Oxford-AstraZeneca च्या कोरोना लसीच्या वापरावर 9 देशांकडून बंदी, ब्लड क्लॉटिंगच्या तक्रारीमुळे केली कारवाई
यापूर्वी काही युरोपीय देशात रक्ताच्या गुठळ्या निर्माण होण्याच्या भीतीने या लसीवर बंदी घालण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
डेनमार्क, नॉर्वे नंतर आता थायलंडने सुद्धा ऑक्सफोर्ड-एस्ट्राजेनेका च्या कोरोना व्हायरसवरील लसीचा वापर करण्यावर बंदी घातली आहे. यापूर्वी काही युरोपीय देशात रक्ताच्या गुठळ्या निर्माण होण्याच्या भीतीने या लसीवर बंदी घालण्यात आल्याचे सांगितले जात आहे. रिपोर्ट्सनुसार, एस्ट्राजेनेका वॅक्सीन दिल्यानंतर काही लोकांमध्ये त्याचे गंभीर परिणाम दिसून आले. त्यांच्या शरीरात रक्ताच्या गुठळ्या निर्माण होण्यास सुरुवात झाल्याने हे पाऊल उचलले गेले आहे.(COVID-19 Vaccine: ब्रिटेनला Serum Institute of India ने बनविलेल्या AstraZeneca लसीचे 1 कोटी डोस मिळणार)
थायलंडचे पंतप्रधान प्रयाण चान ओ-चा ने ऑक्सफोर्ड एस्ट्राजेनेका लसीच्या वापरासाठी दिली गेलेली परवानगी रद्द केली आहे. 11 मार्चला डेनमार्क मध्ये आरोग्य अधिकाऱ्यांनी असे म्हटले की, अस्थाई रुपात एस्ट्राजेनेका कोविड19 लसीचा वापर आम्ही निलंबित करत आहोत. खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेत असल्याचे ही त्यांनी स्पष्ट केले.
थायलंड नौवा देशाने एस्ट्राजेनेका लसीवर बंदी घातली आहे. या व्यतिरिक्त डेनमार्क, नॉर्वे, ऑस्ट्रिया, एस्टोनिया, लातविया, लिथुआनिया, लक्जमबर्ग आणि आइसलँड सारख्या देशांनी एस्ट्रादेनेका लसीवर प्रतिबंध घातले आहेत.(Coronavirus विरुद्धच्या लढाईमधील प्रयत्नांसाठी भारत ठरला 'Global Leader'; United Nations ने केले कौतुक)
बीबीसीच्या वृत्तानुसार, आता पर्यंत 5 मिलियन युरोपीय नागरिकांनी या लसीचे डोस घेतले आहेत. ज्यामध्ये जवळजवळ 30 लोकांनी रक्ताच्या गुठळ्या निर्माण झाल्याची तक्रार केली आहे. तर डेनमार्क मध्ये कोरोनाची लस घेतल्यानंतर 60 वर्षीय महिलेचा मृत्यु सुद्धा झाला आहे. यामागील कारण तिच्या शरीरात सुद्धा रक्ताच्या गुठळ्या निर्माण झाल्या होत्या. त्यानंतर डेनमार्कने 14 दिवसांसाठी या लसीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला.
याच दरम्यान अशी बातमी सुद्धा समोर येत आहे की, ऑक्सफोर्ड एस्ट्राजेनेका कोविड लसीची चाचणी पहिल्या वेळेस 6 ते 17 वयोगटातील मुलांवर केली जाणार आहे. युरोपीय युनियनचे औषध नियमक युरोपीय मेडिसिन एजेंसीने दावा केला आहे की, लसीचे फायदे यामुळे होणाऱ्या धोक्यापेक्षा अधिक आहेत.
या प्रकरणी एस्ट्राजेनेका यांनी असे म्हटले आहे की, आमच्या लसीची गुणवत्ता उत्तमच असेल यासाठी आम्ही प्रयत्न केला असून त्यात कोणताच दोष नाही. तसेच लस तयार करण्यासाठी आम्ही सर्व नियमांचे सुद्धा पालन केले आहे. लसीमुळे कोणत्या प्रकारचे गंभीर परिणाम झाल्याची पुष्टी मिळालेली नाही. डेनमार्क आणि ऑस्ट्रिया मध्ये झालेल्या परिणामांमुळे आमची टीम तेथील अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत. यामागील योग्य कारणे शोधून काढण्यास आमची टीम संपूर्ण मदत करणार आहे.