पंजशीरच्या धरतीवर तालिबान्यांचा कब्जा करत फडकवला आपला झेंडा, NRF च्या चीफ कमांडरचा केला खात्मा

अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) तालिबान्यांना मोठी टक्कर देणाऱ्या पंजशीर प्रांताला सुद्धा पराभव स्विकारावा लागला आहे. कारण पंजशीर येथून समोर आलेल्या फोटोंमध्ये असे सांगितले जात आहे की, तालिबान्यांनी यावर आपला ताबा मिळवला आहे.

Taliban (Photo Credits: Getty Images)

अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) तालिबान्यांना मोठी टक्कर देणाऱ्या पंजशीर प्रांताला सुद्धा पराभव स्विकारावा लागला आहे. कारण पंजशीर येथून समोर आलेल्या फोटोंमध्ये असे सांगितले जात आहे की, तालिबान्यांनी यावर आपला ताबा मिळवला आहे. एका फोटोत असे दिसून येते की, पंजशीर मध्ये तालिबान्यांनी आपला झेंडा सुद्धा फडकवला आहे. दुसऱ्या बाजूला तालिबानी हे पंजशीर गव्हर्नर ऑफिसच्या बाहेर उभे आहेत.(Afghanistan: तालिबानी दहशतवाद्यांकडून गर्भवती महिला पोलिसावर गोळीबार, नातेवाईकांसमोर केली हत्या)

अफगाणचे उपराष्ट्रपती अमरुल्लाह सालेह यांचे निकटवर्तीय यांनी आजतक सोबत बातचीत करताना म्हटले की, तालिबान्यांचा दावा खोटा आहे. रेजिस्टेंटस फोर्स डोंगरांमधून पंजशीरची सुरक्षा करत आहे. दावा केला आहे की, पाकिस्तानी एअरफोर्स सुद्धा त्यांच्यावर हल्ला करत आहे.

तर तालिबान्यांकडून दावा केला जात आहे की, रजिस्टेंस फोर्स (नॉर्दन अलायंस) चे चीफ कमांडर सालेह मोहम्मद यांचा सुद्धा खात्मा करण्यात आला आहे, तालिबानचे प्रवक्ते जबीहुल्लाह मुजाहिद यांनी असे म्हटले की, अफगाणिस्तानच्या पंजशीर प्रांत पूर्णपणे जिंकला आहे. पंजशीर हा अखेरचा प्रांत होता ज्यावर तालिबान्यांकडून कब्जा करण्यात आलेला नव्हता. यापूर्वी 15 ऑगस्टला काबुलवर आपला ताबा मिळवत तालिबान्यांनी संपूर्ण अफगाणिस्तावर आपले वर्चस्व स्थापन केले.(Afghanistan Crisis: अराजक अफगानिस्तान, सत्तातूर तालिबान; महागाई, रिकामी तिजोरी नव्या सत्ताधीशांसमोर प्रचंड आव्हाने)

रविवाराच्या रात्री पासूनच पंजशीर कमकूवत होऊ लागला होता. रेजिस्टेंस फ्रंटचे प्रवक्ते आणि तालिबानचा मुकाबला करणाऱ्या अहमद मसूदचा जवळचा सहकारी फहीम दष्टी याचाही रविवारी मृत्यू झाला. प्राप्त झालेल्या माहितीनुसार, अफगाणनचे उपराष्ट्रपती अमरुल्लाह सालेह सध्या अज्ञात ठिकाणी सुरक्षित आहेत. तर असद महमूद गेल्या तीन वर्षांपासून ताजिकिस्तानात आहे.

Share Now
Advertisement


संबंधित बातम्या

पंजशीरच्या धरतीवर तालिबान्यांचा कब्जा करत फडकवला आपला झेंडा, NRF च्या चीफ कमांडरचा केला खात्मा

Xiaomi Black Friday Sale 2020 अंतर्गत स्मार्टफोन आणि अॅक्सेसरीज वर 10,000 रुपयांपर्यंत डिस्काऊंट; Amazon India वरुन करु शकता खरेदी

World's Most Walkable City च्या यादी मध्ये मुंबई सर्वात खालच्या दहा शहरांमध्ये; अभ्यासातून समोर आला निष्कर्ष

World's First AI Doctor Clinic: सौदी अरेबियामध्ये सुरु झाले जगातील पहिले एआय डॉक्टर क्लिनिक; जाणून घ्या कसे करते कार्य आणि प्रक्रिया

Advertisement

COVID-19 Surge 2025: कोरोना महामारीनंतर ओमिक्रॉन सबव्हेरियंट JN.1 संसर्गात वाढ, अशिया खंडात चिंतेचे वातावरण

Joe Biden Prostate Cancer: जो बायडन यांच्या प्रोस्टेट कॅन्सर निदान मध्ये Gleason Score 9 म्हणजे नेमकं काय? पहा काय असतो हा Gleason Score

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement