Pune Fire: धायरी येथील डीएसके चौकात इलेक्ट्रिक स्कूटरने घेतला पेट; अग्निशमन दलाच्या प्रयत्नांनी आग आटोक्यात (Photo and Video)

पुण्यातील धायरी येथील, डीएसके चौकात इलेक्ट्रिक स्कूटरने पेट घेतल्याची घटना घडली. व्हायरल क्लिपमध्ये दुचाकीमधून धूर येत असताना अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणल्याचे दिसत आहे.

Pune Fire: धायरी येथील डीएसके चौकात इलेक्ट्रिक स्कूटरने घेतला पेट; अग्निशमन दलाच्या प्रयत्नांनी आग आटोक्यात (Photo and Video)
Photo Credit- X

Pune Fire: पुण्यातील धायरी येथील, डीएसके चौकात (DSK Chowk) एका इलेक्ट्रिक दुचाकीला अचानक आग लागल्याची घटना घडली. या घटनेचा व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. पुण्यातील धायरी, डीएसके चौकात ही कथित घटना घडली. व्हायरल क्लिपमध्ये दुचाकीमधून(Electric Scooter Fire) पांढरा धूर येत असताना दिसतो. दुचाकी रस्त्याच्या मधोमध उभी असून अग्निशमन दलाच्या (Fire Brigade) पथकाने तात्काळ घटनास्थळी पोहोचून आग आटोक्यात आणली. या घटनेत आतापर्यंत, कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.

धायरी येथील डीएसके चौकात इलेक्ट्रिक स्कूटरने घेतला पेट

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jan 01, 1970 05:30 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).