Sex Covid-19 Pandemic Condoms: कोरोना महामारीत कंडोम कंपन्यांना धक्का, जगातील सर्वात कंडोम उत्पादन बनवणाऱ्या कंपनीच्या विक्रीत 40 टक्क्यांनी घट
Photo Credit: Facebook

कोरोना महामारीच्या काळात विक्री वाढवण्याच्या आशेवर असलेल्या कंडोम कंपन्यांना आता मोठा धक्का बसला आहे. गेल्या दोन वर्षांत जगातील सर्वात कंडोम उत्पादन बनवणाऱ्या कंपनीच्या विक्रीत 40 टक्क्यांनी घट झाली आहे. कंपनीच्या अंदाजानुसार, जगभरातील लाॅकडाउन मध्ये कंडोमचे उत्पादन वाढेल असे वाटले होते पण असे काही न होतो कंपनीचा अंदाज चुकीचा ठरला आहे. लोक घरात राहूनही कंडोम वापरून सेक्स करण्याच्या घटनांमध्येय वाढच झालेली नाही यामुळे कंपन्यांचे पूर्वीचे अंदाज चुकीचे ठरवुन त्यांना आता तोटा सहन करावा लागत आहे. Carex BHD चे मुख्य कार्यकारी अधिकारी गोह मिया कियाट यांनी ही माहिती दिली आहे. निक्केई एशियाच्या अहवालानुसार, कोरोनाच्या काळात लैंगिक आरोग्य केंद्रे यांसारखी हॉटेल्स आणि गैर-आवश्यक दवाखाने बंद असल्यामुळे आणि सरकारच्या कंडोम प्रचार कार्यक्रमात घट झाल्यामुळे Carex कंडोमच्या विक्रीत घट झाली आहे. Carex ही मलेशियन कंपनी आहे जी जगात 5 पैकी 1 कंडोम बनवते.

कंडोम ऐवजी वैद्यकीय ग्‍लव्‍स बनवणारी कंपनी

Carex आता कंडोमऐवजी वैद्यकीय ग्लव्हस बनवत आहे, ज्यांना कोरोनाच्या काळात जगभरातून जास्त मागणी आहे. गोह म्हणाले की त्यांचा ग्लव्हस बनवण्याचा कारखाना या वर्षाच्या मध्यापर्यंत थायलंडमध्ये सुरू होणार आहे. यापूर्वी, Carexचा अंदाज होता की कोरोनाच्या काळात कंडोमची विक्री 'दुहेरी अंकांनी' वाढू शकते. ते म्हणाले होते की सरकार लॉकडाऊन लादत आहे आणि लोकांना घरातच राहावे लागत आहे. (हे ही वाचा Historical Experiment: मानवीश शरीरात डुकराचे हृदय, अमेरिकेतील डॉक्टरांकडून पहिला प्रयोग यशस्वी)

मलेशियन कंपनी ड्युरेक्स सारख्या ब्रँडचे कंडोम बनवते. एवढेच नाही तर कंपनी अनेक फ्लेवर्ड कंडोम बनवते जी तिची खासियत आहे. Carex दरवर्षी 5 अब्ज पेक्षा जास्त कंडोम तयार करते आणि जगभरातील 140 देशांमध्ये निर्यात केले जाते. विक्रीतील घसरणीचा परिणाम म्हणजे Carexचा शेअरही गेल्या दोन वर्षांत 18 टक्क्यांनी घसरला आहे. मलेशियाचा बेंचमार्क स्टॉक इंडेक्सही 3.1 टक्क्यांनी घसरला.