमानी मोरसोबत लग्न केले आहे. नीरजने त्याच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. नीरजची पत्नी हिमानीबद्दल जाणून घेण्याची अनेकांना इच्छा आहे.
Maharashtra Bus Shortage: मुंबई, पुण्यासह महाराष्ट्रात सार्वजनिक बसेसची गंभीर कमतरता; 44 पैकी 30 शहरांमध्ये अजूनही बस सेवा नाही, राज्यात किमान 24 हजार नवीन गाड्यांची गरज- Reports
Prashant Joshiअहवालानुसार, महाराष्ट्रातील 44 पैकी 30 शहरांमध्ये औपचारिक बस सेवा नाही. उर्वरित 14 शहरांमध्ये बस सेवा अत्यंत मर्यादित आहेत. राज्यात किमान 24 हजार नवीन बसेसची गरज आहे. या बसेसमुळे वाहतूक समस्या तर कमी होईलच शिवाय पर्यावरणावरही सकारात्मक परिणाम होईल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
Elephant Attacked Bike Rider: जंगलात हत्तीचा दुचाकीस्वारावर हल्ला; पहा धक्कादायक व्हिडिओ
Bhakti Aghavएका हत्तीने अचानक एका दुचाकीस्वारावर हल्ला केला. ही घटना शनिवारी घडल्याचे सांगितले जात आहे. आपल्या कुटुंबासह दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या एका व्यक्तीवर जंगलातून येणाऱ्या हत्तीने अचानक हल्ला केला. या घटनेचा एक व्हिडिओ समोर आला आहे.
New Zealand Women vs Nigeria Women T20 Scorecard: महिला टी-20 विश्वचषकात नायजेरियाने रचला इतिहास, न्यूझीलंडला 2 धावांनी हरवून दिला मोठा धक्का
Amol Moreआयसीसी 19 वर्षांखालील महिला टी-20 विश्वचषक 2025 चा 11 वा सामना न्यूझीलंड महिला 19 वर्षांखालील राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि नायजेरिया महिला 19 वर्षांखालील राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यात सारावाक क्रिकेट मैदान, सारावाक येथे खेळवण्यात आला. या सामन्यात नायजेरियाने न्यूझीलंडला 2 धावांनी हरवून इतिहास रचला
Amritsari Kulcha Viral Video: देशी तूपात बुडवलेल्या अमृतसरी कुलचाची क्लिप व्हायरल, लोकांनी व्हिडिओ पाहुन सांगितले कि - 'हृदयविकाराचा झटका येईल'
Shreya Varkeभारत आपल्या जीवंत स्ट्रीट फूड संस्कृतीसाठी ओळखला जातो, जो खाद्यप्रेमींसाठी विविध रोमांचक आणि अद्वितीय संयोजन प्रदान करतो. नुकताच अमृतसरमध्ये एका फेरीवाल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. फूड ब्लॉगर करण दुआने इन्स्टाग्रामवर शेअर केलेला हा व्हिडिओ झपाट्याने व्हायरल झाला आणि खवय्यांच्या आरोग्याची चिंता वाढली. व्हायरल व्हिडिओमध्ये विक्रेते चण्यासोबत कुल्चा सर्व्ह करताना दिसत आहेत, पण प्रेक्षकांना धक्का बसला तो म्हणजे त्यावर ओतलेले देशी तूप टाकल्याचे होते.
Sanjay Roy Gets Life Imprisonment: संजय रॉय ला जन्मठेपेची शिक्षा आणि 50 हजार रुपये दंड; राज्य सरकारला पीडितेच्या कुटुंबाला 17 लाख भरपाई देण्याचे निर्देश
Jyoti Kadamकोलकाता येथील आरजी कर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये झालेल्या प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्येप्रकरणी मुख्य आरोपी संजय रॉयला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. यासोबतच त्याला 50 हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.
Indian Student Shot Dead in US: वॉशिंग्टनमध्ये हैदराबादमधील तरुणाची गोळ्या घालून हत्या
Bhakti Aghavहैदराबादमधील आरके पुरम येथील ग्रीन हिल्स कॉलनी येथील रहिवासी रवितेजा मार्च 2022 मध्ये पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी अमेरिकेत गेला होता. त्याने नुकतेच शिक्षण पूर्ण केले होते आणि नोकरीच्या संधी शोधत असताना त्याच्यावर गोळीबार करण्यात आला.
Emergency Box Office Collection Day 3: इमर्जन्सी'ने बॉक्स ऑफिसवर घातला धुमाकूळ, तीन दिवसांत केला १२ कोटींहून अधिकचा व्यवसाय
Shreya Varkeकंगना रणौतचा 'इमर्जन्सी' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. तीन दिवसांत या चित्रपटाने 12.26 कोटींची कमाई केली आहे. पहिल्या दिवशी 3.11 कोटींचा गल्ला जमवणाऱ्या या चित्रपटाने दुसऱ्या दिवशी 4.28 कोटी आणि तिसऱ्या दिवशी 4.87 कोटींची कमाई केली. मात्र आजपासून या चित्रपटासाठी कठीण दिवस सुरू होणार असून अक्षय कुमारचा स्काय फोर्स देखील २४ तारखेला प्रदर्शित होत आहे.
Maha Kumbh 2025: लोकप्रियतेला कंटाळलेले महाकुंभाचे चार व्हायरल चेहरे; कॅमेऱ्यासमोर व्यक्त केला संताप (पाहा व्हिडिओ)
Shreya Varkeमहाकुंभात आलेले अनेक चेहरे सोशल मीडियावर चर्चेत आले आहेत. सुरुवातीला ते युट्यूबर्स आणि मीडियावर व्हायरल झाले होते, पण आता त्यांना त्याचा कंटाळा आला आहे. त्यामुळे ते कॅमेरे टाळत आहेत. आपल्या प्रसिद्धीने त्रस्त झालेले हे व्हायरल लोक आता युट्यूबर्स आणि पत्रकारांवर संताप व्यक्त करत आहेत. त्यापैकी पहिले नाव म्हणजे साध्वी हर्षा रिचारिया. आखाड्याच्या कॅन्टोन्मेंटमधील रथावर हर्षा निरंजनी दिसल्या, त्यानंतर ती सोशल मीडियावर चर्चेत आली.
Sharon Raj Murder: विष देऊन प्रियकराची हत्या; केरळ कोर्टाने प्रेयसीला सुनावली मृत्युदंडाची शिक्षा
Jyoti Kadamशुक्रवारी न्यायालयाने 26 वर्षीय ग्रिष्माला दोषी ठरवले होते. तसेच ग्रिष्माचा काका निर्मल कुमार यांनाही पुरावे नष्ट करणे आणि कट रचल्याबद्दल दोषी ठरवण्यात आले आहे.
Yogesh Mahajan Passes Away: अभिनेता योगेश महाजन यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन; मराठी चित्रपटांमध्ये केलं होतं काम
Bhakti Aghavयोगेश महाजन यांच्या अंतिम यात्रेसंदर्भातील माहिती महाजन कुटुंबाने शेअर केली आहे. त्यांनी लिहिले की, 'आपल्या प्रिय योगेश महाजन यांचे अचानक निधन झाले हे कळवताना आम्हाला खूप दुःख होत आहे.' 19 जानेवारी 2025 रोजी हृदयविकाराच्या झटक्याने योगेश यांचे निधन झाले. आमच्या संपूर्ण कुटुंबासाठी, नातेवाईकांसाठी आणि मित्रांसाठी हा एक भयानक धक्का आहे.
8th Pay Commission Pension: 8 व्या वेतन आयोगानुसार पेन्शनधारकांना किती वाढीची शक्यता? UPS मध्ये होणार बदल? घ्या जाणून
Prashant Joshiही वाढ अंतिम फिटमेंट घटकावर अवलंबून असेल, ज्याबाबत अजूनतरी अधिकृत घोषणा झाली नाही. दरम्यान, केंद्र सरकारच्या 50 लाख कर्मचाऱ्यांना 8व्या वेतन आयोगाचा थेट फायदा होणार आहे. त्याचबरोबर 65 लाख पेन्शनधारकांनाही याचा लाभ मिळणार आहे. याशिवाय दिल्ली सरकारचे 4 लाख कर्मचारीही लाभाच्या कक्षेत येतील.