Close
Advertisement
 
सोमवार, फेब्रुवारी 10, 2025
ताज्या बातम्या
4 minutes ago

Viral Video: रीलसाठी तरुणाने केला जीवघेणा स्टंट! पुढे जे झाले ते पाहून बसेल धक्का, येथे पाहा व्हिडीओ

Videos Shreya Varke | Feb 09, 2025 02:43 PM IST
A+
A-

Viral Video: तरुणांमध्ये रील बनवण्याची क्रेझ सध्या कायम आहे. रील बनवून लाईक्स आणि व्ह्यूज मिळवण्यासाठी लोक आपला जीव धोक्यात घालण्यास घाबरत नाही. अशी अनेक प्रकरणे उघडकीस आली ज्यात लोकांना आपला जीव गमवावा लागला आणि अनेकांवर पोलीस कारवाई झाली, मात्र त्यानंतरही लोक रिलसाठी जीव धोक्यात घालतांना दिसत आहे. रील बनवण्यासाठी आणि व्ह्यूज मिळवण्यासाठी लोक काहीही करत आहेत. दरम्यान, असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता की, एक युवक एनएच 344 च्या हायवेवरील साइनबोर्डवर चढतो. या फलकाची उंची खूप जास्त आहे, तेथून खाली पडून जीव जाण्याची शक्यताही अधिक आहे. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, तरुण वर चढला असून त्याचे मित्र  त्याला वर चढलेला पाहून आनंदित होत आहे. हा व्हिडिओ @bstvlive नावाच्या हँडलने 'X' सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. दरम्यान, हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. दरम्यान, सोशल मीडियावर अनेक जण कारवाईची मागणी करत आहेत. हेही वाचा: Ghaziabad Shocker: फोन उचलला नाही म्हणून झोमॅटो डिलिव्हरी बॉयने ग्राहकाला केली मारहाण, व्हिडीओ व्हायरल

येथे पाहा, तरुणाचा व्हायरल व्हिडीओ 

हायवेवरील बोर्डवर चढून तरुणाने बनवली रिल 

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. उत्तर प्रदेशमध्येच हायवेच्या साइन बोर्डवर चढून व्हिडिओ रील बनवण्याचे प्रकरण आधीही समोर आले आहे. पोलिसांनी अनेकांवर कारवाई ही केली होती.

RELATED VIDEOS