India’s Squad for NZ ODI & T20 Series: न्यूझीलंड विरुद्धच्या टी-20 आणि वनडे मालिकेसाठी बीसीसीआयकडून टीम इंडियाची घोषणा, पृथ्वी शॉचे पुनरागमन
त्याचबरोबर काही नव्या चेहऱ्यांचा संघात समावेश करण्यात आला आहे.
India’s Squad for NZ ODI & T20: भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 आणि वनडे मालिकेसाठी शुक्रवारी रात्री भारतीय संघाची घोषणा (Team India Squad) करण्यात आली. या संघात अनेक मोठे बदल करण्यात आले आहेत. बीसीसीआयच्या (BCCI) कठोर निर्णयानंतर काही खेळाडूंना संघातून वगळण्यात आले आहे. त्याचबरोबर काही नव्या चेहऱ्यांचा संघात समावेश करण्यात आला आहे. तसेच न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी रोहित शर्मा आणि विराट कोहलीचाही संघात समावेश करण्यात आलेला नाही. या दोन्ही खेळाडूंचा वनडे संघात समावेश करण्यात आला असला तरी. या मालिकेसाठी हार्दिक पांड्याला संघाचा कर्णधार बनवण्यात आले आहे. तर रोहित शर्मा वनडे मालिकेसाठी भारतीय संघाचा कर्णधार असणार आहे. (हे देखील वाचा: India Squad for Australia Test Series: ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर, रवींद्र जडेजाचे पुनरागमन)
न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी संघ:
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, इशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, केएस भरत, हार्दिक पंड्या, वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, शार्दुल ठाकूर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद मलिक सिराज, उमरान .
न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी संघ:
हार्दिक पंड्या (कर्णधार), सूर्यकुमार यादव, इशान किशन, रुतुराज गायकवाड, शुबमन गिल, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, जितेश शर्मा, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, उमरान मलिक, शिवम मावी, पृथ्वी कुमार शॉ, मुकेश शॉ. .
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)