WhatsApp युजर्ससाठी Pegasus स्पायवेयरचा मोठा धोका, जाणून घ्या कशा पद्धतीने केली जातेय हेरगिरी
व्हॉट्सअॅपचा असा आरोप आहे की, पेगाससच्या माध्यमातून व्हॉट्सअॅपच्या युजर्सची हेरगिरी केली जात होती.
गेल्या काही दिवसांपासुन व्हॉट्सअॅप युजर्सची हेरगिरी आणि Pegasus स्पायवेयर संबंधित गोष्टी समोर येत आहेत. व्हॉट्सअॅपचा असा आरोप आहे की, पेगाससच्या माध्यमातून व्हॉट्सअॅपच्या युजर्सची हेरगिरी केली जात होती. हे एक गंभीर प्रकरण असून त्यानुसार थेट युजर्सच्या प्रायव्हसी सबंधित नियमांचे उल्लघंटन केले जात आहे. पेगासस बाबत युजर्सच्या मनात भीती निर्माण झाली आहे. तर जाणून घ्या पेगासस कशा पद्धतीने युजर्ससाठी धोकादायक आहे. त्याचसोबत यापासून तुम्ही कसे वाचू शकता हे अधिक जाणून घ्या.
स्पायवेयर पेगाससच्या पहिल्या वर्जनमध्ये हॅकिंगसाठी वायरसला एका लिंकच्या माध्यमातून एसएमएस किंवा व्हॉट्सअॅप मेसेज पाठवला जात होता. त्या लिंकवर केल्यानंतर युजर्सचा डिवाइस हॅक केला जात होता. पेगाससचे लेटेस्ट वर्जन त्यापेक्षा ही अधिक खतरनाक आहे. आता हे फक्त एका मिस्डकॉल द्वारे युजर्सचा फोन हॅक केला जाऊ शकतो.
पेगासस आल्यानंतर व्हॉट्सअॅपच्या अॅड-टू-अॅड एनक्रिप्शन बाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. यामुळेच व्हॉट्सअॅप सुरक्षित असल्याचे मानले जात होते. कारण त्यानुसार कोणतीही थर्ट पार्टी एनकोडेड मेसेज पाहू सुद्धा शकत नव्हती. मात्र पेगाससने यावर सुद्धा तोडगा काढला. त्यामुळेच हे मेसेज डिकोट होऊन युजर्सच्या फोनमध्ये आल्यानंतर अटॅचमेंटसह पेगाससच्या माध्यमातून सहजपणे मॉनिटरिंग सर्वरवर अपलोड केला जाऊ शकतो.(हॅकिंग पासून वाचण्यासाठी Google कडून क्रोम ब्राउडजर अपडेट करण्याचा सल्ला)
त्यामुळे जर तुमच्या मोबाईलवर पेगासस कडून हल्ला करण्यात आल्याचा संशय आल्यास सोशल मीडियावरील सर्व पासवर्ड बदलावे. स्पायवेयर पासून बचाव करण्यासाठी केवळ डिवाइस बदलणे हा पर्याय आहे. नाहीतर तर लॉगइन आयडीची सुद्धा माहिती जमा केली जाते. पेगाससच्या माध्यमातून 20 देशातील 1400 लोकांची हेरगिरी करण्यात आली आहे. त्यामध्ये 20 भारतीय सुद्धा सहभागी आहेत. ही हेरगिरि 20 एप्रिल ते 10 मे दरम्यान करण्यात आली आहे. त्यामध्ये शासकीय, सैन्य अधिकारी, विरोधी नेते आणि समाजिक कार्यकर्त्यांवर निशाणा साधला होता.