LSG vs PBKS, IPL 2024 Head to Head: चुरशीच्या लढतीत शिखर-राहुल आमनेसामने, जाणून घ्या आकडेवारीत कोणाचे आहे वर्चस्व
या मोसमात लखनौने आतापर्यंत फक्त एकच सामना खेळला आहे, ज्यामध्ये त्याला राजस्थान रॉयल्सविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्याचवेळी पंजाब किंग्जने दिल्ली कॅपिटल्सचा पराभव करून स्पर्धेची सुरुवात केली, पण त्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने त्यांच्या जबड्यातून विजय हिसकावून घेतला.
LSG vs PBKS, IPL 2024: इंडियन प्रीमियर लीग (IPL 2024) चा 11 वा सामना आज म्हणजेच शनिवारी लखनौ येथील भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी एकना क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. हा सामना यजमान लखनौ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज (PBKS vs LSG) यांच्यात होणार आहे. लखनौ अजूनही या मोसमातील पहिला विजय शोधत आहे. या मोसमात लखनौने आतापर्यंत फक्त एकच सामना खेळला आहे, ज्यामध्ये त्याला राजस्थान रॉयल्सविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्याचवेळी पंजाब किंग्जने दिल्ली कॅपिटल्सचा पराभव करून स्पर्धेची सुरुवात केली, पण त्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने त्यांच्या जबड्यातून विजय हिसकावून घेतला. (हे देखील वाचा: LSG vs PBKS, IPL 2024 Live Streaming: लखनौ सुपर जायंट्स पहिल्या विजयाच्या शोधात, पंजाबशी होणार लढत; एका क्लिकवर येथे पाहा लाइव्ह)
पाहा दोन्ही संघांची हेड टू हेड आकडेवारी
आयपीएलमध्ये लखनौ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात आतापर्यंत फक्त तीन सामने झाले आहेत. यामध्ये लखनौच्या नवाबांचा वरचष्मा राहिला आहे. लखनौच्या संघाने आतापर्यंत आयपीएलमध्ये पंजाबविरुद्ध तीनपैकी दोन सामने जिंकले असून एका सामन्यात पंजाबला विजय मिळाला आहे. लखनौच्या भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी एकना क्रिकेट स्टेडियमवर लखनौ सुपर जायंट्सने आतापर्यंत सात सामने खेळले आहेत, त्यापैकी तीन जिंकले आहेत आणि तीन हरले आहेत तर एका सामन्याचा निकाल लागला नाही. पंजाबने या मैदानावर आतापर्यंत केवळ एकच सामना खेळला असून तो जिंकला आहे.
पाहा दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग इलेव्हन
लखनौ सुपर जायंट्सची संभाव्य प्लेइंग इलेव्हन: क्विंटन डी कॉक, केएल राहुल (कर्णधार), देवदत्त पडिक्कल, आयुष बडोनी, निकोलस पूरन, मार्कस स्टॉइनिस, क्रुणाल पंड्या, रवी बिश्नोई, मोहम्मद खान, नवीन-उल-हक आणि यश ठाकूर.
पंजाब किंग्जची संभाव्य प्लेइंग इलेव्हन: शिखर धवन (कर्णधार), जॉनी बेअरस्टो, प्रभसिमरन सिंग, सॅम कुरान, जितेश शर्मा, लियाम लिव्हिंगस्टोन, शशांक सिंग, हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, कागिसो रबाडा, राहुल चहर.