Samruddhi Expressway to Get Wayside Hubs: मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावरील अपघात कमी होण्याची शक्यता; पुढील सहा महिन्यात एक्सप्रेसवेच्या दोन्ही बाजूंना निर्माण होऊ शकतात मुलभूत सुविधा
समृद्धी महामार्गाच्या दोन्ही बाजूंना मुलभूत सुविधा निर्माण करण्याबाबताच्या मागण्या गेल्या काही महिन्यात वाढल्या आहेत. आता सुविधांची ही उणीव भरून काढण्यासाठी, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) या सुविधा विकसित करण्यासाठी खाजगी कंपन्यांना जोडण्याचा नवा प्रयत्न सुरू केला आहे.
Samruddhi Expressway to Get Wayside Hubs: साधारण दोन वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईला नागपूरशी जोडणाऱ्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचे (Samruddhi Expressway) उद्घाटन केले होते. मात्र अजूनही या महामार्गावर वाहनचालकांसाठी इंधन केंद्रे, गॅरेज, भोजनालये, सार्वजनिक सुविधा आणि प्रथमोपचार दवाखाने यांसारख्या रस्त्याच्या कडेला असलेल्या सुविधांचा अभाव आहे. या सुविधांसाठी वाहनचालकांना प्रवेश-नियंत्रित मार्गातून बाहेर पडण्याशिवाय पर्याय नसतो, सुविधांच्या अभावामुळे सतत बराच काळ प्रवास करावा लागतो व यामुळे थकवा आणि महामार्गाच्या संमोहनाची शक्यता वाढते. अशा बऱ्याच कारणांमुळे रस्त्यावर अपघात होण्याचा धोका वाढला आहे.
समृद्धी महामार्गाच्या दोन्ही बाजूंना मुलभूत सुविधा निर्माण करण्याबाबताच्या मागण्या गेल्या काही महिन्यात वाढल्या आहेत. आता सुविधांची ही उणीव भरून काढण्यासाठी, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) या सुविधा विकसित करण्यासाठी खाजगी कंपन्यांना जोडण्याचा नवा प्रयत्न सुरू केला आहे. अहवालानुसार पुढील सहा महिन्यांत काही सुविधा निर्माण होण्याची शकयता आहे.
एकूण समृद्धी महामार्ग 701 किमीचा आहे, ज्यापैकी इगतपुरी आणि मुंबई दरम्यानचा भाग वगळता एकूण 625 किमी सध्या वाहतुकीसाठी खुला आहे. संपूर्ण मार्ग प्रवेश-नियंत्रित असल्याने, आणि वाटेत कोणत्याही प्रकारच्या सुविधा नसल्यामुळे, वाहनचालकांना भोजनालये, सार्वजनिक सुविधा आणि गॅरेज शोधण्यासाठी एक्सप्रेसवेमधून बाहेर पडण्याशिवाय पर्याय नाही. सर्वात वाईट म्हणजे, पार्किंग सुविधांसह वेसाइड हब नसल्यामुळे वाहनचालकांना महामार्ग संमोहनाचा धोका निर्माण होतो, ज्यामध्ये ते वाहन चालवताना ट्रान्स सारख्या अवस्थेत जातात, ज्यामुळे सतर्कता कमी होते आणि प्राणघातक अपघातांचा धोका वाढतो. (हेही वाचा: Samruddhi Mahamarg: जनतेला दिलासा! 701 किमी लांब समृद्धी महामार्ग नोव्हेंबरपर्यंत पूर्णपणे कार्यान्वित होणार; MSRDC चा दावा)
पंतप्रधानांनी नागपूर आणि शिर्डी दरम्यानच्या पट्ट्याचे उद्घाटन केल्यानंतर जवळपास सहा महिन्यांनी, एमएसआरडीसीने 2023 च्या मध्यात रस्त्याच्या कडेला सुविधा विकसित करण्याचा पहिला प्रयत्न केला होता. या सुविधा विकसित करण्यासाठी औरंगाबाद आणि नाशिक जिल्ह्यात प्रत्येकी दोन, चार ठिकाणे निवडण्यात आली. प्रत्येक वेसाइड हब 10-12 हेक्टरमध्ये पसरलेला होता आणि त्यात इंधन स्टेशन, पार्किंग लॉट्स, गॅरेज, भोजनालय आणि इतर सुविधांचा समावेश होता.
जुलै 2023 मध्ये या हबच्या स्थापनेसाठी निविदा काढण्यात आल्या होत्या, परंतु त्यानंतर तांत्रिक कारणांमुळे ही प्रक्रिया रद्द करण्यात आली. आता, एमएसआरडीसीने दोन्ही दिशेने आठ अशी 16 वेसाइड हब स्थापन करण्यासाठी नवीन योजना आणली आहे. यामध्ये कार, बस आणि ट्रकसाठी विविध पार्किंग लॉट्स, किरकोळ दुरुस्तीसाठी गॅरेज, शौचालये, रेस्टॉरंट्स, प्रथमोपचार चिकित्सालय, कर्मचारी कक्ष आणि इतर सुविधांचा समावेश असेल. सूत्रांनी सांगितले की, या महिन्याच्या सुरुवातीला 16 हबच्या स्थापनेसाठी निविदा काढण्यात आल्या होत्या. एकदा बोली प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आणि खाजगी संस्थांची नियुक्ती झाल्यानंतर, त्यांना तीन महिन्यांच्या आत सुविधांची स्थापना करावी लागेल. प्रत्येक फर्मला 60 वर्षांच्या कालावधीसाठी हब चालवण्याचे अधिकार दिले जातील.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)