Yogesh Mahajan Passes Away: अभिनेता योगेश महाजन यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन; मराठी चित्रपटांमध्ये केलं होतं काम
योगेश महाजन यांच्या अंतिम यात्रेसंदर्भातील माहिती महाजन कुटुंबाने शेअर केली आहे. त्यांनी लिहिले की, 'आपल्या प्रिय योगेश महाजन यांचे अचानक निधन झाले हे कळवताना आम्हाला खूप दुःख होत आहे.' 19 जानेवारी 2025 रोजी हृदयविकाराच्या झटक्याने योगेश यांचे निधन झाले. आमच्या संपूर्ण कुटुंबासाठी, नातेवाईकांसाठी आणि मित्रांसाठी हा एक भयानक धक्का आहे.
Yogesh Mahajan Passes Away: मराठी चित्रपटांमध्ये अभिनय करून सर्वांची मन जिंकणारा अभिनेता योगेश महाजनचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. योगेश महाजन यांच्या अंतिम यात्रेसंदर्भातील माहिती महाजन कुटुंबाने शेअर केली आहे. त्यांनी लिहिले की, 'आपल्या प्रिय योगेश महाजन यांचे अचानक निधन झाले हे कळवताना आम्हाला खूप दुःख होत आहे.' 19 जानेवारी 2025 रोजी हृदयविकाराच्या झटक्याने योगेश यांचे निधन झाले. आमच्या संपूर्ण कुटुंबासाठी, नातेवाईकांसाठी आणि मित्रांसाठी हा एक भयानक धक्का आहे.
दिवंगत अभिनेते योगेश महाजन यांची अंतिम यात्रा आज सोमवार, 20 जानेवारी 2025 रोजी सकाळी 11 वाजता बोरिवली पश्चिम मुंबईतील प्रगती हायस्कूलजवळील गोरारी-2 स्मशानभूमीतून काढण्यात येईल. मराठी चित्रपटांव्यतिरिक्त, योगेश महाजन यांनी अनेक हिंदी पौराणिक मालिकांमधून प्रेक्षकांच्या हृदयात एक खास स्थान निर्माण केले. योगेश 'शिवशक्ती-तप, त्याग, तांडव' या हिंदी मालिकेच्या चित्रीकरणासाठी उमरगावला होता. या मालिकेत त्यांनी शुक्राचार्य ही भूमिका साकारली होती. त्यांच्या अचानक मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका असल्याचे सांगण्यात येत आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, शनिवारी संध्याकाळी 'शिवशक्ती-तप, त्याग, तांडव'चे शूटिंग संपताच योगेशची तब्येत बिघडू लागली. म्हणून तो डॉक्टरकडे गेला आणि औषध घेतले. तो रात्री हॉटेलच्या खोलीत झोपला, पण रविवारी सकाळी शूटिंगसाठी सेटवर आला नाही. यानंतर, त्याच्या मालिकेतील अनेक सदस्यांनी त्याच्याशी फोनवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण त्याने फोन उचलला नाही, जेव्हा त्याच्या खोलीचा दरवाजा उघडला तेव्हा तो बेडवर होता. तिथेच त्यांने शेवटचा श्वास घेतला. (हेही वाचा -Kannappa: येत्या २५ एप्रिलरोजी प्रदर्शित होणाऱ्या 'कानप्पा' या आगामी चित्रपटात अक्षय कुमार साकारणार भगवान शंकराची भूमिका)
योगेश जळगावचा रहिवासी -
जळगाव येथील रहिवासी योगेशचा जन्म सप्टेंबर 1976 मध्ये एका शेतकरी कुटुंबात झाला. अभिनयात कोणीही गॉडफादर नसतानाही, योगेशने आपल्या मेहनतीच्या आणि समर्पणाच्या जोरावर मराठी, हिंदी आणि भोजपुरी चित्रपटसृष्टीत आपला ठसा उमटवला. मनोरंजन क्षेत्रात येण्यापूर्वी तो भारतीय सैन्यात होता. त्याने भोजपुरी चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली. 'मुंबईचे शहाणे', 'संसाराची माया' अशा अनेक मराठी चित्रपटांमधून त्यांनी प्रेक्षकांच्या मनात एक खास स्थान निर्माण केले आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)