Rohit Sharma Stats Against England: टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये इंग्लंडविरुद्ध रोहित शर्माचा असा आहे विक्रम, 'हिट मॅन'च्या आकडेवारीवर एक नजर

आता दोन्ही संघांमध्ये हायव्होल्टेज सामना होणार आहे.

Rohit Sharma (Photo Credit - X)

IND vs ENG ICC T20 WC 2024 Semi-Final 2: टी-20 विश्वचषक 2024 च्या (T20 World Cup 2024) दुसऱ्या उपांत्य फेरीत सामना आज भारत आणि इंग्लंडमध्ये (IND vs ENG) होणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजल्यापासून गयाना येथील प्रॉव्हिडन्स स्टेडियमवर हा सामना खेळवला जाईल. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखालील भारतीय संघाने ऑस्ट्रेलियावर 24 धावांनी दणदणीत विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे, तर इंग्लंड संघाने अमेरिकेला एकतर्फी लढतीत पराभूत करून उपांत्य फेरीचे तिकीट निश्चित केले आहे. आता दोन्ही संघांमध्ये हायव्होल्टेज सामना होणार आहे. टी-20 विश्वचषक 2022 मध्ये, इंग्लंडने उपांत्य फेरीत भारताचा 10 गडी राखून पराभव केला. आता भारतीय संघाला त्या पराभवाचा बदल घेवून फायनलमध्ये प्रवेश कारायचा आहे.

रोहित शर्माने इंग्लंडविरुद्ध 35 च्या सरासरीने केल्या आहेत धावा 

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने इंग्लंडविरुद्ध चांगली कामगिरी केली आहे. रोहित शर्माने आतापर्यंत इंग्लंडविरुद्ध 15 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. ज्याच्या 14 डावांमध्ये रोहित शर्माने 34.16 च्या सरासरीने आणि 138.98 च्या स्ट्राईक रेटने 410 धावा केल्या आहेत. दरम्यान, रोहित शर्माने 1 शतक आणि 2 अर्धशतकं झळकावली आहेत. रोहित शर्माची सर्वोच्च धावसंख्या नाबाद 100 आहे. रोहित शर्मा हा विराट कोहली (639) नंतर इंग्लंडमध्ये सर्वाधिक धावा करणारा दुसरा भारतीय फलंदाज आहे.

टी-20 विश्वचषकात रोहित शर्माची इंग्लंडविरुद्धची अशी आहे कामगिरी 

आयसीसी टी-20 वर्ल्ड कपमध्ये रोहित शर्माने इंग्लंडविरुद्ध 3 डावात 45.50 च्या सरासरीने आणि 131.88 च्या स्ट्राइक रेटने 91 धावा केल्या आहेत. 2009 च्या मोसमात रोहित शर्माने 8 चेंडूत 9 धावा केल्या होत्या. यानंतर 2012 साली रोहित शर्माने 33 चेंडूंत 5 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 55 धावा केल्या होत्या. त्याच वेळी, 2022 च्या हंगामात रोहित शर्माने 28 चेंडूत 4 चौकारांच्या मदतीने 27 धावा केल्या होत्या. (हे देखील वाचा: Virat Kohli Stats Against England: टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये इंग्लंडविरुद्ध विराट कोहलीचा असा आहे रेकॉर्ड, 'रन मशीन'च्या आकडेवारीवर एक नजर)

इंग्लंडच्या प्रमुख गोलंदाजांविरुद्ध रोहित शर्माची कामगिरी

रोहित शर्माने इंग्लंडचा महान वेगवान गोलंदाज ख्रिस जॉर्डनविरुद्ध 4 डावात 33 चेंडूंचा सामना करत 54 धावा केल्या आहेत. या काळात रोहित शर्मा एकदाच बाद झाला आहे. आदिल रशीदविरुद्ध रोहित शर्माने 49 चेंडूत 60 धावा केल्या आहेत. आदिल रशीदने रोहित शर्माला एकदाच बाद केले आहे. या दोघांशिवाय रोहित शर्माने जोफ्रा आर्चरविरुद्ध 15 चेंडूत 14 धावा केल्या आहेत. दरम्यान, जोफ्रा आर्चरने एकदा रोहित शर्माची विकेट घेतली आहे.

सध्याच्या टी-20 विश्वचषकात रोहित शर्माने आतापर्यंत 2 अर्धशतके झळकावली आहेत

या टी-20 विश्वचषकात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने 6 डावात 38.20 च्या सरासरीने आणि 159.16 च्या स्ट्राईक रेटने 191 धावा केल्या आहेत. दरम्यान, रोहित शर्माने 2 अर्धशतके झळकावली आहेत. रोहित शर्माने आयर्लंडविरुद्ध 37 चेंडूत 4 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने नाबाद 52 धावा केल्या होत्या. रोहित शर्माने आपल्या शेवटच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध अवघ्या 41 चेंडूत 92 धावांची तुफानी खेळी केली होती.

रोहित शर्मा टी-20 विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारा दुसरा खेळाडू

रोहित शर्मा हा एक असा खेळाडू आहे ज्याने आयसीसी टी-20 विश्वचषकाच्या सर्व हंगामात भाग घेतला आहे. रोहित शर्माने आतापर्यंत 45 सामन्यांत 33.18 च्या सरासरीने 1,154 धावा केल्या आहेत. या कालावधीत रोहित शर्माच्या बॅटने 11 अर्धशतकेही झळकावली आहेत. रोहित शर्माची या स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्या 92 धावांची आहे. रोहित शर्मा सध्या टी-20 विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारा दुसऱ्या क्रमांकावर आहे. आयसीसी टी-20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा अनुभवी फलंदाज विराट कोहलीने 33 सामन्यांमध्ये 60.35 च्या सरासरीने 1,207 धावा केल्या आहेत.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif